S M L

आता आली अण्णा साडी..!!

03 सप्टेंबरअण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे त्यांच्या समर्थकांनी टोपी आणि टीशर्ट यांची क्रेझ उचलून धरली होती. आणि तर आता अण्णांच्या आंदोलनाचा हा प्रभाव सुरतच्या प्रसिद्ध साडीउद्योगावरसुद्धा दिसून येतोय. कारण आता निघाली आहे अण्णा साडी. टेक्स्टटाईल होलसेलर विक्रेत्याने साड्यांची आर्डर केली. तीही अण्णांच्या प्रतिमेचं नक्षीकाम असलेल्या साड्यांची. तरुण पिढीला ही कल्पना आवडली तर यात आश्चर्य वाटायला नको. खुशबू पटेलला अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने प्रेरणा मिळाली. आणि अण्णांच्या प्रतिमेचं नक्षीकाम असणारी साडी नेसावी असं तिला वाटू लागलं. खूशबूच्या मते अशी साडी नेसणं हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही तर भ्रष्ट्राचाराला नाही म्हणा असा संदेश तिला दयायचा आहे. त्यामुळे केवळ खूशबूच नाही तर आंदोलनाच्या अनेक समर्थकांना वाटतंय की अशी साडी सरकारी ऑफिसमध्ये सक्तीची करायला हवी. सुरत टेक्सटाईल उद्योग कल्पक नक्षीकामासाठी भारतभर ओळखला जातो. म्हणूनच अण्णा हजारेंच्या लोकप्रियतेची लाट या उद्योगानेही उचलून धरली. एका विक्रेत्याने तर चक्क 50 हजार साड्यांची ऑर्डर दिली. ही एक साडी 500 ते 700 रुपयांच्या दरम्यान आहे. आश्चर्य म्हणजे यातून नफा कमवत नाही असं होलसेलरनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2011 04:32 PM IST

आता आली अण्णा साडी..!!

03 सप्टेंबर

अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे त्यांच्या समर्थकांनी टोपी आणि टीशर्ट यांची क्रेझ उचलून धरली होती. आणि तर आता अण्णांच्या आंदोलनाचा हा प्रभाव सुरतच्या प्रसिद्ध साडीउद्योगावरसुद्धा दिसून येतोय. कारण आता निघाली आहे अण्णा साडी. टेक्स्टटाईल होलसेलर विक्रेत्याने साड्यांची आर्डर केली. तीही अण्णांच्या प्रतिमेचं नक्षीकाम असलेल्या साड्यांची. तरुण पिढीला ही कल्पना आवडली तर यात आश्चर्य वाटायला नको.

खुशबू पटेलला अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने प्रेरणा मिळाली. आणि अण्णांच्या प्रतिमेचं नक्षीकाम असणारी साडी नेसावी असं तिला वाटू लागलं. खूशबूच्या मते अशी साडी नेसणं हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही तर भ्रष्ट्राचाराला नाही म्हणा असा संदेश तिला दयायचा आहे. त्यामुळे केवळ खूशबूच नाही तर आंदोलनाच्या अनेक समर्थकांना वाटतंय की अशी साडी सरकारी ऑफिसमध्ये सक्तीची करायला हवी. सुरत टेक्सटाईल उद्योग कल्पक नक्षीकामासाठी भारतभर ओळखला जातो. म्हणूनच अण्णा हजारेंच्या लोकप्रियतेची लाट या उद्योगानेही उचलून धरली. एका विक्रेत्याने तर चक्क 50 हजार साड्यांची ऑर्डर दिली. ही एक साडी 500 ते 700 रुपयांच्या दरम्यान आहे. आश्चर्य म्हणजे यातून नफा कमवत नाही असं होलसेलरनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2011 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close