S M L

अण्णांचा मुक्काम तिहारमध्ये ; सरकार झुकले

16 ऑगस्टजनतेच्या रेट्यापुढे सरकार अखेर झुकले. अण्णांना देशभरातून मिळणारा पाठिंबा आणि गावागावपर्यंत पोहचलेल्या आंदोलनानंतर अखेर सरकारने सपशेल माघार घेतली. अण्णांची तिहार जेलमधून सुटका करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पण अण्णांनी सुटकाकरून घेण्यास नकार दिला आहे. आपल्याला जे.पी. मैदानावर जाऊ द्यावे आणि आपल्या तिथे उपोषण करू द्यावे अशी मागणी अण्णांनी केली आहे. अण्णांच्या टीमची मात्र सुटका करण्यात आली आहे. अण्णांचे सातही सदस्य बाहेर आले आहे. अण्णांचे सहकारी शिसोदिया बाहेर येऊन अण्णा हजारे एका अधिकार्‍यांच्या खोलीत आराम करत आहे. आपल्याला जे.पी.पार्कवर उपोषणासाठी बिनशर्त परवानगी देण्यात यावी अशी मागणी अण्णांनी केली आहे. पोलिसांनी अण्णांना सकाळी बाहेर काढण्याचा निर्धार केला आहे.अण्णांचे आंदोलन चिरडण्याचा घाट रचनार्‍या सरकारला अण्णांच्या आंदोलनामुळे जनतेपुढे लोटांगण घालावे लागले. अण्णा हजारे यांना आज सकाळी सातच्या सुमारास अटक करण्यात आली. अण्णांना अटक करून त्यांच्यावर 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली यासाठी अण्णांची आणि अण्णांच्या सात सहकार्‍यांची तिहार तुरूंगात रवानगी करण्यात आली. सकाळी अण्णांना ताब्यात घेतल्यापासूनच देशभरात जनआंदोलनाचा भडका उडाला. ठिकठिकाणी रॅलीज, मोर्चे काढून सरकारचा निषेध करण्यात आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेचजण या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.सरकारने मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपल्या कारवाईचं समर्थन केले. अण्णांना तिहार जेलमध्ये घेऊन जाताना अण्णांच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. तर दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्या सभेतही अण्णांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. सिब्बल यांना काळे झेंडे दाखवत त्यांनी निषेध व्यक्त केला.जनतेच्या या रेट्यापुढे सरकारला सपेशल माघारा घ्यावा लागला आणि अण्णांना सोडण्यात यावा असा आदेश दिला. दिल्ली पोलिसांनी अण्णांच्या सुटकेचं पत्र तिहार जेल प्रशासनाकडे पोहचले आहे. राहुल गांधींच्या मध्यस्थीनंतर अण्णांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. अण्णांनी कायदा मोडू नये, यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. पण तशी स्थिती राहिली नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं कारण दिल्ली पोलिसांनी दिले. पण अण्णांच्या अटकेनंतर देशभरात उमटलेली संतापाची लाट पाहून सरकार घाबरले. जनतेच्या देशव्यापी आंदोलनामुळे अडचणीत येण्याची भीती सरकारला वाटतेय. त्यामुळेच अण्णांच्या सुटकेचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मात्र अण्णांनी तुरुंगाबाहेर येण्यास नकार दिला आहे. जे.पी.मैदानावर उपोषण करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अण्णांनी लावून धरली आहे. तिहार जेलबाहेर अण्णांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले आहे. अण्णा कधी बाहेर येतात यांची वाट पाहत आहे. दिवसभरातला घटनाक्रम आज सकाळी सहा वाजता दिल्लीचे पोलीस मयूर विहार परिसरातल्या सुप्रीम एनक्लेव्हमध्ये पोहोचले. याठिकाणी अण्णा आणि त्यांचे सहकारी थांबले होते. पोलिसांनी अण्णा, अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासह काही सहकार्‍यांना ताब्यात घेतले. ही बातमी पसरताच वातावरण तापले. लोक रस्त्यांवर उतरले. अण्णांच्या अटकेचं हे नाट्य दिवसभर सुरू होतं. अखेर संध्याकाळी त्यांच्यासह सात जणांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले. सकाळी 6 वाजता. ....दिल्लीतल्या मयूर विहार परिसरात सुप्रीम एनक्लेव्हमध्ये वातावरण कमालीचं तंग होतं. काहीतरी अघटीत होणार याची चाहूल सगळ्यांनाच लागली होती. कारण दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणी अण्णांच्या उंबरठ्यापर्यंत पोचणार होते. सकाळी 7 वाजता. दिल्ली पोलिसांच्या टीमने, टीम अण्णांचा दरवाजा ठोठावला. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल असं पोलिसांनी अण्णांच्या टीमला सांगितले. आणि पुढच्या 15 मिनिटांत अण्णा हजारे अरविंद केजरीवाल आणि आपल्या महत्त्वाच्या सहकार्‍यांसह फ्लॅट नंबर 280 मधून बाहेर पडले. सकाळी 8 वा. यावेळेपर्यंत अण्णांना ताब्यात घेतल्याची बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. आणि अण्णांच्या शेकडो समर्थकांनी अण्णांच्या गाडीकडे धाव घेतली. आणि तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.सकाळी 10 वा. आतापर्यंत शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि त्यांना उत्तर दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमकडे नेण्यात आले. तर अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांना सिव्हिल लाईन्सकडे नेण्यात आले. आता सरकारविरोधात लोकांचा आवाज बराच तापला होता.दुपारी 12 वा. अण्णांना अटक केल्याचे पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केले. त्यानंतर दिल्लीतील तरुण अण्णांना जिथं ठेवलं होतं, त्या सिव्हिल लाईन्स परिसरात जमले. धो धो पावसाची पर्वा न करता हे तरुण इथपर्यंत पोचले होते. दुपारी 1 वा. अण्णांना सिव्हिल लाईन्समधून गुपचूप दुसरीकडे हलवण्यात आले. आणि पुढचे दोन तास त्यांचा ठावठिकाणा लोकांपासून लपवण्यात आला.दुपारी 3 वा. अण्णांना कुठे ठेवलंय या प्रश्नाचा उलगडा अखेर दिल्ली पोलिसांनीच केला. आणि अण्णांना आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलंय, असं सांगितले.आणि दुपार उलटेपर्यंत सर्व शंका मिटल्या. अण्णा हजारे आणि त्यांच्या सात सहकार्‍यांना एका आठवड्याची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आणि त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. त्यामुळे वातारण अधिकच तापलं. छत्रसाल स्टेडियममध्ये ताब्यात असलेले अण्णांचे दीड हजार समर्थक आणि स्टेडियमच्या बाहेर जमलेला जनसमुदायात संतापाची लाट पसरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2011 07:12 PM IST

