S M L

'तिढा कायम, चर्चा निष्फळ'

24 ऑगस्टअण्णांच्या आंदोलनाच्या नवव्या दिवशी सरकारसोबतच्या चर्चेच्या तिसर्‍या फेरीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. सरकारसोबत सुरू असलेली चर्चा शून्यावर आली आहे असा दावा टीम अण्णाने केला आहे. सरकारने मंगळवारच्या चर्चेत जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासने फिरवल्याचा आरोप टीम अण्णाने केला आहे. बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत सरकारच्या प्रतिनिधींनी अतिशय उद्धट भाषेत चर्चा सुरू केल्याचा आरोपही टीम अण्णाने केला. तसेच अण्णांचं उपोषण ही तुमची समस्या आहे आमची नाही या शब्दात अंग झटकल्याचा दावाही टीम अण्णांनी केला. पण कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी ही चर्चा सकारात्मक झाली असून गुरूवारी आणखी चर्चा होऊ शकते असं सांगितले. दरम्यान, लोकपालच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक झाली. पण सर्वपक्षीय बैठकीनंतरही लोकपालचा तिढा कायमच आहे. सरकारी लोकपालच्या मसुद्यावर एकमत झालेलं नाही. हा मसुदा विरोधी पक्षांना अमान्य आहे. पण याचवेळी टीम अण्णांच्या डेडलाईनचा मुद्दा सर्वच पक्षांनी संसदेचं सार्वभौमत्व अबाधित राहण्याच्या दृष्टीने फेटाळला. सर्व पक्षनेत्यांमध्ये एका गोष्टीवर एकमत झालं ते म्हणजे अण्णांनी उपोषण सोडावे सर्वपक्षीय नेते अण्णांना उपोषण सोडण्याचे आवाहन करणार आहेत. सर्वपक्षीय बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन दिलं. या निवेदनात म्हटलंय की, संसदच सर्वोच्च आहे तिचं महत्व कमी होऊ नये. सक्षम लोकपाल बिलासाठी एकमत हवं 30 ऑगस्टची डेडलाईन मान्य नाही. अण्णांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच सर्व पक्षांचे अण्णांना आवाहन उपोषण सोडण्याचे आवाहन केले. यानंतर सरकारने टीम अण्णांना लोकपालचा तिढा सोडवण्यासाठी एक नवी ऑफर दिली. - नवं सुधारीत लोकपाल विधेयक संसेदत मांडणार - पण त्यासाठी विशिष्ट मुदत द्यायला सरकारचा नकार- नव्या विधेयकात टीम अण्णा आणि इतरांनी सूचवलेल्या सुधारणांचा समावेश करणार - नव्या विधेयकात पंतप्रधान आणि सीबीआयचा लोकपाल कक्षेत समावेश असेल - सर्व राज्यांत लोकायुक्त नेमणं आणि कनिष्ठ अधिकार्‍यांचा लोकपालमध्ये समावेश करणं, या मुद्द्यांवर मात्र मतभेद कायम आहेत. मतभेदाचे मुद्देटीम अण्णा - सर्व राज्यांतल्या लोकायुक्तांचा लोकपाल कक्षेत समावेश करा सरकार - यासाठी व्यापक चर्चा गरजेची टीम अण्णा - कनिष्ठ अधिकार्‍यांचा लोकपालमध्ये समावेश करासरकार - यासाठी राज्य सरकारांशी चर्चा करायला हवीअण्णांची प्रकृती नवव्या दिवशी खालावली आहे. कालपर्यंत अण्णांचे वजन पाच किलो 60 ग्रॅमने कमी झालं होतं आज अण्णांचं वजन आणखी 200 ग्रॅमनं कमी झालंय. काही वेळापूर्वीच जाहीर झालेल्या अण्णांच्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. काल पंतप्रधानांनी पत्र पाठवून अण्णांना उपोषण सोडण्याचं आवाहनं केलं होतं.आजही पंतप्रधानांनी अण्णांना आवाहन केलं की अण्णांनी ग्लुकोज घ्यावं. पण अण्णा मात्र उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2011 05:33 PM IST

'तिढा कायम, चर्चा निष्फळ'

24 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाच्या नवव्या दिवशी सरकारसोबतच्या चर्चेच्या तिसर्‍या फेरीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. सरकारसोबत सुरू असलेली चर्चा शून्यावर आली आहे असा दावा टीम अण्णाने केला आहे. सरकारने मंगळवारच्या चर्चेत जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासने फिरवल्याचा आरोप टीम अण्णाने केला आहे.

बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत सरकारच्या प्रतिनिधींनी अतिशय उद्धट भाषेत चर्चा सुरू केल्याचा आरोपही टीम अण्णाने केला. तसेच अण्णांचं उपोषण ही तुमची समस्या आहे आमची नाही या शब्दात अंग झटकल्याचा दावाही टीम अण्णांनी केला. पण कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी ही चर्चा सकारात्मक झाली असून गुरूवारी आणखी चर्चा होऊ शकते असं सांगितले.

दरम्यान, लोकपालच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक झाली. पण सर्वपक्षीय बैठकीनंतरही लोकपालचा तिढा कायमच आहे. सरकारी लोकपालच्या मसुद्यावर एकमत झालेलं नाही. हा मसुदा विरोधी पक्षांना अमान्य आहे. पण याचवेळी टीम अण्णांच्या डेडलाईनचा मुद्दा सर्वच पक्षांनी संसदेचं सार्वभौमत्व अबाधित राहण्याच्या दृष्टीने फेटाळला.

सर्व पक्षनेत्यांमध्ये एका गोष्टीवर एकमत झालं ते म्हणजे अण्णांनी उपोषण सोडावे सर्वपक्षीय नेते अण्णांना उपोषण सोडण्याचे आवाहन करणार आहेत. सर्वपक्षीय बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन दिलं. या निवेदनात म्हटलंय की, संसदच सर्वोच्च आहे तिचं महत्व कमी होऊ नये. सक्षम लोकपाल बिलासाठी एकमत हवं 30 ऑगस्टची डेडलाईन मान्य नाही. अण्णांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच सर्व पक्षांचे अण्णांना आवाहन उपोषण सोडण्याचे आवाहन केले.

यानंतर सरकारने टीम अण्णांना लोकपालचा तिढा सोडवण्यासाठी एक नवी ऑफर दिली. - नवं सुधारीत लोकपाल विधेयक संसेदत मांडणार - पण त्यासाठी विशिष्ट मुदत द्यायला सरकारचा नकार- नव्या विधेयकात टीम अण्णा आणि इतरांनी सूचवलेल्या सुधारणांचा समावेश करणार - नव्या विधेयकात पंतप्रधान आणि सीबीआयचा लोकपाल कक्षेत समावेश असेल - सर्व राज्यांत लोकायुक्त नेमणं आणि कनिष्ठ अधिकार्‍यांचा लोकपालमध्ये समावेश करणं, या मुद्द्यांवर मात्र मतभेद कायम आहेत.

मतभेदाचे मुद्दे

टीम अण्णा - सर्व राज्यांतल्या लोकायुक्तांचा लोकपाल कक्षेत समावेश करा सरकार - यासाठी व्यापक चर्चा गरजेची टीम अण्णा - कनिष्ठ अधिकार्‍यांचा लोकपालमध्ये समावेश करासरकार - यासाठी राज्य सरकारांशी चर्चा करायला हवी

अण्णांची प्रकृती नवव्या दिवशी खालावली आहे. कालपर्यंत अण्णांचे वजन पाच किलो 60 ग्रॅमने कमी झालं होतं आज अण्णांचं वजन आणखी 200 ग्रॅमनं कमी झालंय. काही वेळापूर्वीच जाहीर झालेल्या अण्णांच्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. काल पंतप्रधानांनी पत्र पाठवून अण्णांना उपोषण सोडण्याचं आवाहनं केलं होतं.आजही पंतप्रधानांनी अण्णांना आवाहन केलं की अण्णांनी ग्लुकोज घ्यावं. पण अण्णा मात्र उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2011 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close