S M L

प्रभावी 'लोकपाल'साठी प्रयत्नशील - पंतप्रधान

20 ऑगस्टसरकार प्रभावी लोकपाल आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण 30 ऑगस्टपर्यंत लोकपाल विधेयक मंजूर होणं कठीण आहे असं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. अण्णा हजारे यांनी 30 ऑगस्टपर्यंत लोकपाल विधेयक मंजूर व्हावं अशी मागणी केली होती. त्यावर पंतप्रधानांनी हे स्पष्टीकरण दिले.लोकपाल बिलासाठी सगळ्यांचीच मागणी होती. म्हणून संसदेत विधेयक मांडलं. मात्र विधेयकाच्या सुधारणांसदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येण गरजेचं आहे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. काल शुक्रवारी अण्णांच्या टीमने रामलीला मैदानावर घेतल्या पत्रकार परिषद घेतली. 30 तारखेपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर करावे तरच आपण उपोषण मागे घेऊ अन्यथा देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा टीमने दिला. जनलोकपाल मंजूर झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार अण्णांनी व्यक्त केला. आज पंतप्रधानांनी अण्णांच्या विधानाला उत्तर दिले. 30 ऑगस्टपर्यंत विधेयक पास करणे अशक्य आहे. कोणतही विधेयक पास करायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र्य समिती असते त्यासाठी वेगळी कार्यपध्दती आहे. हे ही विधेयक पास करायचे असेल तर ते याच पध्दतीनुसारच करावे लागले. त्यामुळे हे विधेयक 30 ऑगस्टपर्यंत मंजूर करणे अशक्य आहे. आम्हीही हीच अपेक्षा करतो कि एक चांगले आणि सक्षम लोकपाल विधेयक तयार व्हावे. या विधेयकासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असं पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अण्णांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. आपलं वजन साडे तीन किलोनं कमी झालं असून थोडा अशक्तपणा वाटत असल्याचे अण्णांनी आज सकाळी सांगितले. पण जनलोकपाल विधेयक येईपर्यंत माघार घेणार नसल्याचे अण्णांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. समर्थकांनी माझ्या प्रकृतीची काळजी करु नये, मी अजूनही लढा देण्यासाठी सक्षम आहे असं अण्णांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2011 09:33 AM IST

प्रभावी 'लोकपाल'साठी प्रयत्नशील - पंतप्रधान

20 ऑगस्ट

सरकार प्रभावी लोकपाल आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण 30 ऑगस्टपर्यंत लोकपाल विधेयक मंजूर होणं कठीण आहे असं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. अण्णा हजारे यांनी 30 ऑगस्टपर्यंत लोकपाल विधेयक मंजूर व्हावं अशी मागणी केली होती. त्यावर पंतप्रधानांनी हे स्पष्टीकरण दिले.लोकपाल बिलासाठी सगळ्यांचीच मागणी होती. म्हणून संसदेत विधेयक मांडलं. मात्र विधेयकाच्या सुधारणांसदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येण गरजेचं आहे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.

काल शुक्रवारी अण्णांच्या टीमने रामलीला मैदानावर घेतल्या पत्रकार परिषद घेतली. 30 तारखेपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर करावे तरच आपण उपोषण मागे घेऊ अन्यथा देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा टीमने दिला. जनलोकपाल मंजूर झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार अण्णांनी व्यक्त केला.

आज पंतप्रधानांनी अण्णांच्या विधानाला उत्तर दिले. 30 ऑगस्टपर्यंत विधेयक पास करणे अशक्य आहे. कोणतही विधेयक पास करायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र्य समिती असते त्यासाठी वेगळी कार्यपध्दती आहे. हे ही विधेयक पास करायचे असेल तर ते याच पध्दतीनुसारच करावे लागले. त्यामुळे हे विधेयक 30 ऑगस्टपर्यंत मंजूर करणे अशक्य आहे. आम्हीही हीच अपेक्षा करतो कि एक चांगले आणि सक्षम लोकपाल विधेयक तयार व्हावे. या विधेयकासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असं पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान अण्णांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. आपलं वजन साडे तीन किलोनं कमी झालं असून थोडा अशक्तपणा वाटत असल्याचे अण्णांनी आज सकाळी सांगितले. पण जनलोकपाल विधेयक येईपर्यंत माघार घेणार नसल्याचे अण्णांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. समर्थकांनी माझ्या प्रकृतीची काळजी करु नये, मी अजूनही लढा देण्यासाठी सक्षम आहे असं अण्णांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2011 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close