S M L

मुंबईत अण्णांना पाठिंब्यासाठी भव्य रॅली

09 ऑगस्टजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांती दिनानिमित्त अण्णा हजारेंनी मुंबईत भव्य रॅली काढली. दादरच्या स्वामी नारायण मंदिरापासून या रॅलीला सुरूवात झाली. ती आझाद मैदानामध्ये पोहचली. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच नाही तर महाराष्ट्रभरातून लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यात मुंबईचे डब्बेवाले, शिक्षकांसोबतच महाविद्यालयीन तरूणही सहभागी झाले आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनी याआधीच अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.दरम्यान, 9 अण्णांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात वाहन रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्यभागात ही रॅली पोहचली. तसेच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. विश्वभंर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2011 11:31 AM IST

मुंबईत अण्णांना पाठिंब्यासाठी भव्य रॅली

09 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांती दिनानिमित्त अण्णा हजारेंनी मुंबईत भव्य रॅली काढली. दादरच्या स्वामी नारायण मंदिरापासून या रॅलीला सुरूवात झाली. ती आझाद मैदानामध्ये पोहचली. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच नाही तर महाराष्ट्रभरातून लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यात मुंबईचे डब्बेवाले, शिक्षकांसोबतच महाविद्यालयीन तरूणही सहभागी झाले आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनी याआधीच अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.दरम्यान, 9 अण्णांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात वाहन रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्यभागात ही रॅली पोहचली. तसेच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. विश्वभंर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2011 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close