S M L

'रामलीला'वर लोटला जनसागर

28 ऑगस्टभ्रष्टाचारमुक्त समाजासाठी अण्णांनी सुरू केलेल्या लढ्यातला जनशक्तीचा विजय झाला. 12 दिवसांचं उपोषण आणि जनआंदोलनाच्या रेट्यानंतर, अखेर अण्णांच्या जनआंदोलनाचा यश आलंय. अण्णांच्या जनलोकपाल विधेयकातल्या तीन प्रमुख मागण्या संसदेनं तत्वत: मान्य केल्या. आणि या निर्णयासोबतच अण्णांनी उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं. आज सकाळी दहा वाजता रामलीला मैदानावर अण्णा उपोषण सोडतील. लोकपालाच्या मुद्द्यावर संसदेत ऐतिहासिक चर्चा झाली. त्यात अण्णांनी सुचवलेल्या तीन मागण्या काही अटींवर संसदेनं मान्य केल्या. तसेच लोकपाल विधेयकाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी पंतप्रधानांचं पत्र अण्णांना रामलीला मैदानावर जाऊन दिलं आणि हा विजय जनतेला समर्पित करत अण्णांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. पण हे यश अर्धच असल्याचं सांगत अण्णांनी आंदोलन सुरूच राहणार, हेसुद्धा जाहीर केलं. त्याचबरोबर आज सकाळी उपोषण संपल्यानंतर अण्णा मेडिकल चेकअपसाठी थेट हॉस्पिटलमध्ये जातील अशीही शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2011 04:39 AM IST

'रामलीला'वर लोटला जनसागर

28 ऑगस्ट

भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी अण्णांनी सुरू केलेल्या लढ्यातला जनशक्तीचा विजय झाला. 12 दिवसांचं उपोषण आणि जनआंदोलनाच्या रेट्यानंतर, अखेर अण्णांच्या जनआंदोलनाचा यश आलंय. अण्णांच्या जनलोकपाल विधेयकातल्या तीन प्रमुख मागण्या संसदेनं तत्वत: मान्य केल्या. आणि या निर्णयासोबतच अण्णांनी उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं. आज सकाळी दहा वाजता रामलीला मैदानावर अण्णा उपोषण सोडतील. लोकपालाच्या मुद्द्यावर संसदेत ऐतिहासिक चर्चा झाली. त्यात अण्णांनी सुचवलेल्या तीन मागण्या काही अटींवर संसदेनं मान्य केल्या. तसेच लोकपाल विधेयकाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी पंतप्रधानांचं पत्र अण्णांना रामलीला मैदानावर जाऊन दिलं आणि हा विजय जनतेला समर्पित करत अण्णांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. पण हे यश अर्धच असल्याचं सांगत अण्णांनी आंदोलन सुरूच राहणार, हेसुद्धा जाहीर केलं. त्याचबरोबर आज सकाळी उपोषण संपल्यानंतर अण्णा मेडिकल चेकअपसाठी थेट हॉस्पिटलमध्ये जातील अशीही शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2011 04:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close