S M L

ये मशालें जलती रहेंगी - अण्णा हजारे

19 ऑगस्टही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याची वेळ आली आहे. अण्णा रहे या न रहे ये मशालें जलती रहेंगी'असं म्हणत अण्णांनी मायापुरीकडे कुच केली. तिहार तुरूगाबाहेर आल्यानंतर अण्णांनी इन्कालाब जिंदाबाद, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. आपलं आंदोलन शांतेत सुरू ठेवा असं आवाहन ही अण्णांनी यावेळी केलं. सकाळी 11 वाजून 40 मिनीटांनी तिहार जेलच्या गेटमधून अण्णा हजारे बाहेर आले आणि जेलबाहेर जमलेल्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. या प्रचंड जनसमुदायाने अण्णांचं घोषणांच्या निनादात स्वागत केलं. त्यावेळी अण्णांनी सगळ्यांना अभिवादन केलं. हात हलवून सगळ्यांचे आभार व्यक्त केले.अण्णांनी माईक हातात घेतला. त्यावेळी ते काय बोलतात याकडे सगळेच कानात प्राण आणून ऐकत होते. वंदे मातरम्‌चा नारा अण्णांनी देताच स्फूर्तीची एक लहरच समर्थकांमध्ये पसरली. स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईचं रणशिंग फुंकत यावेळी अण्णांनी लढ्याच्या मशाली पेटत्या ठेवण्याचे आवाहन देशवासियांना केलं. निर्णायक तरी शांततापूर्ण आवाहन करण्याच आवाहन करत मग अण्णा त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या उघड्या ट्रकमध्ये चढले आणि मायापुरी परिसराकडे रवाना झाले. त्यावेळी रस्त्यावर आलेल्या दिल्लीकरांनी त्यांचं मोठं स्वागत केलं. अण्णांनीही त्यांचे आभार व्यक्त केले. मायापुरीहून राजघाटावर जाऊन अण्णा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतील, नंतर रामलीला मैदानावर अण्णा दाखल झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2011 06:43 AM IST

ये मशालें जलती रहेंगी - अण्णा हजारे

19 ऑगस्ट

ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याची वेळ आली आहे. अण्णा रहे या न रहे ये मशालें जलती रहेंगी'असं म्हणत अण्णांनी मायापुरीकडे कुच केली. तिहार तुरूगाबाहेर आल्यानंतर अण्णांनी इन्कालाब जिंदाबाद, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. आपलं आंदोलन शांतेत सुरू ठेवा असं आवाहन ही अण्णांनी यावेळी केलं. सकाळी 11 वाजून 40 मिनीटांनी तिहार जेलच्या गेटमधून अण्णा हजारे बाहेर आले आणि जेलबाहेर जमलेल्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. या प्रचंड जनसमुदायाने अण्णांचं घोषणांच्या निनादात स्वागत केलं. त्यावेळी अण्णांनी सगळ्यांना अभिवादन केलं. हात हलवून सगळ्यांचे आभार व्यक्त केले.

अण्णांनी माईक हातात घेतला. त्यावेळी ते काय बोलतात याकडे सगळेच कानात प्राण आणून ऐकत होते. वंदे मातरम्‌चा नारा अण्णांनी देताच स्फूर्तीची एक लहरच समर्थकांमध्ये पसरली. स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईचं रणशिंग फुंकत यावेळी अण्णांनी लढ्याच्या मशाली पेटत्या ठेवण्याचे आवाहन देशवासियांना केलं.

निर्णायक तरी शांततापूर्ण आवाहन करण्याच आवाहन करत मग अण्णा त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या उघड्या ट्रकमध्ये चढले आणि मायापुरी परिसराकडे रवाना झाले. त्यावेळी रस्त्यावर आलेल्या दिल्लीकरांनी त्यांचं मोठं स्वागत केलं. अण्णांनीही त्यांचे आभार व्यक्त केले. मायापुरीहून राजघाटावर जाऊन अण्णा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतील, नंतर रामलीला मैदानावर अण्णा दाखल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2011 06:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close