S M L

अण्णांचा उपोषणाचा निर्धार कायम

15 ऑगस्टआम्हाला ज्या ठिकाणी अडवले त्या ठिकाणी आम्ही उपोषण सुरू करू असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. उद्या कोणत्याही परिस्थित उपोषण होणारच यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आता मागे हटणार नाही अजून लढाई बाकी आहे. अस सांगत अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकच्या नव्या लढाईला सुरूवात केली. लोकपाल बिल आता संसदेत आहे. त्यावर संसदच निर्णय घेणार असं सांगणार्‍या पंतप्रधानांनाही अण्णांनी उत्तर दिले. संसदेवर आमचा विश्वास आहेच, पण लोकपालचा मसुदा योग्य आणावा अशीच आमची मागणी असल्याचे अण्णा म्हणाले. पंतप्रधानांच्या आजच्या वक्तव्यावर आपल्याला दु:ख झाल्याचंही त्यांनी म्हटले. उद्या सकाळी जे पी पार्कात जाणारच मग त्यासाठी कलम 144 तोडणार असून तुरुंगात टाकले तरीही आंदोलन सुरुच राहील असंही अण्णांनी यावेळी सांगितले. तसेच लोकपाल विधेयकामुळे 65 टक्के भ्रष्टाचार रोखता येऊ शकतो असा दावा अण्णांनी व्यक्त केला. अण्णांनी राजघाटावर चिंतन केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.आज दुपारी राजघाटावर अण्णांनी महात्मा गांधीच्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथे त्यांनी चिंतन केलं. मागच्या आंदोलनाच्या वेळेसही अण्णांनी राजघाटावर जाऊन समाधीचं दर्शन घेतलं होतं. राजघाटानंतर अण्णांनी कॉन्स्टीट्युशनल क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आंदोलनाबद्दल दोन पानांचा संदेश तयार केला होता. लोकांना आवाहन करत अण्णा म्हणाले की, महागाई, भ्रष्टाचार, बेकारीच्या आगीत सर्वसामान्य जनता होरपाळून निघत आहे. सरकारला जर हे थांबवावे असे वाटत असले तर ते खूप अगोदर थांबवले असते पण सरकारला ते करायचे नाही. उद्या उपोषण होणारच यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असं पुन्हा एकदा अण्णांनी ठणकावून सांगितले. लोकपाल विधेयक आणणारच असा ठाम निर्धारही अण्णांनी केला. त्याचबरोबर आता मागे हटणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्या सकाळी जे पी पार्कात जाणार कलम 144 तोडणार असून तुरुंगात टाकले तरीही आंदोलन सुरुच राहील असं त्यानी सांगितले. तुरुंगातून आल्यावरही पुन्हा जे पी पार्क मध्ये जाणार आणि आंदोलन करणार असं अण्णांनी सांगितले. लोकपालमुळे भ्रष्टाचार शंभर टक्के संपणार नाही, असं सरकारचं म्हणणे आहे. आणि यावरुनच अण्णा आणि त्यांच्या टीमवर टीका केली जात आहे. पण लोकपालमुळे 60 ते 70 टक्के भ्रष्टाचार संपेलच, असा दावा अण्णांनी केला. सरकारने कितीही विरोध, दडपशाही आणि आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तरीही जनलोकपाल येणारच असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला. जनशक्तीपुढे सरकार हरेल असा त्यांना विश्वास आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 15, 2011 03:05 PM IST

अण्णांचा उपोषणाचा निर्धार कायम

15 ऑगस्ट

आम्हाला ज्या ठिकाणी अडवले त्या ठिकाणी आम्ही उपोषण सुरू करू असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. उद्या कोणत्याही परिस्थित उपोषण होणारच यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आता मागे हटणार नाही अजून लढाई बाकी आहे. अस सांगत अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकच्या नव्या लढाईला सुरूवात केली.

लोकपाल बिल आता संसदेत आहे. त्यावर संसदच निर्णय घेणार असं सांगणार्‍या पंतप्रधानांनाही अण्णांनी उत्तर दिले. संसदेवर आमचा विश्वास आहेच, पण लोकपालचा मसुदा योग्य आणावा अशीच आमची मागणी असल्याचे अण्णा म्हणाले. पंतप्रधानांच्या आजच्या वक्तव्यावर आपल्याला दु:ख झाल्याचंही त्यांनी म्हटले.

उद्या सकाळी जे पी पार्कात जाणारच मग त्यासाठी कलम 144 तोडणार असून तुरुंगात टाकले तरीही आंदोलन सुरुच राहील असंही अण्णांनी यावेळी सांगितले. तसेच लोकपाल विधेयकामुळे 65 टक्के भ्रष्टाचार रोखता येऊ शकतो असा दावा अण्णांनी व्यक्त केला. अण्णांनी राजघाटावर चिंतन केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

आज दुपारी राजघाटावर अण्णांनी महात्मा गांधीच्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथे त्यांनी चिंतन केलं. मागच्या आंदोलनाच्या वेळेसही अण्णांनी राजघाटावर जाऊन समाधीचं दर्शन घेतलं होतं. राजघाटानंतर अण्णांनी कॉन्स्टीट्युशनल क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आंदोलनाबद्दल दोन पानांचा संदेश तयार केला होता.

लोकांना आवाहन करत अण्णा म्हणाले की, महागाई, भ्रष्टाचार, बेकारीच्या आगीत सर्वसामान्य जनता होरपाळून निघत आहे. सरकारला जर हे थांबवावे असे वाटत असले तर ते खूप अगोदर थांबवले असते पण सरकारला ते करायचे नाही. उद्या उपोषण होणारच यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असं पुन्हा एकदा अण्णांनी ठणकावून सांगितले. लोकपाल विधेयक आणणारच असा ठाम निर्धारही अण्णांनी केला. त्याचबरोबर आता मागे हटणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्या सकाळी जे पी पार्कात जाणार कलम 144 तोडणार असून तुरुंगात टाकले तरीही आंदोलन सुरुच राहील असं त्यानी सांगितले. तुरुंगातून आल्यावरही पुन्हा जे पी पार्क मध्ये जाणार आणि आंदोलन करणार असं अण्णांनी सांगितले. लोकपालमुळे भ्रष्टाचार शंभर टक्के संपणार नाही, असं सरकारचं म्हणणे आहे. आणि यावरुनच अण्णा आणि त्यांच्या टीमवर टीका केली जात आहे.

पण लोकपालमुळे 60 ते 70 टक्के भ्रष्टाचार संपेलच, असा दावा अण्णांनी केला. सरकारने कितीही विरोध, दडपशाही आणि आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तरीही जनलोकपाल येणारच असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला. जनशक्तीपुढे सरकार हरेल असा त्यांना विश्वास आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2011 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close