S M L

जनलोकपाल सुधारीत पुरवणी म्हणून मांडणार ?

22 ऑगस्टजनलोकपाल विधेयकावरील तिढा सोडवण्यासाठी सरकारने आता मार्ग काढण्याचा विचार केला आहे. जनलोकपाल हे सुधारीत पुरवणी विधेयक म्हणून मांडल जाणार आहे. संसदेच्या कार्यपद्धतीनुसार कायद्यात जी तरतूद आहे ती पाहता अशा पद्धतीने सुधारित विधेयक मांडता येऊ शकेल. मात्र सध्याचं सरकारनं सादर केलेलं सरकारी बिल परत घेण्याचा विचार नाही. अशी माहिती आयबीएन नेटवर्कच्या सुत्रांनी दिली आहे. मात्र या निर्णयावर उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.अण्णांच्या उपोषणाचा आज 7 वा दिवस आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील घरी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अण्णांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली .या बैठकीला अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबतच सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेलही हजर आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या बैठकीला हजर होते. तर संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनू सिंघवी यांनी आजही काहीशी आक्रमक भूमिकाच घेतली. सुधारणांसह नवं लोकपाल विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडू, असं सिंघवी यांनी म्हंटले आहे. तसेच पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या अडवाणींवरही यावेळी सिंघवी यांनी टीका केली. अडवाणी यांनी पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे असा टोला सिंघवी यांनी लगावला. काँग्रेसची श्री. श्री. रवीशंकर यांच्याकडे धावसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस अण्णांचे मन वळवण्याकरता श्री श्री रवीशंकर यांच्या संपर्कात आहे. श्री श्री रवीशंकर यांनी आज दुपारी रामलीलावर जाऊन अण्णांची भेट घेतली. या भेटीनंतर जेव्हा ते रामलीला मैदानातून बाहेर पडले तेव्हा त्यांना पत्रकारांनी गाठले. मात्र, "आत्ताच मी काही सांगू शकणार नाही," असं रवीशंकर यांनी यावेळी सांगितले. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवीशंकर यांच्याकडे कुठलाही ठोस पर्याय उपलब्ध नाही अशीही माहिती मिळत आहे. श्री श्री आता सर्वच राजकीय पक्षांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचीही माहिती पुढे येत आहे. आज त्यांनी अडवाणी आणि एनडीएच्या काही नेत्यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा केली होती.तिढा सुटण्यासाठी उपाय1. सरकारी लोकपाल विधेयक मागे घ्यावे2. अण्णांच्या टीमने जनलोकपाल विधेयकाबद्दलच्या आग्रहांवर अडून राहू नये3. टास्क फोर्सची स्थापना करण्यात यावींa. - टास्क फोर्समध्ये प्रतिष्ठित नागरिक, टीम अण्णा, सत्ताधारी आणि विरोधकb. - न्यायसंस्था आणि कॉर्पोरेट्स. सनदी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे सदस्यc. - प्रतिष्ठित नागरिक म्हणून नारायण मूर्ती, एपीजे अब्दुल कलाम, इला भट किंवा फली नरिमन यांचा समावेश शक्य4. - टास्क फोर्सने लोकपालसंदर्भातल्या सर्व मसुद्यांचा अभ्यास करुन सर्वसमावेशक मसुदा एक महिन्यात तयार करावाa. - लोकपाल विधेयकासंदर्भात चर्चा करण्यासाठी संसंदेचे एक विशेष अधिवेशन दिवाळी आधी बोलावता येईल 5. - दिवाळीमध्ये जनतेला सरकार नव्या लोकपाल विधेयकाची भेट देऊ शकते

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 22, 2011 04:21 PM IST

जनलोकपाल सुधारीत पुरवणी म्हणून मांडणार ?

22 ऑगस्टजनलोकपाल विधेयकावरील तिढा सोडवण्यासाठी सरकारने आता मार्ग काढण्याचा विचार केला आहे. जनलोकपाल हे सुधारीत पुरवणी विधेयक म्हणून मांडल जाणार आहे. संसदेच्या कार्यपद्धतीनुसार कायद्यात जी तरतूद आहे ती पाहता अशा पद्धतीने सुधारित विधेयक मांडता येऊ शकेल. मात्र सध्याचं सरकारनं सादर केलेलं सरकारी बिल परत घेण्याचा विचार नाही. अशी माहिती आयबीएन नेटवर्कच्या सुत्रांनी दिली आहे. मात्र या निर्णयावर उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

अण्णांच्या उपोषणाचा आज 7 वा दिवस आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील घरी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अण्णांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली .या बैठकीला अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबतच सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेलही हजर आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या बैठकीला हजर होते.

तर संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनू सिंघवी यांनी आजही काहीशी आक्रमक भूमिकाच घेतली. सुधारणांसह नवं लोकपाल विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडू, असं सिंघवी यांनी म्हंटले आहे. तसेच पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या अडवाणींवरही यावेळी सिंघवी यांनी टीका केली. अडवाणी यांनी पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे असा टोला सिंघवी यांनी लगावला.

काँग्रेसची श्री. श्री. रवीशंकर यांच्याकडे धाव

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस अण्णांचे मन वळवण्याकरता श्री श्री रवीशंकर यांच्या संपर्कात आहे. श्री श्री रवीशंकर यांनी आज दुपारी रामलीलावर जाऊन अण्णांची भेट घेतली. या भेटीनंतर जेव्हा ते रामलीला मैदानातून बाहेर पडले तेव्हा त्यांना पत्रकारांनी गाठले. मात्र, "आत्ताच मी काही सांगू शकणार नाही," असं रवीशंकर यांनी यावेळी सांगितले.

पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवीशंकर यांच्याकडे कुठलाही ठोस पर्याय उपलब्ध नाही अशीही माहिती मिळत आहे. श्री श्री आता सर्वच राजकीय पक्षांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचीही माहिती पुढे येत आहे. आज त्यांनी अडवाणी आणि एनडीएच्या काही नेत्यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा केली होती.तिढा सुटण्यासाठी उपाय

1. सरकारी लोकपाल विधेयक मागे घ्यावे2. अण्णांच्या टीमने जनलोकपाल विधेयकाबद्दलच्या आग्रहांवर अडून राहू नये3. टास्क फोर्सची स्थापना करण्यात यावींa. - टास्क फोर्समध्ये प्रतिष्ठित नागरिक, टीम अण्णा, सत्ताधारी आणि विरोधकb. - न्यायसंस्था आणि कॉर्पोरेट्स. सनदी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे सदस्यc. - प्रतिष्ठित नागरिक म्हणून नारायण मूर्ती, एपीजे अब्दुल कलाम, इला भट किंवा फली नरिमन यांचा समावेश शक्य4. - टास्क फोर्सने लोकपालसंदर्भातल्या सर्व मसुद्यांचा अभ्यास करुन सर्वसमावेशक मसुदा एक महिन्यात तयार करावाa. - लोकपाल विधेयकासंदर्भात चर्चा करण्यासाठी संसंदेचे एक विशेष अधिवेशन दिवाळी आधी बोलावता येईल 5. - दिवाळीमध्ये जनतेला सरकार नव्या लोकपाल विधेयकाची भेट देऊ शकते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2011 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close