S M L

लोकसभेच कामकाज स्थगित ; उद्या सर्वपक्षीय बैठक

23 ऑगस्टतीन दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेचे कामकाज आज पुन्हा सुरू झालं. पण अण्णा हजारेंच्या मुद्द्यावर प्रचंड गदारोळ झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी त्यासाठी दोन्ही सभागृहातील प्रश्नोत्तराचे तास रद्द करावेत अशी मागणी भाजपने लावून धरली. दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यावर भाजपने टीका केली. सरकारने अजूनपर्यंत काय केलं असा प्रश्न भाजपने विचारला. अण्णांच्या पाठिंब्यासाठी देशभरात निदर्शनं होत आहेत. विरोधी पक्षानंही आज निदर्शनं केली. भ्रष्टाचाराचा निषेध करत संसदेच्या बाहेर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शनं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2011 05:00 PM IST

लोकसभेच कामकाज स्थगित ; उद्या सर्वपक्षीय बैठक

23 ऑगस्ट

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेचे कामकाज आज पुन्हा सुरू झालं. पण अण्णा हजारेंच्या मुद्द्यावर प्रचंड गदारोळ झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी त्यासाठी दोन्ही सभागृहातील प्रश्नोत्तराचे तास रद्द करावेत अशी मागणी भाजपने लावून धरली. दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यावर भाजपने टीका केली. सरकारने अजूनपर्यंत काय केलं असा प्रश्न भाजपने विचारला. अण्णांच्या पाठिंब्यासाठी देशभरात निदर्शनं होत आहेत. विरोधी पक्षानंही आज निदर्शनं केली. भ्रष्टाचाराचा निषेध करत संसदेच्या बाहेर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2011 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close