S M L

राजकारणाच्या वादात अडकली आदिवासींची घरं !

कन्हैया खंडेलवाल, हिंगोली 08 ऑगस्टहिंगोली जिल्हातील बोल्डावाडीत आदिवासी बांधवासाठी इकोटेक घरं बांधण्यात आली आहेत. पण राजकीय श्रेय लाटण्याच्या साठमारीत पहिल्या इकोटेक व्हिलेजची मात्र वाताहत झाली आहे. त्यामुळे आता हे गाव उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. हिंगोलीच्या बोल्डेवाडीतील ही आगळी वेगळी घरं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे आहे देशातील पहिल इकोटेक व्हिलेज. माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात जिल्ह्‌यातील 100 टक्के आदिवासींसाठी ही संकल्पना राबवली. देशातला हा पहिलाच प्रयोग होता. वर्ध्याच्या सेंटर फॉर सायन्स फॉर व्हिलेजस या संस्थेने ही घरं बांधून दिली. जवळपास दोन कोटी रुपये खर्च करुन 102 घरं बांधून पूर्ण झाली. - गावात 10 बायोगॅस प्लांट आहेत- 20-30 फूट रुंदीचे रस्ते, दोन्ही बाजूला झाडं लावण्यात आली - रस्तांच्या दोन्ही बाजूला सौर उर्जेवर चालणारे दिवे बसवले12 सप्टेंबर 2010 ला ही घरं बांधून तयार झाली. जवळपास एक वर्ष होत आहे. पण ज्या गरीब आदिवासींसाठी ही घरं बांधली त्यांना अजूनही ती मिळालेली नाही. कुठलाही वापर होत नसल्यामुळे या घरांची आता मोडकळीला यायला लागली आहे. या घराचे श्रेय लाटण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु झालेली चढाओढ आदिवासींच्या मुळावर आली. पण आमदार राजीव सातव यांनी 15 ऑगस्टला घराचे उद्घाटन करण्याचं आश्वासन दिलं. मात्र आमदार साहेबांच्या या आश्वासनावर बोल्डावाडीतल्या आदिवासी बांधवाना आता विश्वास नाही. कल्याणकारी योजना खूप येतात, पण त्या राबवण्याची इच्छाशक्तीच नसल्याचं हे आणखी एक उदाहरण.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 04:22 PM IST

राजकारणाच्या वादात अडकली आदिवासींची घरं !

कन्हैया खंडेलवाल, हिंगोली

08 ऑगस्ट

हिंगोली जिल्हातील बोल्डावाडीत आदिवासी बांधवासाठी इकोटेक घरं बांधण्यात आली आहेत. पण राजकीय श्रेय लाटण्याच्या साठमारीत पहिल्या इकोटेक व्हिलेजची मात्र वाताहत झाली आहे. त्यामुळे आता हे गाव उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.

हिंगोलीच्या बोल्डेवाडीतील ही आगळी वेगळी घरं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे आहे देशातील पहिल इकोटेक व्हिलेज. माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात जिल्ह्‌यातील 100 टक्के आदिवासींसाठी ही संकल्पना राबवली. देशातला हा पहिलाच प्रयोग होता. वर्ध्याच्या सेंटर फॉर सायन्स फॉर व्हिलेजस या संस्थेने ही घरं बांधून दिली. जवळपास दोन कोटी रुपये खर्च करुन 102 घरं बांधून पूर्ण झाली.

- गावात 10 बायोगॅस प्लांट आहेत- 20-30 फूट रुंदीचे रस्ते, दोन्ही बाजूला झाडं लावण्यात आली - रस्तांच्या दोन्ही बाजूला सौर उर्जेवर चालणारे दिवे बसवले

12 सप्टेंबर 2010 ला ही घरं बांधून तयार झाली. जवळपास एक वर्ष होत आहे. पण ज्या गरीब आदिवासींसाठी ही घरं बांधली त्यांना अजूनही ती मिळालेली नाही. कुठलाही वापर होत नसल्यामुळे या घरांची आता मोडकळीला यायला लागली आहे. या घराचे श्रेय लाटण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु झालेली चढाओढ आदिवासींच्या मुळावर आली.

पण आमदार राजीव सातव यांनी 15 ऑगस्टला घराचे उद्घाटन करण्याचं आश्वासन दिलं. मात्र आमदार साहेबांच्या या आश्वासनावर बोल्डावाडीतल्या आदिवासी बांधवाना आता विश्वास नाही. कल्याणकारी योजना खूप येतात, पण त्या राबवण्याची इच्छाशक्तीच नसल्याचं हे आणखी एक उदाहरण.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close