S M L

अण्णांच्या टीमला सरकारचा हक्कभंगाचा इशारा

20 ऑगस्टसंसदेच्या स्थायी समितीच्या वतीने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीवर टीम अण्णांच्या काही सदस्यांनी टीका केल्यानंतर आता हे प्रकरण गंभीर झालं आहे. नारायण सामींनी टीम अण्णांना संसदेच्या कामकाजावर टीका करणे हे संसदेचा अवमान करण्यासारखे या प्रकरणात हक्कभंग आणला जाऊ शकतो. असा इशारा सामी यांनी दिला.एकीकडे सरकार अण्णांशी चर्चेची तयारी दाखवतं आहे. तर दुसरीकडे स्थायी समितीने सरकारने मांडलेल्या लोकपाल विधेयकावर लोकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. सरकारने 4 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडलेल्या लोकपाल बिलासंदर्भात सूचना मागवल्या आहेत. देशातील काही प्रमुख वर्तमानपत्रातून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचना 4 सप्टेंबरपर्यंत देण्याची मुदत आहे. दरम्यान, केंद्रातील यूपीए सरकार आम्हाला पुन्हा दगा देऊ शकतं. म्हणून अण्णांनी काल भूमिका बदलली. आणि मागणी केली की जोपर्यंत सरकार जनलोकपाल बिल पास करत नाही. तोपर्यंत अण्णांचे उपोषण सुरूच राहील. केंद्र सरकारचा आतापर्यंतचा प्रतिसाद दुदैर्वी आहे असंही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2011 04:32 PM IST

अण्णांच्या टीमला सरकारचा हक्कभंगाचा इशारा

20 ऑगस्ट

संसदेच्या स्थायी समितीच्या वतीने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीवर टीम अण्णांच्या काही सदस्यांनी टीका केल्यानंतर आता हे प्रकरण गंभीर झालं आहे. नारायण सामींनी टीम अण्णांना संसदेच्या कामकाजावर टीका करणे हे संसदेचा अवमान करण्यासारखे या प्रकरणात हक्कभंग आणला जाऊ शकतो. असा इशारा सामी यांनी दिला.

एकीकडे सरकार अण्णांशी चर्चेची तयारी दाखवतं आहे. तर दुसरीकडे स्थायी समितीने सरकारने मांडलेल्या लोकपाल विधेयकावर लोकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. सरकारने 4 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडलेल्या लोकपाल बिलासंदर्भात सूचना मागवल्या आहेत. देशातील काही प्रमुख वर्तमानपत्रातून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचना 4 सप्टेंबरपर्यंत देण्याची मुदत आहे.

दरम्यान, केंद्रातील यूपीए सरकार आम्हाला पुन्हा दगा देऊ शकतं. म्हणून अण्णांनी काल भूमिका बदलली. आणि मागणी केली की जोपर्यंत सरकार जनलोकपाल बिल पास करत नाही. तोपर्यंत अण्णांचे उपोषण सुरूच राहील. केंद्र सरकारचा आतापर्यंतचा प्रतिसाद दुदैर्वी आहे असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2011 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close