S M L

सरकारमध्ये लबाड लोकांचे बस्तान - अण्णा हजारे

02 सप्टेंबरकेंद्रातील काही लोक खोटारडी आहे. केंद्रीय गृहमंत्री पि. चिदंबरम यांनी माझ्या सोबत खोटारडेपणा केला आहे. अशा शब्दात अण्णांनी केंद्रातील मंत्र्यांचा समाचार घेतला. भ्रष्टाचार विरोधी लढ्यात तरूणांनी मोठा पाठिंबा दिला आहे. युवाशक्ती हे आपलं प्रेरणा स्थान आहे. देशात माजलेला भ्रष्टाचार मुळासकट नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भ्रष्टाचार विरोधी लढ्यात ही मशाल पेटती ठेवा असं आवाहन अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दीमधून जनतेला केले. भ्रष्टाचाराविरोधात दुसरी लढाई जिंकल्यानंतर बुधवारी रात्री अण्णांचे राळेगणमध्ये आगमन झाले. आज दुपारी शांतीनिकेतन क्रीडांगणावर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अण्णांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. आपल्या आंदोलनात देशभरातील जनतेने जो सहभाग घेतला या सर्वांचा हा विजय आहे. त्यांच्यामुळे हा विजय होऊ शकला. देशात 1857 मध्ये स्वातंत्र्याच्या लढाईला सुरूवात झाली होती. 1857 ते 1942 पर्यंत लढाई सुरू राहिली यात अनेक लोकांचा बळी गेला. मुंबईमध्ये 1942 मध्ये इंग्रजांना 'चले जाव' नारा दिला. 1947 मध्ये इंग्रज गेले पण 64 वर्षानंतर देशात दहशतवाद, भ्रष्टाचार, लूट, गुंडागर्दी यांनी धुमाकूळ घातला आहे. यात फरक एवढाच झाला गोरे गेले काळे आले. पण देशाला काय मिळाले ? स्वातंत्र्य मिळून काय फायदा झाला. आज सर्वसामान्य जनता महागाईने होरपाळून निघत आहे. खरं स्वातंत्र्य अजून मिळाले नाही. म्हणून आताही स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली आहे. देशभरातून लोकांनी या लढ्यात सहभाग घेतला आहे. खास करून या आंदोलनात तरूणांचा सहभाग हा मोठा आहे. तरूणांची शक्ती म्हणजे राष्ट्रशक्ती आहे. ही युवाशक्ती जर जागी झाली तर उद्याच्या देशाचे भवितव्य दूर नाही. तिकडे व्हियतनाम सारखे देश तरूणांनी घडवले आहे, इंडोनिशियात क्रांती तरूणांनी केली तर राखेच्या ढिगारातून जपानसारखा देश पुन्हा उभा केला तो तरूणांनी केला आहे. यामुळे माझे आशा स्थान तर तरूण आहे. मला खात्री आहे या युवाशक्तीमुळे भारत देश हा महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही. पण तरूणांना माझी विनंती आहे. भ्रष्टाचाराविरोधात ही मशाल प्रज्वलित केली आहे ती तेवत ठेवा तिला विझू देता कामा नये असं आवाहन अण्णांनी केले. अण्णा म्हणाले की, "मी अण्णा हजारे आहे", "मैं अण्णा हु " असे लिहलेली टोपी डोक्यावर घालून अण्णा म्हणणे सोप आहे पण त्याच बरोबर अण्णा होण्यासाठी चारित्र जपा, आपले आचार विचार शुध्द ठेवा आणि जिवनात काही त्याग करायचे शिका कारण भारतभूमी ही त्यागाची भूमी आहे. स्वातंत्र्याचा इतिहास आहे त्याग केल्याशिवाय काही साध्य होत नाही म्हणून त्याग करणे शिका त्याच बरोबर अपमान सहन करणे शिका तुमची कोणी निंदा करत असेल तर ती प्या सहन करा पण सामुहिक अन्याय सहन करणे हा दोष आहे. मला कुठे अन्याय दिसत असेल तर त्या विरोधात लढा द्या मुंग गिळून गप्प बसू नका असा सल्ला ही अण्णांनी तरूणांना दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2011 01:31 PM IST

