S M L

अण्णांचा तुरुंगाबाहेर येण्यास नकार

16 ऑगस्टजनतेच्या रेट्यापुढे सरकार अखेर झुकले. अण्णांना देशभरातून मिळणारा पाठिंबा आणि गावागावपर्यंत पोहचलेल्या आंदोलनानंतर अखेर सरकारने सपशेल माघार घेतली. अण्णांची तिहार जेलमधून सुटका करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पण अण्णांनी सुटकाकरून घेण्यास नकार दिला आहे. पोलीस पुन्हा कारवाई करतील असा अण्णांना संशय आहे. आपल्याला जे.पी. मैदानावर जाऊ द्यावे आणि आपल्या तिथे उपोषण करू द्यावे अशी मागणी अण्णांनी केली आहे.अण्णांच्या टीमची मात्र सुटका करण्यात आली आहे. अण्णांचे सातही सदस्य बाहेर आले आहे.दिल्ली पोलिसांनी अण्णांच्या सुटकेचं पत्र तिहार जेल प्रशासनाकडे पोहचले आहे. थोड्याच वेळात अण्णांची सुटका होण्याची शक्यता आहे .राहुल गांधींच्या मध्यस्थीनंतर अण्णांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. अण्णांनी कायदा मोडू नये, यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. पण तशी स्थिती राहिली नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं कारण दिल्ली पोलिसांनी दिले. पण अण्णांच्या अटकेनंतर देशभरात उमटलेली संतापाची लाट पाहून सरकार घाबरले. जनतेच्या देशव्यापी आंदोलनामुळे अडचणीत येण्याची भीती सरकारला वाटतेय. त्यामुळेच अण्णांच्या सुटकेचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मात्र अण्णांनी तुरुंगाबाहेर येण्यास नकार दिला आहे. जे.पी.मैदानावर उपोषण करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अण्णांनी लावून धरली आहे. तिहार जेलबाहेर अण्णांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले आहे. अण्णा कधी बाहेर येतात यांची वाट पाहत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2011 06:04 PM IST

अण्णांचा तुरुंगाबाहेर येण्यास नकार

16 ऑगस्ट

जनतेच्या रेट्यापुढे सरकार अखेर झुकले. अण्णांना देशभरातून मिळणारा पाठिंबा आणि गावागावपर्यंत पोहचलेल्या आंदोलनानंतर अखेर सरकारने सपशेल माघार घेतली. अण्णांची तिहार जेलमधून सुटका करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पण अण्णांनी सुटकाकरून घेण्यास नकार दिला आहे. पोलीस पुन्हा कारवाई करतील असा अण्णांना संशय आहे. आपल्याला जे.पी. मैदानावर जाऊ द्यावे आणि आपल्या तिथे उपोषण करू द्यावे अशी मागणी अण्णांनी केली आहे.अण्णांच्या टीमची मात्र सुटका करण्यात आली आहे. अण्णांचे सातही सदस्य बाहेर आले आहे.

दिल्ली पोलिसांनी अण्णांच्या सुटकेचं पत्र तिहार जेल प्रशासनाकडे पोहचले आहे. थोड्याच वेळात अण्णांची सुटका होण्याची शक्यता आहे .राहुल गांधींच्या मध्यस्थीनंतर अण्णांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. अण्णांनी कायदा मोडू नये, यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती.

पण तशी स्थिती राहिली नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं कारण दिल्ली पोलिसांनी दिले. पण अण्णांच्या अटकेनंतर देशभरात उमटलेली संतापाची लाट पाहून सरकार घाबरले. जनतेच्या देशव्यापी आंदोलनामुळे अडचणीत येण्याची भीती सरकारला वाटतेय. त्यामुळेच अण्णांच्या सुटकेचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मात्र अण्णांनी तुरुंगाबाहेर येण्यास नकार दिला आहे. जे.पी.मैदानावर उपोषण करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अण्णांनी लावून धरली आहे. तिहार जेलबाहेर अण्णांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले आहे. अण्णा कधी बाहेर येतात यांची वाट पाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2011 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close