S M L

अण्णांचा कल आजमावण्याचा प्रयत्न

21 ऑगस्टअण्णा हजारे आणि सरकार यांच्यात चर्चेचे संकेत मिळत असतानाच संध्याकाळी अण्णा हजारे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. 30 ऑगस्टपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर झालंच पाहिजे. नाहीतर सरकारला सत्तेतून जावं लागेल, असं अण्णांनी ठणकावलं. 30 तारखेची डेडलाईन सरकारने पाळली नाही तर आंदोलन तीव्र करा. देशासाठी बलिदान केलेल्या शहिदांचा विसर पडू देऊ नका, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. उपोषणाला सहा दिवस होऊनही अण्णांचा उत्साह कायम आहे. दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी केंद्र सरकारने टीम अण्णांशी चर्चा करायला पुढाकार घेतला. लोकपालचा तिढा सोडवण्यासाठी टीम अण्णांशी अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू आहे अशी माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री हरीश रावत यांनी दिली. दरम्यान, इंदूरचे भैय्यूजी महाराज यांनीही अण्णांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांचीही भेट घेतली. आज अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी अण्णांची रामलीला मैदानात भेट घेतली. लोकांना आपल्या शक्तीची जाणीव झाली. संपूर्ण देश अण्णांच्या सोबत आहे, अण्णांचा विजय निश्चित आहे, असं श्री श्री म्हणाले. प्रभावी लोकपालाची देशाला गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अण्णांशी जवळचे संबंध असणार्‍या लोकांच्या माध्यमातून ही चर्चा करण्यात येतेय. अण्णांबद्दल सरकारला आदर आहे आणि चर्चेतून लवकरच काहीतरी तोडगा निघेल अशी आशाही रावत यांनी व्यक्त केली. अण्णांनी घटनात्मक मर्यादा समजूत घ्याव्यात, असं आवाहन त्यांनी केले. लोकपाल विधेयक संसदेच्या स्थायी समितीपुढे आहे. आणि ते मंजूर करण्यासाठी विशिष्ट डेडलाईन पाळणं शक्य नाही असं रावत यांनी स्पष्ट केले. मुख्य लढा हा भ्रष्टाचाराविरोधात असल्यानं टीम अण्णा आणि सरकार यांचा अंतिम उद्देश एकच आहे असंही रावत यांनी म्हटलं. दरम्यान,आज आंदोलकांनी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घराबाहेरही धरण आंदोलन करा आणि त्यांना विचारा तुम्ही खरचं जनलोकपालला पाठिंबा देताय का की फक्त गप्पा मारतात आणि जर त्यांना काही मुद्दे पटत नसतील तर त्यांनी इथं यावे आणि आमच्याशी चर्चा करावी. आम्ही त्यांच्याशीही चर्चा करायला तयार आहोत असं आवाहन टीम अण्णांनी केलं. अण्णांच्या या आवाहनानंतर आंदोलकांनी अनेक खासदारांच्या घरासमोर निदर्शनं केली. त्याचबरोबर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सेव्हन रेस कोर्स येथील घरासमोरही आज अण्णागिरी करत आंदोलन करण्यात आलं.वाटाघाटीचा प्रयत्नअण्णांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांना दिल्लीला बोलावून घेतले. सरंगी यांनी गेल्या 24 तासात अण्णांची दोन वेळा भेट घेतली. सरंगी यांनी याआधी अनेक वेळा अण्णांच्या आंदोलनाच्यावेळी यशस्वी तोडगा काढला होता. त्यामुळे विलासराव देशमुख आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेशचंद्र सरंगी यांना अण्णा यांच्या उपोषणमध्ये मध्यस्थी करण्यासाठी दिल्लीला पाठवले. तर काँग्रेसचे खासदार कुमार अरण यांनी स्थायी समितीसमोर जनलोकपाल मसुदा मांडला. सरकार आणि नागरी समितीच्या मसुद्यावर निश्चित चर्चा होईल, आणि त्यातून आश्चर्यकारक निष्कर्ष बाहेर येऊ शकतो असं स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2011 05:27 PM IST

