S M L

अण्णांना पाठिंबा : पुण्यात कलावंतांची रॅली

22 ऑगस्टपुण्यामध्ये संगीत आणि नाट्य क्षेत्रातल्या कलावंतांनी अण्णा हजारेंना पाठिंबा व्यक्त करत रॅली काढली. देशभक्तीपर गीतं गात या कलाकारांनी जनलोकपाल बिलाला पाठिंबा व्यक्त केला. कोथरूड परिसरातील अलंकार पोलीस चौकीजवळ या रॅलीला सुरुवात झाली. रॅली काढून हे सर्व कलाकार एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणालाही बसले. यावेळी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी कविता म्हणून तर मधुरा दातार, केतकी आणि सुवर्णा माटेगावकर यांनी गाणं गाऊन अण्णांना पाठिंबा दिला तर ज्येष्ठ गायक अरूण दाते यांनी कलाकारांची पाठिंब्यांची भूमिका सांगितली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 22, 2011 02:38 PM IST

अण्णांना पाठिंबा : पुण्यात कलावंतांची रॅली

22 ऑगस्ट

पुण्यामध्ये संगीत आणि नाट्य क्षेत्रातल्या कलावंतांनी अण्णा हजारेंना पाठिंबा व्यक्त करत रॅली काढली. देशभक्तीपर गीतं गात या कलाकारांनी जनलोकपाल बिलाला पाठिंबा व्यक्त केला. कोथरूड परिसरातील अलंकार पोलीस चौकीजवळ या रॅलीला सुरुवात झाली. रॅली काढून हे सर्व कलाकार एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणालाही बसले. यावेळी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी कविता म्हणून तर मधुरा दातार, केतकी आणि सुवर्णा माटेगावकर यांनी गाणं गाऊन अण्णांना पाठिंबा दिला तर ज्येष्ठ गायक अरूण दाते यांनी कलाकारांची पाठिंब्यांची भूमिका सांगितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2011 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close