S M L

'पवना'आंदोलन पेटले ; गोळीबारात 3 शेतकरी ठार

09 ऑगस्टमुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावाजवळ सुरू झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात तीन आंदोलक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाण्याची पाइपलाईन टाकण्यात येत आहे. या पाइपलाईनला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्याविरोधात आज मावळ तालुक्यात ठिकठिकाणी सभा आणि रास्ता रोको करण्यात आले. पहाटेपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली. बऊर गावाजवळही रास्ता रोको करण्यात आला. दुपारी हे आंदोलन चिघळले आणि त्याला हिंसक वळण लागले.पाईपलाईनचा विरोध म्हणून शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. पोलिसांच्या गाड्याही पेटवण्यात आल्या. एसटी बस तसेच खासगी गाड्या जाळण्यात आल्या. मावळमध्ये याआधी एक्सप्रेस हायवे, रेल्वे मार्ग,औद्योगिक वसाहती अशा अनेक धरणांसाठी जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्यातच पुन्हा या पाईपलाईनचा प्रकल्प येतोय. याला मावळमधील राष्ट्रवादी वगळता सगळ्याच पक्षांचा विरोध आहे. कामशेतजवळ शेतकर्‍यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे अडवला. त्यामुळे इथं आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. पण सध्या वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. बऊर गावाजवळ आंदोलक शेतकर्‍यांची सभा सुरू होती. पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. संतापलेल्या गावकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार सुरू केला. अवघ्या तीन मिनिटात आंदोलनाला हिंसक वळण लागले. जीव मुठीत घेऊन पळणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली असा आरोप केला जात आहे.आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरुवातीला हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा मारा केल्याचा दावा पोलिसांनी केला. पण पोलिसांनी नेम धरून गोळ्या मारल्या असा आरोप स्थानिक लोकांनी केला. तर पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी आणि नेत्यांनी केला. पण पोलीस बचावकार्य करत होते आणि आंदोलकांना शांत करत होते असा पोलिसांचा दावा आहे. याबद्दल पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक म्हणाले की, जर गोळीबार केला नसता तर आमचे दोन तीन अधिकारी शहीद झाले असते. कारण माझ्यासमोर एका पीआयच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला गेला. सुरूवातीला आम्ही शांतपणे आंदोलकांना समज दिली. पण पीआयच्या डोक्यात दगड घालण्यात येत होता. शेवटी नाइलाजाने गोळीबारीचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची मॅजिस्ट्रेटकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे कलेक्टर विकास देशमुख माहिती यांनी दिली. आंदोलन का पेटले ?- पवना धरणाचे पाणी पिपरी चिंचवडच्या पाणीपुरवठ्यासाठी देणार- सिंचनाचे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी देण्याला शेतकर्‍यांचा विरोध - पवना धरण ते पिंपरी चिंचवड बंद पाईपलाईनची योजना- बंदिस्त पाईपलाईनसाठी भूसंपादन - शेतकर्‍यांचा या भू संपादनाला विरोध- शेतजमिनीच्या खालून जाणार पाईपलाईन - शेतजमीन खराब होण्याची शेतकर्‍यांना भीती

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 09:36 AM IST

'पवना'आंदोलन पेटले ; गोळीबारात 3 शेतकरी ठार

09 ऑगस्ट

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावाजवळ सुरू झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात तीन आंदोलक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाण्याची पाइपलाईन टाकण्यात येत आहे.

या पाइपलाईनला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्याविरोधात आज मावळ तालुक्यात ठिकठिकाणी सभा आणि रास्ता रोको करण्यात आले. पहाटेपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली. बऊर गावाजवळही रास्ता रोको करण्यात आला. दुपारी हे आंदोलन चिघळले आणि त्याला हिंसक वळण लागले.

पाईपलाईनचा विरोध म्हणून शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. पोलिसांच्या गाड्याही पेटवण्यात आल्या. एसटी बस तसेच खासगी गाड्या जाळण्यात आल्या. मावळमध्ये याआधी एक्सप्रेस हायवे, रेल्वे मार्ग,औद्योगिक वसाहती अशा अनेक धरणांसाठी जमिनी घेण्यात आल्या आहेत.

त्यातच पुन्हा या पाईपलाईनचा प्रकल्प येतोय. याला मावळमधील राष्ट्रवादी वगळता सगळ्याच पक्षांचा विरोध आहे. कामशेतजवळ शेतकर्‍यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे अडवला. त्यामुळे इथं आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. पण सध्या वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

बऊर गावाजवळ आंदोलक शेतकर्‍यांची सभा सुरू होती. पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. संतापलेल्या गावकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार सुरू केला. अवघ्या तीन मिनिटात आंदोलनाला हिंसक वळण लागले.

जीव मुठीत घेऊन पळणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली असा आरोप केला जात आहे.आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरुवातीला हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा मारा केल्याचा दावा पोलिसांनी केला. पण पोलिसांनी नेम धरून गोळ्या मारल्या असा आरोप स्थानिक लोकांनी केला.

तर पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी आणि नेत्यांनी केला. पण पोलीस बचावकार्य करत होते आणि आंदोलकांना शांत करत होते असा पोलिसांचा दावा आहे. याबद्दल पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक म्हणाले की, जर गोळीबार केला नसता तर आमचे दोन तीन अधिकारी शहीद झाले असते.

कारण माझ्यासमोर एका पीआयच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला गेला. सुरूवातीला आम्ही शांतपणे आंदोलकांना समज दिली. पण पीआयच्या डोक्यात दगड घालण्यात येत होता. शेवटी नाइलाजाने गोळीबारीचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची मॅजिस्ट्रेटकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे कलेक्टर विकास देशमुख माहिती यांनी दिली.

आंदोलन का पेटले ?- पवना धरणाचे पाणी पिपरी चिंचवडच्या पाणीपुरवठ्यासाठी देणार- सिंचनाचे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी देण्याला शेतकर्‍यांचा विरोध - पवना धरण ते पिंपरी चिंचवड बंद पाईपलाईनची योजना- बंदिस्त पाईपलाईनसाठी भूसंपादन - शेतकर्‍यांचा या भू संपादनाला विरोध- शेतजमिनीच्या खालून जाणार पाईपलाईन - शेतजमीन खराब होण्याची शेतकर्‍यांना भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close