S M L

विरोधकांच्या गोंधळातच अधिवेशनाची सांगता

12 ऑगस्टअखेर विरोधकांच्या गदारोळातचं अमृतमहोत्सवी अधिवेशन गुंडाळण्यात आलं. आज सलग चौथ्या दिवशी, विरोधकांनी मावळ गोळीबार प्रकरणावरुन गोंधळ सुरुच ठेवला. आणि याच गोंधळात सरकारने अधिवेशन गुंडाळले. विधानसभा अध्यक्षांनी हिवाळी अधिवेशन संपल्याची घोषणा केली. तसेच राज्याचे हिवाळी अधिवेशन 12 डिसेंबरपासुन सुरू होणार असल्याची घोषणाही विधानसभा अध्यक्षांनी केली.मावळ गोळीबाराचा प्रश्न चांगलाच पेटला. यावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही मोठा गदारोळ केला. आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणीही विरोधकांनी राज्यपालांकडे केली. सरकारने आंदोलकांवर गोळीबार करणार्‍या दोन पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन केलं. पण, पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्यावरही सरकारने कारवाई करावी अशी विरोधकांची मागणी आहे. सरकारने मात्र हे आंदोलन पूर्वनियोजित होते अशी शंका व्यक्त केली.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीसुद्धा विरोधकांनी मावळ गोळीबाराचा प्रश्न उचलून धरला. मोरेश्वर साठे यांच्या राज्यसरकारच जबाबदार आहे असा आरोप विरोधकांनी केला. मनसेनं तर यासंदर्भात एक सीडी आणि फोटो सादर करुन आपला विरोध दर्शवला. मावळच्या आंदोलनात गाड्यांची तोडफोड करणार्‍या सहा पोलीस कॉन्सटेबल आणि गोळीबार करणार्‍या दोन पोलीस अधिकार्‍यांवर सरकारने निलंबनाची कारवाई केली. पण गोळीबाराचा आदेश देणार्‍या पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल विरोधकांनी केला. तसेच या गोळीबाराला कारणीभूत असलेल्या पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विरोधकांनी केली. पण सरकार मात्र मावळच्या परिस्थितीसाठी विरोधकांनाच जबाबदार धरत आहे. तसेच पोलिसांच्या गोळीबाराचंही समर्थन करत आहे. विधिमंडळात न्याय मिळत नाही म्हणून अखेर विरोधक राज्यपालांकडे गार्‍हाणे मांडायला गेले. शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या सरकारला बरखास्त करावे अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली. गोळीबाराच्या तीन घटना आणि त्यावर तीन न्यायालयीन चौकशी एवढंच काय ते या अमृतमहोत्सवी अधिवेशनाचे फलित आहे. असेच म्हणावे लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2011 10:53 AM IST

विरोधकांच्या गोंधळातच अधिवेशनाची सांगता

12 ऑगस्ट

अखेर विरोधकांच्या गदारोळातचं अमृतमहोत्सवी अधिवेशन गुंडाळण्यात आलं. आज सलग चौथ्या दिवशी, विरोधकांनी मावळ गोळीबार प्रकरणावरुन गोंधळ सुरुच ठेवला. आणि याच गोंधळात सरकारने अधिवेशन गुंडाळले. विधानसभा अध्यक्षांनी हिवाळी अधिवेशन संपल्याची घोषणा केली. तसेच राज्याचे हिवाळी अधिवेशन 12 डिसेंबरपासुन सुरू होणार असल्याची घोषणाही विधानसभा अध्यक्षांनी केली.

मावळ गोळीबाराचा प्रश्न चांगलाच पेटला. यावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही मोठा गदारोळ केला. आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणीही विरोधकांनी राज्यपालांकडे केली. सरकारने आंदोलकांवर गोळीबार करणार्‍या दोन पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन केलं. पण, पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्यावरही सरकारने कारवाई करावी अशी विरोधकांची मागणी आहे. सरकारने मात्र हे आंदोलन पूर्वनियोजित होते अशी शंका व्यक्त केली.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीसुद्धा विरोधकांनी मावळ गोळीबाराचा प्रश्न उचलून धरला. मोरेश्वर साठे यांच्या राज्यसरकारच जबाबदार आहे असा आरोप विरोधकांनी केला. मनसेनं तर यासंदर्भात एक सीडी आणि फोटो सादर करुन आपला विरोध दर्शवला.

मावळच्या आंदोलनात गाड्यांची तोडफोड करणार्‍या सहा पोलीस कॉन्सटेबल आणि गोळीबार करणार्‍या दोन पोलीस अधिकार्‍यांवर सरकारने निलंबनाची कारवाई केली. पण गोळीबाराचा आदेश देणार्‍या पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल विरोधकांनी केला.

तसेच या गोळीबाराला कारणीभूत असलेल्या पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विरोधकांनी केली. पण सरकार मात्र मावळच्या परिस्थितीसाठी विरोधकांनाच जबाबदार धरत आहे. तसेच पोलिसांच्या गोळीबाराचंही समर्थन करत आहे. विधिमंडळात न्याय मिळत नाही म्हणून अखेर विरोधक राज्यपालांकडे गार्‍हाणे मांडायला गेले. शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या सरकारला बरखास्त करावे अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली.

गोळीबाराच्या तीन घटना आणि त्यावर तीन न्यायालयीन चौकशी एवढंच काय ते या अमृतमहोत्सवी अधिवेशनाचे फलित आहे. असेच म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close