S M L

अण्णांचा अटकेपासून ते रामलीला मैदान

28 ऑगस्टअण्णा हजारे हे नाव आता देशभर पसरलंय. अण्णांचं आंदोलन जनआंदोलन झालं. गेल्या 12 दिवसात हे आंदोलन कसं देशव्यापी होत गेलं त्याबद्दल... 15 ऑगस्ट 2011 देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकणार्‍या अण्णा हजारेंना पोलिसांनी जेपी पार्क इथं उपोषणासाठी काही अटी घातल्या आणि टीम अण्णांनी या अटी अमान्य करत आंदोलन करणारच असा निर्धार केला. अण्णा आता काय करणार याची सगळ्या देशाला उत्सुकता असताना अण्णांनी संध्याकाळी गाठलं ते राजघाट. महात्मा गांधींना अभिवादन करत अण्णांनी तब्बल दोन तास चिंतन केलं आणि उपोषणाचा निर्धार कायम असल्याचं जाहीर केलं. यानंतर 16 ऑगस्टला जे काही घडलं ते देशाच्या लोकशाहीला काळीमा फासणारं ठरलं. अण्णांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतलं आणि अण्णांची रवानगी तिहार तुरूंगात झाली. पण अण्णांच्या मागे जनशक्तीची केवढी मोठी ताकद होती ते तिहारबाहेर अण्णांच्या समर्थनासाठी जमलेल्या गर्दीवरुन सरकारच्या लक्षात आलं आणि संध्याकाळीच अण्णांना सोडण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. पण तोपर्यंत सरकार विरुद्ध अण्णा संघर्ष पेटला होता. आणि तिहार तुरुंगात पाठवणार्‍या सरकारला अण्णांनीच स्थानबद्ध केलं. उपोषणासाठी पोलिसांनी घातलेल्या अटी मागे घेईपर्यंत तुरूंगातून बाहेर न जाण्याचा निर्धार अण्णांनी केला आणि सरकारच कैदेत अडकलं. तिहार तुरूंगच आता अण्णा समर्थकांसाठी जेपी पार्क झालं होतं. अखेर सरकारला जनमताच्या रेट्यापुढे माघार घेत अण्णांना विनाअट रामलीला मैदानावर उपोषणाची परवानगी दयावी लागली. तिहार तुरुंगातून अण्णा बाहेर आल्याची दृश्यं सर्वप्रथम आयबीएन लोकमतनं दाखवली आणि यानंतर अण्णांच्या समर्थनासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेला जनसागर या देशव्यापी आंदोलनाची तीव्रता दाखवली. त्यानंतर अण्णांचा भ्रष्टाचारविरोधी रथ राजघाटमार्गे रामलीला मैदानाकडे निघाला. राजघाटवर तर अण्णांनी पोलिसांनाही पळायला भाग पाडून आपल्या इच्छाशक्ती आणि शारिरीक शक्तीचा प्रत्यय सगळ्या देशाला घडवला. यानंतर अण्णा रामलीला मैदानावर पोहोचले. पण त्याआधीच अण्णांच्या स्वागतासाठी जनसागरच तिथं अवतरला होता. त्यानंतर अण्णांच्या उपोेषणाचे दिवस वाढत गेले आणि सरकारवरचा दबावही. अण्णांच्या समर्थनार्थ देशभरात आंदोलनंही सुरूच होती. तिकडे अण्णांचं वजन कमी होत होतं. पण अण्णांचा निर्धार मात्र कायम होता. अखेर अण्णांचं खंबीर नेतृत्व आणि जनशक्तीचा रेटा यापुढे सरकारला माघार घ्यावी लागली आणि अण्णांनी आपलं आणखी एक ऐतिहासिक उपोषण मागे घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2011 08:05 AM IST

अण्णांचा अटकेपासून ते रामलीला मैदान

28 ऑगस्ट

अण्णा हजारे हे नाव आता देशभर पसरलंय. अण्णांचं आंदोलन जनआंदोलन झालं. गेल्या 12 दिवसात हे आंदोलन कसं देशव्यापी होत गेलं त्याबद्दल... 15 ऑगस्ट 2011 देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकणार्‍या अण्णा हजारेंना पोलिसांनी जेपी पार्क इथं उपोषणासाठी काही अटी घातल्या आणि टीम अण्णांनी या अटी अमान्य करत आंदोलन करणारच असा निर्धार केला.

अण्णा आता काय करणार याची सगळ्या देशाला उत्सुकता असताना अण्णांनी संध्याकाळी गाठलं ते राजघाट. महात्मा गांधींना अभिवादन करत अण्णांनी तब्बल दोन तास चिंतन केलं आणि उपोषणाचा निर्धार कायम असल्याचं जाहीर केलं. यानंतर 16 ऑगस्टला जे काही घडलं ते देशाच्या लोकशाहीला काळीमा फासणारं ठरलं.

अण्णांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतलं आणि अण्णांची रवानगी तिहार तुरूंगात झाली. पण अण्णांच्या मागे जनशक्तीची केवढी मोठी ताकद होती ते तिहारबाहेर अण्णांच्या समर्थनासाठी जमलेल्या गर्दीवरुन सरकारच्या लक्षात आलं आणि संध्याकाळीच अण्णांना सोडण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.

पण तोपर्यंत सरकार विरुद्ध अण्णा संघर्ष पेटला होता. आणि तिहार तुरुंगात पाठवणार्‍या सरकारला अण्णांनीच स्थानबद्ध केलं. उपोषणासाठी पोलिसांनी घातलेल्या अटी मागे घेईपर्यंत तुरूंगातून बाहेर न जाण्याचा निर्धार अण्णांनी केला आणि सरकारच कैदेत अडकलं. तिहार तुरूंगच आता अण्णा समर्थकांसाठी जेपी पार्क झालं होतं.

अखेर सरकारला जनमताच्या रेट्यापुढे माघार घेत अण्णांना विनाअट रामलीला मैदानावर उपोषणाची परवानगी दयावी लागली. तिहार तुरुंगातून अण्णा बाहेर आल्याची दृश्यं सर्वप्रथम आयबीएन लोकमतनं दाखवली आणि यानंतर अण्णांच्या समर्थनासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेला जनसागर या देशव्यापी आंदोलनाची तीव्रता दाखवली.

त्यानंतर अण्णांचा भ्रष्टाचारविरोधी रथ राजघाटमार्गे रामलीला मैदानाकडे निघाला. राजघाटवर तर अण्णांनी पोलिसांनाही पळायला भाग पाडून आपल्या इच्छाशक्ती आणि शारिरीक शक्तीचा प्रत्यय सगळ्या देशाला घडवला. यानंतर अण्णा रामलीला मैदानावर पोहोचले. पण त्याआधीच अण्णांच्या स्वागतासाठी जनसागरच तिथं अवतरला होता.

त्यानंतर अण्णांच्या उपोेषणाचे दिवस वाढत गेले आणि सरकारवरचा दबावही. अण्णांच्या समर्थनार्थ देशभरात आंदोलनंही सुरूच होती. तिकडे अण्णांचं वजन कमी होत होतं. पण अण्णांचा निर्धार मात्र कायम होता. अखेर अण्णांचं खंबीर नेतृत्व आणि जनशक्तीचा रेटा यापुढे सरकारला माघार घ्यावी लागली आणि अण्णांनी आपलं आणखी एक ऐतिहासिक उपोषण मागे घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2011 08:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close