S M L

आंदोलन पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता !

12 ऑगस्टमावळ गोळीबार प्रकरण हे पूर्व नियोजित कट असू शकते. पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक भूमिका घेत विधानभवनात रणकंदन घडवून आणले तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावाजवळ शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले. हा पूर्वनियोजित कट होता की अपघात यांची चौकशी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोळीबाराचे आदेश कोणी दिले हे लवकरच समोर येईल याकरिता घटनास्थळी असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचे फोन कॉल तपासले जाणार आहे. अशी माहिती अजितदादांनी दिली. 9 ऑगस्टला मावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा आर.आर. पाटील यांनी केली. तसेच सहा पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. आज पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ प्रकरणावर खुलासा केला. मावळ प्रकरण हे पूर्वनियोजित असू शकते असा संशय मुख्यमंत्र्यांनी घेतला. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन ही त्यांनी दिले. तर अजितदादांनी मावळ येथे पहाटेपासुन सुरू झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. सकाळी सातपासून ते संध्याकाळपर्यंत पोलीस अधिकार्‍यांना कोणाकोणाचे फोन आले किंवा फोन केले गेले यांची माहिती घेतली जात आहे. याबद्दल लवकरच खुलासा होईल असं अजितदादा म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2011 01:47 PM IST

आंदोलन पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता !

12 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरण हे पूर्व नियोजित कट असू शकते. पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक भूमिका घेत विधानभवनात रणकंदन घडवून आणले तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बऊर गावाजवळ शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले. हा पूर्वनियोजित कट होता की अपघात यांची चौकशी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोळीबाराचे आदेश कोणी दिले हे लवकरच समोर येईल याकरिता घटनास्थळी असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचे फोन कॉल तपासले जाणार आहे. अशी माहिती अजितदादांनी दिली.

9 ऑगस्टला मावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा आर.आर. पाटील यांनी केली. तसेच सहा पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. आज पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ प्रकरणावर खुलासा केला.

मावळ प्रकरण हे पूर्वनियोजित असू शकते असा संशय मुख्यमंत्र्यांनी घेतला. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन ही त्यांनी दिले. तर अजितदादांनी मावळ येथे पहाटेपासुन सुरू झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. सकाळी सातपासून ते संध्याकाळपर्यंत पोलीस अधिकार्‍यांना कोणाकोणाचे फोन आले किंवा फोन केले गेले यांची माहिती घेतली जात आहे. याबद्दल लवकरच खुलासा होईल असं अजितदादा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2011 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close