S M L

अण्णांची होणार सुटका ; जनतेपुढे सरकारचे लोटांगण

16 ऑगस्टजनतेच्या रेट्यापुढे सरकार अखेर झुकले. अण्णांना देशभरातून मिळणारा पाठिंबा आणि गावागावपर्यंत पोहचलेल्या आंदोलनानंतर अखेर सरकारने सपशेल माघार घेतली. अण्णांची तिहार जेलमधून सुटका करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अण्णांच्या सुटकेचं पत्र तिहार जेल प्रशासनाकडे पोहचले आहे. थोड्याच वेळात अण्णांची सुटका होण्याची शक्यता आहे .राहुल गांधींच्या मध्यस्थीनंतर अण्णांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. अण्णांनी कायदा मोडू नये, यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. पण तशी स्थिती राहिली नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं कारण दिल्ली पोलिसांनी दिले. पण अण्णांच्या अटकेनंतर देशभरात उमटलेली संतापाची लाट पाहून सरकार घाबरले. जनतेच्या देशव्यापी आंदोलनामुळे अडचणीत येण्याची भीती सरकारला वाटतेय. त्यामुळेच अण्णांच्या सुटकेचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. आज सकाळी सहा वाजता दिल्लीचे पोलीस मयूर विहार परिसरातल्या सुप्रीम एनक्लेव्हमध्ये पोहोचले. याठिकाणी अण्णा आणि त्यांचे सहकारी थांबले होते. पोलिसांनी अण्णा, अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासह काही सहकार्‍यांना ताब्यात घेतले. ही बातमी पसरताच वातावरण तापले. लोक रस्त्यांवर उतरले. अण्णांच्या अटकेचं हे नाट्य दिवसभर सुरू होतं. अखेर संध्याकाळी त्यांच्यासह सात जणांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले. सकाळी 6 वाजता. ....दिल्लीतल्या मयूर विहार परिसरात सुप्रीम एनक्लेव्हमध्ये वातावरण कमालीचं तंग होतं. काहीतरी अघटीत होणार याची चाहूल सगळ्यांनाच लागली होती. कारण दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणी अण्णांच्या उंबरठ्यापर्यंत पोचणार होते. सकाळी 7 वाजता. दिल्ली पोलिसांच्या टीमने, टीम अण्णांचा दरवाजा ठोठावला. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल असं पोलिसांनी अण्णांच्या टीमला सांगितले. आणि पुढच्या 15 मिनिटांत अण्णा हजारे अरविंद केजरीवाल आणि आपल्या महत्त्वाच्या सहकार्‍यांसह फ्लॅट नंबर 280 मधून बाहेर पडले. सकाळी 8 वा. यावेळेपर्यंत अण्णांना ताब्यात घेतल्याची बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. आणि अण्णांच्या शेकडो समर्थकांनी अण्णांच्या गाडीकडे धाव घेतली. आणि तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.सकाळी 10 वा. आतापर्यंत शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि त्यांना उत्तर दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमकडे नेण्यात आले. तर अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांना सिव्हिल लाईन्सकडे नेण्यात आले. आता सरकारविरोधात लोकांचा आवाज बराच तापला होता.दुपारी 12 वा. अण्णांना अटक केल्याचे पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केले. त्यानंतर दिल्लीतील तरुण अण्णांना जिथं ठेवलं होतं, त्या सिव्हिल लाईन्स परिसरात जमले. धो धो पावसाची पर्वा न करता हे तरुण इथपर्यंत पोचले होते. दुपारी 1 वा. अण्णांना सिव्हिल लाईन्समधून गुपचूप दुसरीकडे हलवण्यात आले. आणि पुढचे दोन तास त्यांचा ठावठिकाणा लोकांपासून लपवण्यात आला.दुपारी 3 वा. अण्णांना कुठे ठेवलंय या प्रश्नाचा उलगडा अखेर दिल्ली पोलिसांनीच केला. आणि अण्णांना आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलंय, असं सांगितले.आणि दुपार उलटेपर्यंत सर्व शंका मिटल्या. अण्णा हजारे आणि त्यांच्या सात सहकार्‍यांना एका आठवड्याची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आणि त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. त्यामुळे वातारण अधिकच तापलं. छत्रसाल स्टेडियममध्ये ताब्यात असलेले अण्णांचे दीड हजार समर्थक आणि स्टेडियमच्या बाहेर जमलेला जनसमुदायात संतापाची लाट पसरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2011 02:54 PM IST

अण्णांची होणार सुटका ; जनतेपुढे सरकारचे लोटांगण

16 ऑगस्ट

जनतेच्या रेट्यापुढे सरकार अखेर झुकले. अण्णांना देशभरातून मिळणारा पाठिंबा आणि गावागावपर्यंत पोहचलेल्या आंदोलनानंतर अखेर सरकारने सपशेल माघार घेतली. अण्णांची तिहार जेलमधून सुटका करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अण्णांच्या सुटकेचं पत्र तिहार जेल प्रशासनाकडे पोहचले आहे.

