S M L

अण्णा हजारे माझ्यासाठी, आई !

अलका धुपकर, राळेगणसिद्धी16 ऑगस्टदेशभरात भ्रष्टाचारविरोधी संघटित आंदोलन उभं करण्यात अण्णा हजारे यांना यश आले. त्यांनी केलेल्या ग्रामविकासाच्या कामाची पुंजी त्यांना पाठबळ मिळवून देण्यात खूप मोलाची ठरली. अण्णा हजारे आणि त्यांची राळेगणसिद्धी आता मॉडेल व्हिलेज ठरले आहेत. पण अण्णांसोबत सतत अनेक माणसांचा राबता असतो. अण्णांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणार्‍या अशाच काही खास माणसांची ही ओळख..अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा पसारा हा वाढतच चाललाय. या न्यासाचे अकाऊटंट म्हणून सुरेश पठारे काम पाहतात. कॉलेज शिक्षण पूर्ण होताच ते अण्णांच्या आंदोलनाकडे ओढले गेले. अण्णा हजारेंवर अनेकजण टीका करतात. अण्णांच्या कार्यपद्धतीचं विश्लेषण करतात. पण अण्णांचे काही चुकतं असं तुम्हाला वाटतं का ? हे जेव्हा आम्ही सुरेशला विचारले. तेव्हा सुरेश म्हणतात, अण्णांसमोर जो कोणी काही बोलतो तो खरंच बोलतो. त्यामुळे अण्णांचे काही चुकते हे कधीच खरं वाटतं नाही. सुरेश पठारेंना भ्रष्टाचारविरोधाचं बाळकडू लहानपणीच मिळालं होतं. सुरेशची आई अण्णांच्या आंदोलनातली सक्रीय कार्यकर्त्यां आहे. इथं झालेल्या आंदोलनात तिनं गोळ्या झेलल्या होत्या. तेव्हा सुरेश पाचवीत होता. देशासाठी अण्णा तीर्थक्षेत्र बनले आहे. सरकारसाठी डोकेदुखी तर अनेकांसाठी प्रेरणा आणि सुरेशसाठी अण्णा माझ्यासाठी आई आहे असं सुरेश म्हणतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2011 12:59 PM IST

अण्णा हजारे माझ्यासाठी, आई !

अलका धुपकर, राळेगणसिद्धी

16 ऑगस्ट

देशभरात भ्रष्टाचारविरोधी संघटित आंदोलन उभं करण्यात अण्णा हजारे यांना यश आले. त्यांनी केलेल्या ग्रामविकासाच्या कामाची पुंजी त्यांना पाठबळ मिळवून देण्यात खूप मोलाची ठरली. अण्णा हजारे आणि त्यांची राळेगणसिद्धी आता मॉडेल व्हिलेज ठरले आहेत. पण अण्णांसोबत सतत अनेक माणसांचा राबता असतो. अण्णांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणार्‍या अशाच काही खास माणसांची ही ओळख..

अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा पसारा हा वाढतच चाललाय. या न्यासाचे अकाऊटंट म्हणून सुरेश पठारे काम पाहतात. कॉलेज शिक्षण पूर्ण होताच ते अण्णांच्या आंदोलनाकडे ओढले गेले. अण्णा हजारेंवर अनेकजण टीका करतात. अण्णांच्या कार्यपद्धतीचं विश्लेषण करतात. पण अण्णांचे काही चुकतं असं तुम्हाला वाटतं का ? हे जेव्हा आम्ही सुरेशला विचारले.

तेव्हा सुरेश म्हणतात, अण्णांसमोर जो कोणी काही बोलतो तो खरंच बोलतो. त्यामुळे अण्णांचे काही चुकते हे कधीच खरं वाटतं नाही. सुरेश पठारेंना भ्रष्टाचारविरोधाचं बाळकडू लहानपणीच मिळालं होतं. सुरेशची आई अण्णांच्या आंदोलनातली सक्रीय कार्यकर्त्यां आहे. इथं झालेल्या आंदोलनात तिनं गोळ्या झेलल्या होत्या. तेव्हा सुरेश पाचवीत होता. देशासाठी अण्णा तीर्थक्षेत्र बनले आहे. सरकारसाठी डोकेदुखी तर अनेकांसाठी प्रेरणा आणि सुरेशसाठी अण्णा माझ्यासाठी आई आहे असं सुरेश म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2011 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close