S M L

मला अटक केली तर जेलभरो करा - अण्णा हजारे

24 ऑगस्टसरकार हुकूमशाही पध्दतीचा अवलंब करत आहे. मला जर सरकारने अटक केली तर पर्वा नाही मी स्वखुशींने अटक करून घेईल. पण आपल्या आंदोलन अहिंसक मार्गाने करायचे आहे. कोणतीही हिंसा करू नका आज मला अटक केली तर उद्या सर्वांनी संसदेला घेरावा घाला, खासदारांच्या घरापुढे धरणे धरा आणि देशभर जेलभरो आंदोलन उभे करा असं आवाहन अण्णा हजारे यांनी आपल्या समर्थकांनी दिले. आज मध्यरात्री किंवा पहाटे अण्णांना पोलीस जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणार अशी भीती किरण बेदी यांनी व्यक्त केली.आज अण्णांच्या आंदोलनाच्या नवव्या दिवशी दिल्लीत घडामोडींना कमालीचा वेग आला. टीम अण्णा आणि सरकारमध्ये दोन वेळा बैठकी पार पडल्या पण कोणताही तोडगा मात्र निघू शकला नाही. संध्याकाळी झाले बैठकीत सरकारने आक्रमक भूमिका घेतली. सरकारने मंगळवारच्या चर्चेत जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासने फिरवल्याचा आरोप टीम अण्णाने केला आहे. बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत सरकारच्या प्रतिनिधींनी अतिशय उद्धट भाषेत चर्चा सुरू केल्याचा आरोपही टीम अण्णाने केला. तसेच अण्णांचं उपोषण ही तुमची समस्या आहे आमची नाही या शब्दात अंग झटकल्याचा दावाही टीम अण्णांनी केला. पण कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी ही चर्चा सकारात्मक झाली असून गुरूवारी आणखी चर्चा होऊ शकते असं सांगितले. यानंतर टीम अण्णांनी रामलीला मैदानावर समर्थकांशी संवाद साधला. यावेळी किरण बेदी यांनी अण्णांना मध्यरात्री किंवा पहाटे पोलीस जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकते अशी भीती व्यक्त केली. मात्र अण्णांनी माझी तब्येत उत्तम आहे. मी अजून दोन किलोमीटर आपल्या धावून दाखवू शकतो. मला जर आज पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर तुम्ही सर्व समोर उभे ठाका असं आवाहन रामलीलावरील समर्थकांना केलं. मला अटक जरी झाली तर संयम राखा. आपलं आंदोलन हे आतापर्यंत अहिंसक मार्गाने इथं पर्यंत आलं आहे. आज हे आंदोलन जगासाठी आदर्श आहे. पण उद्या सर्वांनी संसदेला घेरावा घाला, खासदारांच्या घरापुढे धरणे धरा देशभरात जेलभरो आंदोलन उभे करा असं आवाहन अण्णांनी केलं. त्यांचं बरोबर आपल्या समर्थकांना विनंतीही केली. सार्वजनिक संपत्तीची तोडफोड करू नका, गोंधळ घालू नका कोणतही हिंसक कृत्य करू नका अशी विनंतीही अण्णांना केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2011 06:32 PM IST

मला अटक केली तर जेलभरो करा - अण्णा हजारे

24 ऑगस्ट

सरकार हुकूमशाही पध्दतीचा अवलंब करत आहे. मला जर सरकारने अटक केली तर पर्वा नाही मी स्वखुशींने अटक करून घेईल. पण आपल्या आंदोलन अहिंसक मार्गाने करायचे आहे. कोणतीही हिंसा करू नका आज मला अटक केली तर उद्या सर्वांनी संसदेला घेरावा घाला, खासदारांच्या घरापुढे धरणे धरा आणि देशभर जेलभरो आंदोलन उभे करा असं आवाहन अण्णा हजारे यांनी आपल्या समर्थकांनी दिले. आज मध्यरात्री किंवा पहाटे अण्णांना पोलीस जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणार अशी भीती किरण बेदी यांनी व्यक्त केली.

आज अण्णांच्या आंदोलनाच्या नवव्या दिवशी दिल्लीत घडामोडींना कमालीचा वेग आला. टीम अण्णा आणि सरकारमध्ये दोन वेळा बैठकी पार पडल्या पण कोणताही तोडगा मात्र निघू शकला नाही. संध्याकाळी झाले बैठकीत सरकारने आक्रमक भूमिका घेतली. सरकारने मंगळवारच्या चर्चेत जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासने फिरवल्याचा आरोप टीम अण्णाने केला आहे.

बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत सरकारच्या प्रतिनिधींनी अतिशय उद्धट भाषेत चर्चा सुरू केल्याचा आरोपही टीम अण्णाने केला. तसेच अण्णांचं उपोषण ही तुमची समस्या आहे आमची नाही या शब्दात अंग झटकल्याचा दावाही टीम अण्णांनी केला. पण कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी ही चर्चा सकारात्मक झाली असून गुरूवारी आणखी चर्चा होऊ शकते असं सांगितले. यानंतर टीम अण्णांनी रामलीला मैदानावर समर्थकांशी संवाद साधला.

यावेळी किरण बेदी यांनी अण्णांना मध्यरात्री किंवा पहाटे पोलीस जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकते अशी भीती व्यक्त केली. मात्र अण्णांनी माझी तब्येत उत्तम आहे. मी अजून दोन किलोमीटर आपल्या धावून दाखवू शकतो. मला जर आज पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर तुम्ही सर्व समोर उभे ठाका असं आवाहन रामलीलावरील समर्थकांना केलं. मला अटक जरी झाली तर संयम राखा.

आपलं आंदोलन हे आतापर्यंत अहिंसक मार्गाने इथं पर्यंत आलं आहे. आज हे आंदोलन जगासाठी आदर्श आहे. पण उद्या सर्वांनी संसदेला घेरावा घाला, खासदारांच्या घरापुढे धरणे धरा देशभरात जेलभरो आंदोलन उभे करा असं आवाहन अण्णांनी केलं. त्यांचं बरोबर आपल्या समर्थकांना विनंतीही केली. सार्वजनिक संपत्तीची तोडफोड करू नका, गोंधळ घालू नका कोणतही हिंसक कृत्य करू नका अशी विनंतीही अण्णांना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2011 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close