S M L

अण्णांना अखेर अटक

16 ऑगस्टअखेर दडपशाहीचाचा दंडुका फिरवून दिल्ली पोलिसांनी अण्णा हजारे यांना, त्यांचे नियोजित आंदोलन सुरू होण्याआधीच अटक केली. अण्णा हजारे यांना प्रतिबंधात्मक कायद्याखाली अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. आयपीसी 107 /51 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. जामीन मिळवण्यासाठी त्यांना दंडाधिकार्‍यापुढे हजर केले जाणार आहे. दिल्लीतल्या सुप्रीम इनक्लेव्ह मधून सकाळी 7.30 च्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. 'मला का अटक करण्यात येतीये, माझा गुन्हा काय, मी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही' असं अण्णा पोलिसांना सांगत होते. पण त्यांना न जुमानता , आम्हाला वरून आदेश देण्यात आले आहेत असं सांगत दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली. सकाळी 9 वाजता अण्णा हजारे राजघाटावर जाणार होते. तिथं गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार होती. तिथून ते समर्थकांसह जे.पी. पार्ककडे जाणार होते. पण हे काहीही पोलिसांनी होऊ दिलं नाही आणि दडपशाही करत पोलिसांनी अण्णांना अटक केली आणि जबरदस्तीने गाडीत बसवून अण्णांना दिल्लीतल्या सिव्हिल लाईन इथल्या पोलीस मेसमध्ये नेण्यात आलं. अण्णांसह नागरी समिती सदस्य आणि 300 समर्थकांना अटक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2011 06:09 AM IST

अण्णांना अखेर अटक

16 ऑगस्ट

अखेर दडपशाहीचाचा दंडुका फिरवून दिल्ली पोलिसांनी अण्णा हजारे यांना, त्यांचे नियोजित आंदोलन सुरू होण्याआधीच अटक केली. अण्णा हजारे यांना प्रतिबंधात्मक कायद्याखाली अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. आयपीसी 107 /51 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. जामीन मिळवण्यासाठी त्यांना दंडाधिकार्‍यापुढे हजर केले जाणार आहे.

दिल्लीतल्या सुप्रीम इनक्लेव्ह मधून सकाळी 7.30 च्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. 'मला का अटक करण्यात येतीये, माझा गुन्हा काय, मी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही' असं अण्णा पोलिसांना सांगत होते. पण त्यांना न जुमानता , आम्हाला वरून आदेश देण्यात आले आहेत असं सांगत दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली.

सकाळी 9 वाजता अण्णा हजारे राजघाटावर जाणार होते. तिथं गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार होती. तिथून ते समर्थकांसह जे.पी. पार्ककडे जाणार होते. पण हे काहीही पोलिसांनी होऊ दिलं नाही आणि दडपशाही करत पोलिसांनी अण्णांना अटक केली आणि जबरदस्तीने गाडीत बसवून अण्णांना दिल्लीतल्या सिव्हिल लाईन इथल्या पोलीस मेसमध्ये नेण्यात आलं. अण्णांसह नागरी समिती सदस्य आणि 300 समर्थकांना अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2011 06:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close