S M L

खाजगी विद्यापीठाच्या विधेयकाला काँग्रेसचं पूर्ण समर्थन नाही !

08 सप्टेंबरपावसाळी अधिवेशनात घाईगडबडीने पास करून घेतलेल्या खाजगी विद्यापीठ विधेयकाला काँग्रेसचं पूर्ण समर्थन नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी म्हटलं आहे. या विधेयकात इतर मागसवर्गीय जातींना आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. तसेच यात काही त्रुटी असल्याने त्यात सुधारणांची गरज असल्याचंही माणिकराव ठाकरेंनी सांगितले. तर दुसरीकडे माणिकरावांच्या विधानावर बोलताना राजेश टोपे हे आघाडी सरकारचे मंत्री असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मदन बाफना यांनी काँग्रेसला लगावला. आरक्षणाच्या तरतुदीची मागणी राष्ट्रवादीने यापूर्वीच केल्याचंही बाफना यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2011 02:29 PM IST

08 सप्टेंबर

पावसाळी अधिवेशनात घाईगडबडीने पास करून घेतलेल्या खाजगी विद्यापीठ विधेयकाला काँग्रेसचं पूर्ण समर्थन नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी म्हटलं आहे. या विधेयकात इतर मागसवर्गीय जातींना आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. तसेच यात काही त्रुटी असल्याने त्यात सुधारणांची गरज असल्याचंही माणिकराव ठाकरेंनी सांगितले. तर दुसरीकडे माणिकरावांच्या विधानावर बोलताना राजेश टोपे हे आघाडी सरकारचे मंत्री असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मदन बाफना यांनी काँग्रेसला लगावला. आरक्षणाच्या तरतुदीची मागणी राष्ट्रवादीने यापूर्वीच केल्याचंही बाफना यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2011 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close