थोड्याच वेळात अण्णांची सुटका होण्याची शक्यता आहे .राहुल गांधींच्या मध्यस्थीनंतर अण्णांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. अण्णांनी कायदा मोडू नये, यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती.

पण तशी स्थिती राहिली नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं कारण दिल्ली पोलिसांनी दिले. पण अण्णांच्या अटकेनंतर देशभरात उमटलेली संतापाची लाट पाहून सरकार घाबरले. जनतेच्या देशव्यापी आंदोलनामुळे अडचणीत येण्याची भीती सरकारला वाटतेय. त्यामुळेच अण्णांच्या सुटकेचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.

आज सकाळी सहा वाजता दिल्लीचे पोलीस मयूर विहार परिसरातल्या सुप्रीम एनक्लेव्हमध्ये पोहोचले. याठिकाणी अण्णा आणि त्यांचे सहकारी थांबले होते. पोलिसांनी अण्णा, अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासह काही सहकार्‍यांना ताब्यात घेतले. ही बातमी पसरताच वातावरण तापले. लोक रस्त्यांवर उतरले. अण्णांच्या अटकेचं हे नाट्य दिवसभर सुरू होतं. अखेर संध्याकाळी त्यांच्यासह सात जणांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले.

सकाळी 6 वाजता. ....दिल्लीतल्या मयूर विहार परिसरात सुप्रीम एनक्लेव्हमध्ये वातावरण कमालीचं तंग होतं. काहीतरी अघटीत होणार याची चाहूल सगळ्यांनाच लागली होती. कारण दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणी अण्णांच्या उंबरठ्यापर्यंत पोचणार होते.

सकाळी 7 वाजता. दिल्ली पोलिसांच्या टीमने, टीम अण्णांचा दरवाजा ठोठावला. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल असं पोलिसांनी अण्णांच्या टीमला सांगितले. आणि पुढच्या 15 मिनिटांत अण्णा हजारे अरविंद केजरीवाल आणि आपल्या महत्त्वाच्या सहकार्‍यांसह फ्लॅट नंबर 280 मधून बाहेर पडले.

सकाळी 8 वा. यावेळेपर्यंत अण्णांना ताब्यात घेतल्याची बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. आणि अण्णांच्या शेकडो समर्थकांनी अण्णांच्या गाडीकडे धाव घेतली. आणि तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

सकाळी 10 वा. आतापर्यंत शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि त्यांना उत्तर दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमकडे नेण्यात आले. तर अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांना सिव्हिल लाईन्सकडे नेण्यात आले. आता सरकारविरोधात लोकांचा आवाज बराच तापला होता.दुपारी 12 वा. अण्णांना अटक केल्याचे पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केले. त्यानंतर दिल्लीतील तरुण अण्णांना जिथं ठेवलं होतं, त्या सिव्हिल लाईन्स परिसरात जमले. धो धो पावसाची पर्वा न करता हे तरुण इथपर्यंत पोचले होते. दुपारी 1 वा. अण्णांना सिव्हिल लाईन्समधून गुपचूप दुसरीकडे हलवण्यात आले. आणि पुढचे दोन तास त्यांचा ठावठिकाणा लोकांपासून लपवण्यात आला.दुपारी 3 वा. अण्णांना कुठे ठेवलंय या प्रश्नाचा उलगडा अखेर दिल्ली पोलिसांनीच केला. आणि अण्णांना आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलंय, असं सांगितले.

आणि दुपार उलटेपर्यंत सर्व शंका मिटल्या. अण्णा हजारे आणि त्यांच्या सात सहकार्‍यांना एका आठवड्याची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आणि त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. त्यामुळे वातारण अधिकच तापलं. छत्रसाल स्टेडियममध्ये ताब्यात असलेले अण्णांचे दीड हजार समर्थक आणि स्टेडियमच्या बाहेर जमलेला जनसमुदायात संतापाची लाट पसरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2011 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close