S M L

सोन्याचा भाव @ 26 हजार

09 ऑगस्टसोमवारी झालेल्या शेअर बाजारात घसरणीनंतर मंगळवारी सुध्दा घसरण सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. आता मात्र परिस्थिती हळुहळू सुधारताना दिसत आहे. तर काल सोन्याच्या भाव 25 हजारांवर जाऊन पोहचला होता. तर आज सुध्दा सोन्याच्या किंमतींनी आणखीन एक उच्चांक गाठला.जगभरातील शेअरबाजारांमधील अस्थिरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण यामुळे सोन्याच्या किंमतींत वाढ होत आहे. एरवी डॉलरमध्ये किंवा शेअरबाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीकडे वळल्याने सोन्याचे भाव वाढत चालले आहेत. आज सोन्याच्या किंमतीने 26 हजारांना स्पर्श केला. सेन्सेक्स सुरुवातीच्या घसरणीनंतर सावरला. पण गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या या घसरणीचा सगळ्यात मोठा फटका टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअर्सना बसला. टीसीएससी, विप्रो, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स गेल्या सात दिवसात 15%नी घसरलेले आहेत. ब्लॅक मंडेनंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये घसरण कायम आहे. पहिल्याच दिवशी अमेरिकन शेयर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली, डो जोन्स जवळपास 600 अंशानी कोसळला. तर सर्वच आशियाई शेअर मार्केटमध्ये परिस्थिती कालसारखीच राहिली आहे. जपान 4.4 अंश, हॉगंकॉग 7.3 , दक्षिण कोरीया 8.2,ऑस्ट्रेलियन 4.5, तायवान शेअर मार्केट 4.9 अंशानी कोसळले. मार्केटची परिस्थिती बघता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना समोर यावं लागले.अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि पत मजबूत आहे, बाजारात तेजी किंवा मंदी येत राहील.अमिरेका कायम AAA+ देश आहे आणि राहणार असा विश्वास ओबामा यांनी व्यक्त केला तर करांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणांची गरज त्यांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 10:36 AM IST

सोन्याचा भाव @ 26 हजार

09 ऑगस्ट

सोमवारी झालेल्या शेअर बाजारात घसरणीनंतर मंगळवारी सुध्दा घसरण सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. आता मात्र परिस्थिती हळुहळू सुधारताना दिसत आहे. तर काल सोन्याच्या भाव 25 हजारांवर जाऊन पोहचला होता. तर आज सुध्दा सोन्याच्या किंमतींनी आणखीन एक उच्चांक गाठला.

जगभरातील शेअरबाजारांमधील अस्थिरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण यामुळे सोन्याच्या किंमतींत वाढ होत आहे. एरवी डॉलरमध्ये किंवा शेअरबाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीकडे वळल्याने सोन्याचे भाव वाढत चालले आहेत. आज सोन्याच्या किंमतीने 26 हजारांना स्पर्श केला.

सेन्सेक्स सुरुवातीच्या घसरणीनंतर सावरला. पण गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या या घसरणीचा सगळ्यात मोठा फटका टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअर्सना बसला. टीसीएससी, विप्रो, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स गेल्या सात दिवसात 15%नी घसरलेले आहेत.

ब्लॅक मंडेनंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये घसरण कायम आहे. पहिल्याच दिवशी अमेरिकन शेयर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली, डो जोन्स जवळपास 600 अंशानी कोसळला. तर सर्वच आशियाई शेअर मार्केटमध्ये परिस्थिती कालसारखीच राहिली आहे.

जपान 4.4 अंश, हॉगंकॉग 7.3 , दक्षिण कोरीया 8.2,ऑस्ट्रेलियन 4.5, तायवान शेअर मार्केट 4.9 अंशानी कोसळले. मार्केटची परिस्थिती बघता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना समोर यावं लागले.अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि पत मजबूत आहे, बाजारात तेजी किंवा मंदी येत राहील.अमिरेका कायम AAA देश आहे आणि राहणार असा विश्वास ओबामा यांनी व्यक्त केला तर करांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणांची गरज त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close