S M L

आंदोलनात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री

15 ऑगस्टदेशात काही जातीयवादी शक्ती सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत होणार्‍या अण्णांच्या आंदोलनामध्ये काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. प्रश्न लोकशाही मार्गानेच सोडवले पाहिजेत असंही चव्हाण यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबई ध्वजावदन सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते. अण्णांच्या आंदोलनला राज्यभरातून अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्था निर्माण झाली आहे. अण्णांवर जाहीर पणे टीका करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून दिग्विजय सिंग यांनी पाऊल उचलली होती. यामुळे जनतेच्या रोषाला पक्षाला सामोर जावं लागले होते. अण्णा हजारे पुन्हा उपोषण करणार अशी घोषणा केली आणि कपिल सिब्बल, अंबिका सोनी यांनी पुन्हा अण्णांवर आरोपाची फैरी झाडली. आज मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, देशात काही जातीयवादी शक्ती सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत होणार्‍या अण्णांच्या आंदोलनामध्ये काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. प्रश्न लोकशाही मार्गानेच सोडवले पाहिजेत असंही चव्हाण यांनी म्हटले. तसेच मुंबईसह राज्याच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले. तर 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त करणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकार कडक पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 15, 2011 11:56 AM IST

आंदोलनात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री

15 ऑगस्ट

देशात काही जातीयवादी शक्ती सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत होणार्‍या अण्णांच्या आंदोलनामध्ये काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. प्रश्न लोकशाही मार्गानेच सोडवले पाहिजेत असंही चव्हाण यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबई ध्वजावदन सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते.

अण्णांच्या आंदोलनला राज्यभरातून अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्था निर्माण झाली आहे. अण्णांवर जाहीर पणे टीका करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून दिग्विजय सिंग यांनी पाऊल उचलली होती. यामुळे जनतेच्या रोषाला पक्षाला सामोर जावं लागले होते. अण्णा हजारे पुन्हा उपोषण करणार अशी घोषणा केली आणि कपिल सिब्बल, अंबिका सोनी यांनी पुन्हा अण्णांवर आरोपाची फैरी झाडली.

आज मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, देशात काही जातीयवादी शक्ती सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत होणार्‍या अण्णांच्या आंदोलनामध्ये काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

प्रश्न लोकशाही मार्गानेच सोडवले पाहिजेत असंही चव्हाण यांनी म्हटले. तसेच मुंबईसह राज्याच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले. तर 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त करणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकार कडक पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2011 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close