S M L

..तर आरक्षण सिनेमा प्रदर्शित करु नये - खडसे

08 ऑगस्टजोपर्यंत चित्रपटात आरक्षणविरोधी भूमिका नसल्याचे स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आधी ज्यांचा या सिनेमाला आक्षेप आहे त्यांना तो दाखवावा या भूमिकेचही समर्थन केलं. पण निर्मात्यांना याबाबत सरकारने कोणत्याही सूचना दिलेल्या नाही, असं समजते. सरकारने गुरूवारी निर्मात्यांनी हा सिनेमा आक्षेप असणार्‍यांना दाखवावा असं आवाहन केलं होतं. पण निर्मात्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, उद्या आरक्षण सिनेमाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ऍडव्होकेट अनिकेत देशकर यांनी ही याचिका दाखल केली. कोर्टाने हा सिनेमा पहावा आणि त्यात घटनाविरोधा काही असेल तर ते वगळून सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली. त्यावर आता उद्या कोर्ट काय निकाल देतं ते महत्त्वाचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 06:21 PM IST

..तर आरक्षण सिनेमा प्रदर्शित करु नये - खडसे

08 ऑगस्ट

जोपर्यंत चित्रपटात आरक्षणविरोधी भूमिका नसल्याचे स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आधी ज्यांचा या सिनेमाला आक्षेप आहे त्यांना तो दाखवावा या भूमिकेचही समर्थन केलं.

पण निर्मात्यांना याबाबत सरकारने कोणत्याही सूचना दिलेल्या नाही, असं समजते. सरकारने गुरूवारी निर्मात्यांनी हा सिनेमा आक्षेप असणार्‍यांना दाखवावा असं आवाहन केलं होतं. पण निर्मात्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही.

दरम्यान, उद्या आरक्षण सिनेमाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ऍडव्होकेट अनिकेत देशकर यांनी ही याचिका दाखल केली. कोर्टाने हा सिनेमा पहावा आणि त्यात घटनाविरोधा काही असेल तर ते वगळून सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली. त्यावर आता उद्या कोर्ट काय निकाल देतं ते महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 06:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close