S M L

अण्णांच्या अटकेचे तीव्र पडसाद ; समर्थक रस्त्यावर

16 ऑगस्टस्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साह साजर झाला आणि दुसर्‍या दिवसाची सकाळी झाली ती नव्या क्रांती युगाने.. जनलोकपाल विधेयकासाठी पुकारलेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने आज मोठा टप्पा पार केला. अण्णांना सकाळी अटक झाली. आणि अखंड भारतातून जनता रस्त्यावर उतरली. अण्णांना अटक केल्यांचा निषेध केला. मी अण्णा हजारे असं सांगत लाखो कार्यकर्ते स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले. स्वत:ला अटककरून घेतले. देशभरातून जनतेने आंदोलन केले. पण कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडवून आणला नाही. अंहिसक मार्गाने आपला निषेध व्यक्त केला.दिल्लीचा तख्ताला हादरे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक दिल्लीमध्ये जमलेले आहेत. दिल्लीत पाऊस पडत असून देखील सिव्हिल लाईन्स परिसरातमध्ये शेकडो समर्थक जमलेले आहेत. अण्णांना सोडण्यात यावे सोबतच जनलोकपाल बिल आणण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. देशभरातून समर्थकांनी दिल्ली जमा झाले आहे.'वंदे मातरम्' , 'इन्कलाब जिंदाबाद',च्या घोषणा देत सगळा परिसर दणाणून सोडला आहे. अण्णांना सोडण्यात यावे अशी मागणी समर्थकांनी लावून धरली आहे. देशभरातून अनेक भागातून समर्थक गोळा झाले आहे. यावेळी समर्थकांनाही पोलिसांनी अटक केली. सरकारचा निषेध करत, दडपशाहीचा धिक्कार करत यावेळी कार्यकर्त्यांनाही जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईत तरुणांचे ठिय्या आंदोलनमुंबईतून अण्णांच्या आंदोलनाला जबरदस्त पाठिंबा मिळाला. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुंबईकर आझाद मैदानावर जमा झाले होते. सकाळपासूनचं मुंबईकर अण्णांना पाठिंबा देण्यासाठी बाहेर पडले.आझाद मैदानाच्या समोरच्या रस्त्यावर तरुणांनी ठिय्या आंदोलन केलं.आझाद मैदानात जेलभरो आंदोलन करण्यात आले. पुण्यात जेलभरो आंदोलन अण्णा हजारे यांना अटक करण्यात आली. ही बातमी पोहचताच अण्णांचे समर्थक रस्तांवर उतरले. शहरात अनेक भागात अण्णांच्या नावांचा जयघोषाने पुणे दुमदुमले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी समर्थकांनी केली. उपोषण, रॅली, घोषणाबाजी करत समर्थकांनी स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन केले. औरंगाबादमध्ये पाठिंबाऐतिहासिक औरंगाबाद नगरीत 'अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है', 'अण्णा हजारे आंधी है देश का दुसरा गांधी है', अशा घोषणा देत हजारो समर्थक रस्त्यांवर उतरले. धरणे, ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात समर्थकांनी घोषणाबाजी केली. अण्णांना आपला पाठिंबा आहे असं सांगत अण्णांच्या अटकेचा निषेध केला.कोल्हापूर सरकारच्याविरोधात घोषणाबाजीकोल्हापूरकरही अण्णांच्या समर्थनार्थ आज हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आपला सहभाग नोंदवला. त्याचबरोबर सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली. नाशिककरांची लोकपाल आण्याची मागणीअण्णांना अटक झाल्याची बातमी कळताच त्याचा निषेध करण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरले. भ्रष्टाचार संपवण्यासाठी जनलोकपाल आणलं जावं अशी त्यांनी मागणी केली. तर कोकणात अण्णांना पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीतील नागरिक एकत्र आले. त्यांनी आंदोलन केलं. आणि सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. अण्णा हजारे यांचे आंदोलन देशभर पेटले पण अण्णांच्या आंदोलनाला गालबोट लागेल असा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2011 07:16 PM IST

