S M L

नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच

29 ऑगस्टनाशिक शहरात पावसाची संततधार सुरू आहे. नाशिकमध्येही गंगापूर धरणातील पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरीच्या उगमापाशी त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या 24 तासात 126 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे गंगापूर धरण पहिल्यांदाच 92 टक्के भरले आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीत मुसळधार पाऊस झाला. इगतपुरीत गेल्या 24 तासात 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमला गावात उनंदा नदीपात्रात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. तर नाशिकहून डहाणू आणि मुंबई तसेच सुरतकडे जाणारे दोन्ही रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत. दरम्यान राज्यातली कोयना, भंडारदरा, भातसा,सुर्या, धामणी, मोरबे आणि वारणा ही धरणं पूर्ण भरली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व जिल्हाधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी दिली .

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2011 10:28 AM IST

नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच

29 ऑगस्ट

नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू आहे. नाशिकमध्येही गंगापूर धरणातील पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरीच्या उगमापाशी त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या 24 तासात 126 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे गंगापूर धरण पहिल्यांदाच 92 टक्के भरले आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीत मुसळधार पाऊस झाला.

इगतपुरीत गेल्या 24 तासात 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमला गावात उनंदा नदीपात्रात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. तर नाशिकहून डहाणू आणि मुंबई तसेच सुरतकडे जाणारे दोन्ही रस्ते पावसामुळे बंद झाले आहेत. दरम्यान राज्यातली कोयना, भंडारदरा, भातसा,सुर्या, धामणी, मोरबे आणि वारणा ही धरणं पूर्ण भरली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व जिल्हाधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2011 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close