S M L

मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचा जागर

प्रताप नाईक, कोल्हापूर. 06 सप्टेंबरकोल्हापूर जिल्ह्यातीलं असं एक गावं आहे ज्या गावामध्ये कोणताही सण असो तिथं पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची आवर्जुन काळजी घेतली जाते. या गावाचं नाव आहे लोंघे. या लहानशा गावात गेल्या शंभर वर्षाहुन अधिक काळ मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक असा गणेश उत्सव साजरा केला जातोय.कोल्हापुरपासून अवघ्या 25 किलोमीटरवर असणारं हे लोंघे गाव. या गावात सगळ्या गणेश मूर्ती मातीपासून बनवलेल्या असतात. कोणत्याही झगमगाटाशिवाय अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची इथे प्रथा आहे. गेल्या शंभर वर्षांपासूनची ही परंपरा गावाने अजूनही जपून ठेवली आहे. घराघरात तर मातीच्या मूतीर्ंची परंपरा आहेच पण सार्वजनिक गणेश मंडळाच्या मांडवातही आपल्याला लहान आकाराच्या आणि फारसं रंगकाम न केलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. या उत्सवात तरुण कार्यकर्तेही उत्साहाने पुढाकार घेतात. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या या गावचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2011 10:36 AM IST

मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचा जागर

प्रताप नाईक, कोल्हापूर.

06 सप्टेंबर

कोल्हापूर जिल्ह्यातीलं असं एक गावं आहे ज्या गावामध्ये कोणताही सण असो तिथं पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची आवर्जुन काळजी घेतली जाते. या गावाचं नाव आहे लोंघे. या लहानशा गावात गेल्या शंभर वर्षाहुन अधिक काळ मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक असा गणेश उत्सव साजरा केला जातोय.

कोल्हापुरपासून अवघ्या 25 किलोमीटरवर असणारं हे लोंघे गाव. या गावात सगळ्या गणेश मूर्ती मातीपासून बनवलेल्या असतात. कोणत्याही झगमगाटाशिवाय अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची इथे प्रथा आहे. गेल्या शंभर वर्षांपासूनची ही परंपरा गावाने अजूनही जपून ठेवली आहे. घराघरात तर मातीच्या मूतीर्ंची परंपरा आहेच पण सार्वजनिक गणेश मंडळाच्या मांडवातही आपल्याला लहान आकाराच्या आणि फारसं रंगकाम न केलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. या उत्सवात तरुण कार्यकर्तेही उत्साहाने पुढाकार घेतात. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या या गावचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2011 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close