S M L

अमर सिंह यांची तिहारमध्ये रवानगी

06 सप्टेंबर2008 मधल्या कॅश फॉर वोट प्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांना आज अटक करण्यात आली. त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांच्यासोबत भाजपचे माजी खासदार फग्गनसिंह कुलुस्ते, महावीर भगोरा यांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणातील खरे लाभार्थी काँग्रेस सरकारच असल्याचा आरोप भाजप आणि डाव्या पक्षांनी केला. तर, आरोप मूर्खपणाचे असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे. 3 वर्षांपूर्वी आयबीएन-नेटवर्कनं एक स्टींग ऑपरेशन केलं होतं. 3 वर्षांनंतर अखेर अमर सिंह यांच्यावर कारवाई झाली. कॅश फॉर व्होट प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अमर सिंह यांना कोर्टाने 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आणि महावीर भगोडा आणि फग्गन सिंह कुलस्ते या भाजपच्या दोन खासदारांसोबत अमरसिंहांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.आपल्या राजकारणाप्रमाणेच अमरसिंहांनी यावेळीसुद्धा नाटक केलं. एक वर्षांपूर्वी झालेल्या किडनी ट्रान्सप्लांटचे कारण देत अमरसिंहांनी सकाळी कोर्टात हजर राहणे टाळण्याचा प्रयत्न केला. पण न्यायाधीशांनी कडक भूमिका घेतल्यानंतर अमरसिंगांना अखेर कोर्टात हजर राहावंच लागले.कॅश फॉर वोटप्रकरणी 24 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं.- त्यात जुलै 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकार वाचवण्यासाठी झालेल्या लाचखोरीसाठी अमरसिंह जबाबदार धरले- भाजपच्या 3 खासदारांना अमरसिंहांनी पैसे पुरवल्याचे त्यात म्हटलंय- लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांचं नावही या चार्जशीटमध्ये आहे- या प्रकरणातला मध्यस्थ सुहेल हिंदुस्थानी याच्याशी कुलकर्णी संपर्कात होते- कुलकर्णी यांनी भाजपच्या खासदारांची यूपीएच्या सदस्यांशी भेट घडवून आणण्यासाठी मदत केली असं यात म्हटलंय सुधींद्र कुलकर्णी सध्या भारताबाहेर आहेत. देशात परतल्यावर ते अडचणीत येऊ शकतात. पण याप्रकरणी काँग्रेस हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला. तर काँग्रेसने हा आरोप मूर्खपणाचा असल्याचं म्हटले आहे.थेट संसदेतच नोटांची बंडलं आणून संसदेच्या इतिहासाला कलंक लावण्याचा हा प्रकार घडला होता. आता तब्बल 3 वर्षांनंतर याप्रकरणी खर्‍या अर्थाने कारवाईला सुरुवात झाली. पण या प्रकरणातील खरे लाभार्थी कोण आहेत ते अजून लोकांसमोर यायचं आहे.दरम्यान, दिल्ली पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला आहे असा आरोप भाजपचे खासदार अशोक अर्गल यांनी केला. या तपासात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे नाव का नाही असा आरोपही त्यांनी लावला. तर या प्रकरणातील खरे लाभार्थी कोण आहेत, याचाही तपास लागायला हवा अशी मागणी समाजवादी पक्ष आणि डाव्यांनी केली. अटक करुन हा प्रश्न संपत नाही - करातअमर सिंह कोणासाठी काम करत होते. हे तपासलं जाणं महत्वाचं आहे. केवळ अमरसिंह यांना अटक करुन हा प्रश्न संपत नाही, अशी प्रतिक्रिया सीपीएमच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केली. तर अशा प्रकारचा भ्रष्टाचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी अण्णा हजारेंनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2011 10:44 AM IST

अमर सिंह यांची तिहारमध्ये रवानगी

06 सप्टेंबर

2008 मधल्या कॅश फॉर वोट प्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांना आज अटक करण्यात आली. त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांच्यासोबत भाजपचे माजी खासदार फग्गनसिंह कुलुस्ते, महावीर भगोरा यांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणातील खरे लाभार्थी काँग्रेस सरकारच असल्याचा आरोप भाजप आणि डाव्या पक्षांनी केला. तर, आरोप मूर्खपणाचे असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे.

3 वर्षांपूर्वी आयबीएन-नेटवर्कनं एक स्टींग ऑपरेशन केलं होतं. 3 वर्षांनंतर अखेर अमर सिंह यांच्यावर कारवाई झाली. कॅश फॉर व्होट प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अमर सिंह यांना कोर्टाने 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आणि महावीर भगोडा आणि फग्गन सिंह कुलस्ते या भाजपच्या दोन खासदारांसोबत अमरसिंहांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.

आपल्या राजकारणाप्रमाणेच अमरसिंहांनी यावेळीसुद्धा नाटक केलं. एक वर्षांपूर्वी झालेल्या किडनी ट्रान्सप्लांटचे कारण देत अमरसिंहांनी सकाळी कोर्टात हजर राहणे टाळण्याचा प्रयत्न केला. पण न्यायाधीशांनी कडक भूमिका घेतल्यानंतर अमरसिंगांना अखेर कोर्टात हजर राहावंच लागले.कॅश फॉर वोटप्रकरणी 24 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं.- त्यात जुलै 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकार वाचवण्यासाठी झालेल्या लाचखोरीसाठी अमरसिंह जबाबदार धरले- भाजपच्या 3 खासदारांना अमरसिंहांनी पैसे पुरवल्याचे त्यात म्हटलंय- लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांचं नावही या चार्जशीटमध्ये आहे- या प्रकरणातला मध्यस्थ सुहेल हिंदुस्थानी याच्याशी कुलकर्णी संपर्कात होते- कुलकर्णी यांनी भाजपच्या खासदारांची यूपीएच्या सदस्यांशी भेट घडवून आणण्यासाठी मदत केली असं यात म्हटलंय सुधींद्र कुलकर्णी सध्या भारताबाहेर आहेत. देशात परतल्यावर ते अडचणीत येऊ शकतात. पण याप्रकरणी काँग्रेस हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला. तर काँग्रेसने हा आरोप मूर्खपणाचा असल्याचं म्हटले आहे.थेट संसदेतच नोटांची बंडलं आणून संसदेच्या इतिहासाला कलंक लावण्याचा हा प्रकार घडला होता. आता तब्बल 3 वर्षांनंतर याप्रकरणी खर्‍या अर्थाने कारवाईला सुरुवात झाली. पण या प्रकरणातील खरे लाभार्थी कोण आहेत ते अजून लोकांसमोर यायचं आहे.दरम्यान, दिल्ली पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला आहे असा आरोप भाजपचे खासदार अशोक अर्गल यांनी केला. या तपासात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे नाव का नाही असा आरोपही त्यांनी लावला. तर या प्रकरणातील खरे लाभार्थी कोण आहेत, याचाही तपास लागायला हवा अशी मागणी समाजवादी पक्ष आणि डाव्यांनी केली. अटक करुन हा प्रश्न संपत नाही - करातअमर सिंह कोणासाठी काम करत होते. हे तपासलं जाणं महत्वाचं आहे. केवळ अमरसिंह यांना अटक करुन हा प्रश्न संपत नाही, अशी प्रतिक्रिया सीपीएमच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केली. तर अशा प्रकारचा भ्रष्टाचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी अण्णा हजारेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2011 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close