02 सप्टेंबर

केंद्रातील काही लोक खोटारडी आहे. केंद्रीय गृहमंत्री पि. चिदंबरम यांनी माझ्या सोबत खोटारडेपणा केला आहे. अशा शब्दात अण्णांनी केंद्रातील मंत्र्यांचा समाचार घेतला. भ्रष्टाचार विरोधी लढ्यात तरूणांनी मोठा पाठिंबा दिला आहे. युवाशक्ती हे आपलं प्रेरणा स्थान आहे. देशात माजलेला भ्रष्टाचार मुळासकट नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भ्रष्टाचार विरोधी लढ्यात ही मशाल पेटती ठेवा असं आवाहन अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दीमधून जनतेला केले.

भ्रष्टाचाराविरोधात दुसरी लढाई जिंकल्यानंतर बुधवारी रात्री अण्णांचे राळेगणमध्ये आगमन झाले. आज दुपारी शांतीनिकेतन क्रीडांगणावर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अण्णांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. आपल्या आंदोलनात देशभरातील जनतेने जो सहभाग घेतला या सर्वांचा हा विजय आहे. त्यांच्यामुळे हा विजय होऊ शकला. देशात 1857 मध्ये स्वातंत्र्याच्या लढाईला सुरूवात झाली होती. 1857 ते 1942 पर्यंत लढाई सुरू राहिली यात अनेक लोकांचा बळी गेला. मुंबईमध्ये 1942 मध्ये इंग्रजांना 'चले जाव' नारा दिला. 1947 मध्ये इंग्रज गेले पण 64 वर्षानंतर देशात दहशतवाद, भ्रष्टाचार, लूट, गुंडागर्दी यांनी धुमाकूळ घातला आहे. यात फरक एवढाच झाला गोरे गेले काळे आले. पण देशाला काय मिळाले ? स्वातंत्र्य मिळून काय फायदा झाला. आज सर्वसामान्य जनता महागाईने होरपाळून निघत आहे. खरं स्वातंत्र्य अजून मिळाले नाही. म्हणून आताही स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली आहे. देशभरातून लोकांनी या लढ्यात सहभाग घेतला आहे. खास करून या आंदोलनात तरूणांचा सहभाग हा मोठा आहे. तरूणांची शक्ती म्हणजे राष्ट्रशक्ती आहे. ही युवाशक्ती जर जागी झाली तर उद्याच्या देशाचे भवितव्य दूर नाही. तिकडे व्हियतनाम सारखे देश तरूणांनी घडवले आहे, इंडोनिशियात क्रांती तरूणांनी केली तर राखेच्या ढिगारातून जपानसारखा देश पुन्हा उभा केला तो तरूणांनी केला आहे. यामुळे माझे आशा स्थान तर तरूण आहे. मला खात्री आहे या युवाशक्तीमुळे भारत देश हा महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही. पण तरूणांना माझी विनंती आहे. भ्रष्टाचाराविरोधात ही मशाल प्रज्वलित केली आहे ती तेवत ठेवा तिला विझू देता कामा नये असं आवाहन अण्णांनी केले. अण्णा म्हणाले की, "मी अण्णा हजारे आहे", "मैं अण्णा हु " असे लिहलेली टोपी डोक्यावर घालून अण्णा म्हणणे सोप आहे पण त्याच बरोबर अण्णा होण्यासाठी चारित्र जपा, आपले आचार विचार शुध्द ठेवा आणि जिवनात काही त्याग करायचे शिका कारण भारतभूमी ही त्यागाची भूमी आहे. स्वातंत्र्याचा इतिहास आहे त्याग केल्याशिवाय काही साध्य होत नाही म्हणून त्याग करणे शिका त्याच बरोबर अपमान सहन करणे शिका तुमची कोणी निंदा करत असेल तर ती प्या सहन करा पण सामुहिक अन्याय सहन करणे हा दोष आहे. मला कुठे अन्याय दिसत असेल तर त्या विरोधात लढा द्या मुंग गिळून गप्प बसू नका असा सल्ला ही अण्णांनी तरूणांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2011 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close