अण्णांचा मुक्काम तिहारमध्ये ; सरकार झुकले

16 ऑगस्ट

जनतेच्या रेट्यापुढे सरकार अखेर झुकले. अण्णांना देशभरातून मिळणारा पाठिंबा आणि गावागावपर्यंत पोहचलेल्या आंदोलनानंतर अखेर सरकारने सपशेल माघार घेतली. अण्णांची तिहार जेलमधून सुटका करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

पण अण्णांनी सुटकाकरून घेण्यास नकार दिला आहे. आपल्याला जे.पी. मैदानावर जाऊ द्यावे आणि आपल्या तिथे उपोषण करू द्यावे अशी मागणी अण्णांनी केली आहे. अण्णांच्या टीमची मात्र सुटका करण्यात आली आहे. अण्णांचे सातही सदस्य बाहेर आले आहे.

अण्णांचे सहकारी शिसोदिया बाहेर येऊन अण्णा हजारे एका अधिकार्‍यांच्या खोलीत आराम करत आहे. आपल्याला जे.पी.पार्कवर उपोषणासाठी बिनशर्त परवानगी देण्यात यावी अशी मागणी अण्णांनी केली आहे. पोलिसांनी अण्णांना सकाळी बाहेर काढण्याचा निर्धार केला आहे.

अण्णांचे आंदोलन चिरडण्याचा घाट रचनार्‍या सरकारला अण्णांच्या आंदोलनामुळे जनतेपुढे लोटांगण घालावे लागले. अण्णा हजारे यांना आज सकाळी सातच्या सुमारास अटक करण्यात आली. अण्णांना अटक करून त्यांच्यावर 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली यासाठी अण्णांची आणि अण्णांच्या सात सहकार्‍यांची तिहार तुरूंगात रवानगी करण्यात आली.

सकाळी अण्णांना ताब्यात घेतल्यापासूनच देशभरात जनआंदोलनाचा भडका उडाला. ठिकठिकाणी रॅलीज, मोर्चे काढून सरकारचा निषेध करण्यात आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेचजण या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.सरकारने मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपल्या कारवाईचं समर्थन केले. अण्णांना तिहार जेलमध्ये घेऊन जाताना अण्णांच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. तर दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्या सभेतही अण्णांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. सिब्बल यांना काळे झेंडे दाखवत त्यांनी निषेध व्यक्त केला.