अण्णांचा कल आजमावण्याचा प्रयत्न

21 ऑगस्ट

अण्णा हजारे आणि सरकार यांच्यात चर्चेचे संकेत मिळत असतानाच संध्याकाळी अण्णा हजारे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. 30 ऑगस्टपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर झालंच पाहिजे. नाहीतर सरकारला सत्तेतून जावं लागेल, असं अण्णांनी ठणकावलं. 30 तारखेची डेडलाईन सरकारने पाळली नाही तर आंदोलन तीव्र करा. देशासाठी बलिदान केलेल्या शहिदांचा विसर पडू देऊ नका, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. उपोषणाला सहा दिवस होऊनही अण्णांचा उत्साह कायम आहे.

दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी केंद्र सरकारने टीम अण्णांशी चर्चा करायला पुढाकार घेतला. लोकपालचा तिढा सोडवण्यासाठी टीम अण्णांशी अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू आहे अशी माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री हरीश रावत यांनी दिली. दरम्यान, इंदूरचे भैय्यूजी महाराज यांनीही अण्णांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांचीही भेट घेतली.

आज अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी अण्णांची रामलीला मैदानात भेट घेतली. लोकांना आपल्या शक्तीची जाणीव झाली. संपूर्ण देश अण्णांच्या सोबत आहे, अण्णांचा विजय निश्चित आहे, असं श्री श्री म्हणाले. प्रभावी लोकपालाची देशाला गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

अण्णांशी जवळचे संबंध असणार्‍या लोकांच्या माध्यमातून ही चर्चा करण्यात येतेय. अण्णांबद्दल सरकारला आदर आहे आणि चर्चेतून लवकरच काहीतरी तोडगा निघेल अशी आशाही रावत यांनी व्यक्त केली. अण्णांनी घटनात्मक मर्यादा समजूत घ्याव्यात, असं आवाहन त्यांनी केले. लोकपाल विधेयक संसदेच्या स्थायी समितीपुढे आहे. आणि ते मंजूर करण्यासाठी विशिष्ट डेडलाईन पाळणं शक्य नाही असं रावत यांनी स्पष्ट केले. मुख्य लढा हा भ्रष्टाचाराविरोधात असल्यानं टीम अण्णा आणि सरकार यांचा अंतिम उद्देश एकच आहे असंही रावत यांनी म्हटलं.

दरम्यान,आज आंदोलकांनी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घराबाहेरही धरण आंदोलन करा आणि त्यांना विचारा तुम्ही खरचं जनलोकपालला पाठिंबा देताय का की फक्त गप्पा मारतात आणि जर त्यांना काही मुद्दे पटत नसतील तर त्यांनी इथं यावे आणि आमच्याशी चर्चा करावी.

आम्ही त्यांच्याशीही चर्चा करायला तयार आहोत असं आवाहन टीम अण्णांनी केलं. अण्णांच्या या आवाहनानंतर आंदोलकांनी अनेक खासदारांच्या घरासमोर निदर्शनं केली. त्याचबरोबर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सेव्हन रेस कोर्स येथील घरासमोरही आज अण्णागिरी करत आंदोलन करण्यात आलं.

वाटाघाटीचा प्रयत्न

अण्णांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांना दिल्लीला बोलावून घेतले. सरंगी यांनी गेल्या 24 तासात अण्णांची दोन वेळा भेट घेतली. सरंगी यांनी याआधी अनेक वेळा अण्णांच्या आंदोलनाच्यावेळी यशस्वी तोडगा काढला होता. त्यामुळे विलासराव देशमुख आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेशचंद्र सरंगी यांना अण्णा यांच्या उपोषणमध्ये मध्यस्थी करण्यासाठी दिल्लीला पाठवले. तर काँग्रेसचे खासदार कुमार अरण यांनी स्थायी समितीसमोर जनलोकपाल मसुदा मांडला. सरकार आणि नागरी समितीच्या मसुद्यावर निश्चित चर्चा होईल, आणि त्यातून आश्चर्यकारक निष्कर्ष बाहेर येऊ शकतो असं स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2011 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close