S M L

मालेगाव बॉम्बस्फोटासाठी लष्करानं जप्त केलेल्या आरडीएक्सचा वापर

15 नोव्हेंबर नाशिक दीप्ती राऊत आणि निरंजन टकलेमालेगाव बॉम्बस्फोटासाठी लष्करानं जप्त केलेलं आरडीएक्स वापरण्यात आला असा गौप्यस्फोट एटीएसनं केला आहे. लष्करानं काश्मिरी अतिरेक्यांकडून 60 किलो आरडीएक्स जप्त केलं होतं. बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जाणारे हे आरडीएक्स लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितच्या ताब्यात होतं. मालेगाव स्फोटात त्याचा वापर झाला. त्या आरडीएक्समधला काही भाग, कर्नलनं समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातला फरार आरोपी भगवानला दिला. हा भगवान त्याचा साथीदारही आहे, असा दावा एटीएसनं नाशिक कोर्टात केला. याच आरडीएक्सचा वापर करुन देशात आणखी किती ठिकाणी बॉम्बस्फोट झाले याचा तपास एटीएस करतं आहे. यामुळे हिंदू दहशतवाद्यांच्या देशपातळीवरच्या एका मोठ्या कटाचा छडा लावण्याचा प्रयत्न एटीएस करत आहे. दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोटासाठी वापरलेलं आरडीएक्स लष्कराचं होतं याची कबुली कर्नल पुरोहितनं दिल्याचं एटीएसनं कोर्टात सांगितलं. 2006 मध्ये देवळाली कॅन्टोनमेंट इथं तैनात असताना पुरोहितच्या ताब्यात 60 किलो आरडीएक्स होतं. त्यानं ते लष्कराला जमा केलं नव्हतं. यातलं काही आरडीएक्स भगवान नावाच्या माणसाला पुरोहितनं दिलं. नाशिक कोर्टातील आजची सुनावणी स्पेशल होती. एकीकडे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितच्या नातेवाईकांनी पुरोहितला मारहाण होतेय असा आरोप केला त्याची सुनावणी होती. त्यासंदर्भात पुरोहितची आर्मी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली. नाशिक कोर्टाच्या सुनावणीनंतर त्याला 18 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2008 02:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2008 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close