S M L

अण्णांसाठी 120 वर्षांच्या इतिहासात धोबीघाट राहणार बंद

27 ऑगस्टमहाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबई शहराची 'सफेदी' कायम राखणार्‍या धोबीघाट अण्णांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवस बंद राहणार आहे. हा एक दिवसाचा बंद धोबीघाटच्या इतिहासात 120 वर्षांनी आला आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल धोबीघाट संघटनेने उचलले आहे. भ्रष्टाचारविरोधात अण्णांनी पुकारलेले जनआंदोलन आज ऐतिहासिक टप्प्यावर येऊन ठेपले आहे. लोकसभेत जनलोकपालवर चर्चा सुरू आहे. गेल्या 12 दिवसांपासून अण्णांचे उपोषण सुरू आहे. अण्णांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून नागरिकांनी आंदोलन,मोर्चा, मेणबत्ती मोर्चा काढून आपला पाठिंबा दिला आहे. मुंबईची आन बान आणि शान असणार्‍या डब्बेवाले यांनी ही आपल्या 120 वर्षांच्या कारर्किदीत पहिल्यांदा संप पुकारला होता. आणि तो यशस्वी पार ही पडला. तसेच मुंबईच्या आझाद मैदानावर निघालेल्या महामोर्चात उत्स्फूर्त सहभागही घेतला होता. आता त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत धोबीघाट सुध्दा 120 वर्षांनी अण्णांनी पाठिंबा देण्यासाठी बंद राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2011 08:41 AM IST

अण्णांसाठी 120 वर्षांच्या इतिहासात धोबीघाट राहणार बंद

27 ऑगस्ट

महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबई शहराची 'सफेदी' कायम राखणार्‍या धोबीघाट अण्णांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवस बंद राहणार आहे. हा एक दिवसाचा बंद धोबीघाटच्या इतिहासात 120 वर्षांनी आला आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल धोबीघाट संघटनेने उचलले आहे.

भ्रष्टाचारविरोधात अण्णांनी पुकारलेले जनआंदोलन आज ऐतिहासिक टप्प्यावर येऊन ठेपले आहे. लोकसभेत जनलोकपालवर चर्चा सुरू आहे. गेल्या 12 दिवसांपासून अण्णांचे उपोषण सुरू आहे. अण्णांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून नागरिकांनी आंदोलन,मोर्चा, मेणबत्ती मोर्चा काढून आपला पाठिंबा दिला आहे. मुंबईची आन बान आणि शान असणार्‍या डब्बेवाले यांनी ही आपल्या 120 वर्षांच्या कारर्किदीत पहिल्यांदा संप पुकारला होता. आणि तो यशस्वी पार ही पडला. तसेच मुंबईच्या आझाद मैदानावर निघालेल्या महामोर्चात उत्स्फूर्त सहभागही घेतला होता. आता त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत धोबीघाट सुध्दा 120 वर्षांनी अण्णांनी पाठिंबा देण्यासाठी बंद राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2011 08:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close