अण्णांच्या अटकेचे तीव्र पडसाद ; समर्थक रस्त्यावर

16 ऑगस्ट

स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साह साजर झाला आणि दुसर्‍या दिवसाची सकाळी झाली ती नव्या क्रांती युगाने.. जनलोकपाल विधेयकासाठी पुकारलेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने आज मोठा टप्पा पार केला. अण्णांना सकाळी अटक झाली. आणि अखंड भारतातून जनता रस्त्यावर उतरली. अण्णांना अटक केल्यांचा निषेध केला. मी अण्णा हजारे असं सांगत लाखो कार्यकर्ते स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले. स्वत:ला अटककरून घेतले. देशभरातून जनतेने आंदोलन केले. पण कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडवून आणला नाही. अंहिसक मार्गाने आपला निषेध व्यक्त केला.

दिल्लीचा तख्ताला हादरे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक दिल्लीमध्ये जमलेले आहेत. दिल्लीत पाऊस पडत असून देखील सिव्हिल लाईन्स परिसरातमध्ये शेकडो समर्थक जमलेले आहेत. अण्णांना सोडण्यात यावे सोबतच जनलोकपाल बिल आणण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. देशभरातून समर्थकांनी दिल्ली जमा झाले आहे.

'वंदे मातरम्' , 'इन्कलाब जिंदाबाद',च्या घोषणा देत सगळा परिसर दणाणून सोडला आहे. अण्णांना सोडण्यात यावे अशी मागणी समर्थकांनी लावून धरली आहे. देशभरातून अनेक भागातून समर्थक गोळा झाले आहे. यावेळी समर्थकांनाही पोलिसांनी अटक केली. सरकारचा निषेध करत, दडपशाहीचा धिक्कार करत यावेळी कार्यकर्त्यांनाही जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबईत तरुणांचे ठिय्या आंदोलन

मुंबईतून अण्णांच्या आंदोलनाला जबरदस्त पाठिंबा मिळाला. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुंबईकर आझाद मैदानावर जमा झाले होते. सकाळपासूनचं मुंबईकर अण्णांना पाठिंबा देण्यासाठी बाहेर पडले.आझाद मैदानाच्या समोरच्या रस्त्यावर तरुणांनी ठिय्या आंदोलन केलं.आझाद मैदानात जेलभरो आंदोलन करण्यात आले. पुण्यात जेलभरो आंदोलन अण्णा हजारे यांना अटक करण्यात आली. ही बातमी पोहचताच अण्णांचे समर्थक रस्तांवर उतरले. शहरात अनेक भागात अण्णांच्या नावांचा जयघोषाने पुणे दुमदुमले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी समर्थकांनी केली. उपोषण, रॅली, घोषणाबाजी करत समर्थकांनी स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन केले. औरंगाबादमध्ये पाठिंबा

ऐतिहासिक औरंगाबाद नगरीत 'अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है', 'अण्णा हजारे आंधी है देश का दुसरा गांधी है', अशा घोषणा देत हजारो समर्थक रस्त्यांवर उतरले. धरणे, ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात समर्थकांनी घोषणाबाजी केली. अण्णांना आपला पाठिंबा आहे असं सांगत अण्णांच्या अटकेचा निषेध केला.

कोल्हापूर सरकारच्याविरोधात घोषणाबाजीकोल्हापूरकरही अण्णांच्या समर्थनार्थ आज हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आपला सहभाग नोंदवला. त्याचबरोबर सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली.

नाशिककरांची लोकपाल आण्याची मागणीअण्णांना अटक झाल्याची बातमी कळताच त्याचा निषेध करण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरले. भ्रष्टाचार संपवण्यासाठी जनलोकपाल आणलं जावं अशी त्यांनी मागणी केली.

तर कोकणात अण्णांना पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीतील नागरिक एकत्र आले. त्यांनी आंदोलन केलं. आणि सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. अण्णा हजारे यांचे आंदोलन देशभर पेटले पण अण्णांच्या आंदोलनाला गालबोट लागेल असा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2011 07:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close