S M L

बाप्पांच्या मंडपात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

08 ऑगस्टगणेशोत्सव आता काही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुण्यातील गणेशोत्सवाची धूम काही वेगळीच असते. पण यावर्षी पुण्याच्या गणेशोत्सवावर सावट आहे ते मुंबईत गेल्या महिन्यात झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांचे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी येत्या गणेशोत्सवात सुरक्षेसाठी अनेक नवीन योजना राबवायला आता सुरवात केली.दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर गणेशोत्सव येत असल्यामळे सुरक्षा यंत्रणा अधिक सजग झाल्यात. यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित आणि दहशतमुक्त व्हावा यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि गणेश मंडळांचीही मदत घेण्याचा विचार पुणे पोलीस करत आहेत.याचसाठी गणेश मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती पुणे पोलिसांनी या मंडळांना केली.पुणे पोलिसांच्या या विनंतीला गणेश मंडळांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासाठी पुण्यातली गणेश मंडळ सजावटीवरचा खर्च कमी करुन वाचलेल्या पैशांतून सीसीटीव्ही आणि सुरक्षा उपकरणं घेणार आहेत.पुण्यात सध्या नोंदणीकृत 3 हजार गणेश मंडळ आहेत. त्यामुळे पुण्यात सीसीटीव्हीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होतेय. त्यामुळेच आता सीसीटीव्ही कंपन्यांनी सीसीटीव्ही भाड्याने देण्याची शक्कल लढवली आहेत. हा उपक्रम राबवला तर सर्वसामान्यांमध्ये एक सकरात्मक संदेश जाईल आणि यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल अशी भावना व्यक्त होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2011 02:51 PM IST

बाप्पांच्या मंडपात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

08 ऑगस्ट

गणेशोत्सव आता काही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुण्यातील गणेशोत्सवाची धूम काही वेगळीच असते. पण यावर्षी पुण्याच्या गणेशोत्सवावर सावट आहे ते मुंबईत गेल्या महिन्यात झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांचे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी येत्या गणेशोत्सवात सुरक्षेसाठी अनेक नवीन योजना राबवायला आता सुरवात केली.दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर गणेशोत्सव येत असल्यामळे सुरक्षा यंत्रणा अधिक सजग झाल्यात. यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित आणि दहशतमुक्त व्हावा यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि गणेश मंडळांचीही मदत घेण्याचा विचार पुणे पोलीस करत आहेत.याचसाठी गणेश मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती पुणे पोलिसांनी या मंडळांना केली.

पुणे पोलिसांच्या या विनंतीला गणेश मंडळांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासाठी पुण्यातली गणेश मंडळ सजावटीवरचा खर्च कमी करुन वाचलेल्या पैशांतून सीसीटीव्ही आणि सुरक्षा उपकरणं घेणार आहेत.

पुण्यात सध्या नोंदणीकृत 3 हजार गणेश मंडळ आहेत. त्यामुळे पुण्यात सीसीटीव्हीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होतेय. त्यामुळेच आता सीसीटीव्ही कंपन्यांनी सीसीटीव्ही भाड्याने देण्याची शक्कल लढवली आहेत. हा उपक्रम राबवला तर सर्वसामान्यांमध्ये एक सकरात्मक संदेश जाईल आणि यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल अशी भावना व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2011 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close