S M L

मनसेच्या 'तिरडी' आंदोलनात शिवसेनेचाही सहभाग

12 ऑगस्टविधानसभेत आजच्या शेवटच्या दिवशी मावळ गोळीबार प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. हे सरकार खुनी आहे असा आरोप करत विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांनी आजही गोंधळ घातला. विरोधकांनी सरकारची तिरडी रचली. मनसेचे आमदार राम कदम प्रतिकात्मक प्रेत बनून विधानभवनाच्या पायर्‍यांवर झोपले.आणि विशेष म्हणजे मनसेच्या कदमांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेला खांदा शिवसेनेच्या आमदारांनी दिला.तसेच पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केले. ते विधानसभेत बोलत होते. पोलिसांवर राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे पण पोलीस जर भक्षक बनत असतील तर पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे. मावळ येथे झालेल्या गोळीबारात तीन शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला. कर्णिक यांना गोळीबाराचा आदेश कोणी दिला जर कर्णिक गोळीबार प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही बाळा नांदगावकर यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2011 11:38 AM IST

मनसेच्या 'तिरडी' आंदोलनात शिवसेनेचाही सहभाग

12 ऑगस्ट

विधानसभेत आजच्या शेवटच्या दिवशी मावळ गोळीबार प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. हे सरकार खुनी आहे असा आरोप करत विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांनी आजही गोंधळ घातला. विरोधकांनी सरकारची तिरडी रचली. मनसेचे आमदार राम कदम प्रतिकात्मक प्रेत बनून विधानभवनाच्या पायर्‍यांवर झोपले.आणि विशेष म्हणजे मनसेच्या कदमांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेला खांदा शिवसेनेच्या आमदारांनी दिला.

तसेच पुणे ग्रामीणचे एसपी संदीप कर्णिक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केले. ते विधानसभेत बोलत होते. पोलिसांवर राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे पण पोलीस जर भक्षक बनत असतील तर पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे. मावळ येथे झालेल्या गोळीबारात तीन शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला. कर्णिक यांना गोळीबाराचा आदेश कोणी दिला जर कर्णिक गोळीबार प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही बाळा नांदगावकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2011 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close