S M L

अमेरिकेचा अण्णांना पाठिंबा

12 ऑगस्टअण्णा हजारेंचं उपोषण 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण अण्णा आणि सरकारमधील संघर्षाला आतापासूनच सुरवात झाली आहे.जेपी पार्कमध्ये आंदोलन करावे असा सल्ला अण्णांना दिल्ली पोलिसांनी दिला असला. तरी अजूनपर्यंत केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने परवानगी दिली नाही. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी जेपी पार्कमध्ये आंदोलनाला हिरवा कंदील दिला असं सूत्रांनी सांगितले. तीन दिवस उपोषणाची परवानगी अण्णांना दिली जाईल, असं सराकरी सूत्रांनी आयबीएन लोकमतला सांगितले. पण तसं पत्र अजूनपर्यंत अण्णांना मिळाले नाही. दरम्यान, अण्णांना आज अमेरिकन सरकारचा अनपेक्षित पाठिंबा मिळाला. भारत सरकारने अण्णांवर कारवाईचा बडगा उगारू नये असं अमेरिकेने म्हटले आहे. यावर नाराजी व्यक्त करत भारताने म्हटलंय की अमेरिकेचं वक्तव्य गरज नसताना करण्यात आलेले आहे. काँग्रेस पक्षानंही यावर नाराजी व्यक्त केली. अमेरिकेचा अण्णांना पाठिंबा'शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने केलेल्या जगभरातल्या निदर्शनांना आम्ही पाठिंबा देतो. भारत हा लोकशाहीवादी देश आहे. म्हणून आम्हाला विश्वास आहे की शांततेच्या मार्गानं निदर्शनं करणार्‍यांशी भारत सरकार योग्य, लोकशाहीला अनुकूल आणि संयमाने वागेल.'

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2011 09:34 AM IST

अमेरिकेचा अण्णांना पाठिंबा

12 ऑगस्ट

अण्णा हजारेंचं उपोषण 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण अण्णा आणि सरकारमधील संघर्षाला आतापासूनच सुरवात झाली आहे.जेपी पार्कमध्ये आंदोलन करावे असा सल्ला अण्णांना दिल्ली पोलिसांनी दिला असला. तरी अजूनपर्यंत केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने परवानगी दिली नाही.

दिल्लीच्या नायब राज्यपालांनी जेपी पार्कमध्ये आंदोलनाला हिरवा कंदील दिला असं सूत्रांनी सांगितले. तीन दिवस उपोषणाची परवानगी अण्णांना दिली जाईल, असं सराकरी सूत्रांनी आयबीएन लोकमतला सांगितले. पण तसं पत्र अजूनपर्यंत अण्णांना मिळाले नाही. दरम्यान, अण्णांना आज अमेरिकन सरकारचा अनपेक्षित पाठिंबा मिळाला. भारत सरकारने अण्णांवर कारवाईचा बडगा उगारू नये असं अमेरिकेने म्हटले आहे. यावर नाराजी व्यक्त करत भारताने म्हटलंय की अमेरिकेचं वक्तव्य गरज नसताना करण्यात आलेले आहे. काँग्रेस पक्षानंही यावर नाराजी व्यक्त केली.

अमेरिकेचा अण्णांना पाठिंबा

'शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने केलेल्या जगभरातल्या निदर्शनांना आम्ही पाठिंबा देतो. भारत हा लोकशाहीवादी देश आहे. म्हणून आम्हाला विश्वास आहे की शांततेच्या मार्गानं निदर्शनं करणार्‍यांशी भारत सरकार योग्य, लोकशाहीला अनुकूल आणि संयमाने वागेल.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2011 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close