जनतेच्या या रेट्यापुढे सरकारला सपेशल माघारा घ्यावा लागला आणि अण्णांना सोडण्यात यावा असा आदेश दिला. दिल्ली पोलिसांनी अण्णांच्या सुटकेचं पत्र तिहार जेल प्रशासनाकडे पोहचले आहे. राहुल गांधींच्या मध्यस्थीनंतर अण्णांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

अण्णांनी कायदा मोडू नये, यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. पण तशी स्थिती राहिली नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं कारण दिल्ली पोलिसांनी दिले. पण अण्णांच्या अटकेनंतर देशभरात उमटलेली संतापाची लाट पाहून सरकार घाबरले. जनतेच्या देशव्यापी आंदोलनामुळे अडचणीत येण्याची भीती सरकारला वाटतेय.

त्यामुळेच अण्णांच्या सुटकेचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मात्र अण्णांनी तुरुंगाबाहेर येण्यास नकार दिला आहे. जे.पी.मैदानावर उपोषण करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी अण्णांनी लावून धरली आहे. तिहार जेलबाहेर अण्णांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले आहे. अण्णा कधी बाहेर येतात यांची वाट पाहत आहे.

दिवसभरातला घटनाक्रम

आज सकाळी सहा वाजता दिल्लीचे पोलीस मयूर विहार परिसरातल्या सुप्रीम एनक्लेव्हमध्ये पोहोचले. याठिकाणी अण्णा आणि त्यांचे सहकारी थांबले होते. पोलिसांनी अण्णा, अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्यासह काही सहकार्‍यांना ताब्यात घेतले. ही बातमी पसरताच वातावरण तापले. लोक रस्त्यांवर उतरले. अण्णांच्या अटकेचं हे नाट्य दिवसभर सुरू होतं. अखेर संध्याकाळी त्यांच्यासह सात जणांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले.

सकाळी 6 वाजता. ....दिल्लीतल्या मयूर विहार परिसरात सुप्रीम एनक्लेव्हमध्ये वातावरण कमालीचं तंग होतं. काहीतरी अघटीत होणार याची चाहूल सगळ्यांनाच लागली होती. कारण दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणी अण्णांच्या उंबरठ्यापर्यंत पोचणार होते.

सकाळी 7 वाजता. दिल्ली पोलिसांच्या टीमने, टीम अण्णांचा दरवाजा ठोठावला. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल असं पोलिसांनी अण्णांच्या टीमला सांगितले. आणि पुढच्या 15 मिनिटांत अण्णा हजारे अरविंद केजरीवाल आणि आपल्या महत्त्वाच्या सहकार्‍यांसह फ्लॅट नंबर 280 मधून बाहेर पडले.

सकाळी 8 वा. यावेळेपर्यंत अण्णांना ताब्यात घेतल्याची बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. आणि अण्णांच्या शेकडो समर्थकांनी अण्णांच्या गाडीकडे धाव घेतली. आणि तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

सकाळी 10 वा. आतापर्यंत शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि त्यांना उत्तर दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमकडे नेण्यात आले. तर अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांना सिव्हिल लाईन्सकडे नेण्यात आले. आता सरकारविरोधात लोकांचा आवाज बराच तापला होता.दुपारी 12 वा. अण्णांना अटक केल्याचे पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केले. त्यानंतर दिल्लीतील तरुण अण्णांना जिथं ठेवलं होतं, त्या सिव्हिल लाईन्स परिसरात जमले. धो धो पावसाची पर्वा न करता हे तरुण इथपर्यंत पोचले होते. दुपारी 1 वा. अण्णांना सिव्हिल लाईन्समधून गुपचूप दुसरीकडे हलवण्यात आले. आणि पुढचे दोन तास त्यांचा ठावठिकाणा लोकांपासून लपवण्यात आला.दुपारी 3 वा. अण्णांना कुठे ठेवलंय या प्रश्नाचा उलगडा अखेर दिल्ली पोलिसांनीच केला. आणि अण्णांना आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलंय, असं सांगितले.

आणि दुपार उलटेपर्यंत सर्व शंका मिटल्या. अण्णा हजारे आणि त्यांच्या सात सहकार्‍यांना एका आठवड्याची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आणि त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. त्यामुळे वातारण अधिकच तापलं. छत्रसाल स्टेडियममध्ये ताब्यात असलेले अण्णांचे दीड हजार समर्थक आणि स्टेडियमच्या बाहेर जमलेला जनसमुदायात संतापाची लाट पसरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2011 07:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close