S M L

परप्रांतीयांना संरक्षण देणार - शरद पवार

15 नोव्हेंबर, मुंबईआशिष जाधवनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसनं बहुभाषिक मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या आंदोलनाचं खापर मीडियावर फोडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतल्या परप्रांतीयांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. ' एकाही परप्रांतीयाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही छाती पुढे काढून उभे राहू ' असं ते म्हणाले.गेल्या वर्षभरापासून परप्रांतीयांच्या विरोधात मनसेचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कोणाची फूस आहे, ही बाब मिडीयानंच उघड केली होती. राज ठाकरे यांना मिळणारा पाठिंबा आणि मनसेचं वाढतं प्रस्थ आता सत्ताधार्‍यांना अडचणीच वाटू लागलंय. त्यामुळच आता या आंदोलनाचं खापर मीडियावर फोडण्यास पवारांनी सुरूवात केली आहे. खरं तर राज ठाकरे आणि त्यांच्या आंदोलनावर मीडियानं जोरदार टीका केली आहे. पण त्याची दखल न घेता, शरद पवारांनी मीडियाला टार्गेट केलं आहे. ' तुमचा टीआरपी रेट वाढवा. हवं तर मी उद्योजकांशी बोलून तुम्हाला दोन जाहिराती जास्त मिळवू देतो, पण देशाच्या एकतेला बाधा येईल, अशी कोणतीही गोष्ट करू नका ' या शब्दात त्यांनी मीडियाचा समाचार घेतला.राज ठाकरे यांना राज्य सरकारचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा मीडियामधून सतत झाली. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात राज्य सरकारनं हयगय केल्याचंही मीडियानं उघड केलं होतं. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर केल्या जाणार्‍या टीकेला उत्तर देण्याचा आणि त्याच वेळी बहुभाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा शरद पवारांचा हा प्रयत्न मानला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2008 04:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2008 04:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close