S M L

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर अहमदाबाद !

09 सप्टेंबरदिल्ली बॉम्बस्फोटनंतर आजच्या तिसर्‍या दिवसापर्यंत चार ई-मेल मिळाले आहे. आज सकाळी दिल्लीतल्या मीडिया हाऊसला एक ई-मेला मिळाला. त्याचा न्युमेरिक कोड उलगडण्यात पोलिसांना यश आलंय. त्यात अतिरेक्यांचं पुढचं टार्गेट अहमदाबाद असेल अशी धमकी देण्यात आली. संध्याकाळी आणखी एक ई-मेल मीडियाला मिळाला. त्यात तिसरा ई-मेल इंडियन मुजाहिद्दीनने पाठवल्याचे स्पष्ट करण्यात आलं. दुसरीकडे 4 फॉरेन्सक लॅब्जचे रिपोर्ट ही आज मिळालेत. पण या रिपोर्ट्समध्ये विसंगती आहे. बॉम्बस्फोटासाठी नायट्रेटयुक्त पदार्थाचा वापर करण्यात आला. या एकाच मुद्द्यावर या चार रिपोर्ट्समध्ये एकमत झालंय. दरम्यान, स्फोटाबद्दल माहिती देणार्‍यांच्या बक्षिसाच्या रकमेत आता वाढ करण्यात आली. बॉम्बस्फोटांची माहिती देणार्‍या व्यक्तीला 10 लाख रुपये मिळणार आहेत. स्फोट झाला त्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत 2 जखमींचा हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दिल्लीतल्या बॉम्बस्फोटानंतर दुसर्‍या दिवशी तपास यंत्रणांची घाई उडाली ती पुरावे गोळा करण्यासाठी. एनआयए (NIA) चं पथक सकाळी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोचलं आणि धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टाच्या सर्व परिसराची त्यांनी कसून पाहणी केली. पण दुसर्‍या दिवसाच्या अखेरही अतिरेक्यांपर्यंत पोचण्यासाठी तपास यंत्रणांच्या हाती फारसे धागेदोरे मिळाले नाहीत. दिल्ली पोलिसांना फरिदाबादमध्ये एक ह्युंडाई कार मिळाली. दहशतवाद्यांनी पळून जाण्यासाठी याचा वापर केला असावा, असा संशय घेण्यात आला. पण त्यातूनही फारसं काही हाती लागलं नाही.तपासात दुसरा एक सुगावा लागला. तो म्हणजे हुजीचा ई-मेल जम्मूतल्या किश्तवार भागातल्या सायबर कॅफेतून पाठवण्यात आल्याचं समजलं. कॅफेचा मालक आणि इतर तिघांना ताब्यात घेण्यात आलं. पण, तपास यंत्रणांच्या मते हा ई-मेल अफवा पसरवण्यासाठी पाठवण्यात आला. गुरुवारी दुसरा एक ई-मेल मीडियाला मिळाला. इंडियन मुजाहिद्दीननं हा ई-मेल पाठवल्याचा संशय आहे. इंडियन मुजाहिद्दीनने बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आणि अशाच प्रकारचे आणखी हल्ले करण्याची धमकीही दिली. हा ई-मेल कुठून आला, याचा तपास एनआयए करत आहे.पंजाब, राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकं शुक्रवारी एनआयएचे प्रमुख आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत. सर्वांचं लक्ष लागलंय ते सविस्तर फॉरेन्सिक अहवालाकडे. हा अहवाल मिळाल्यानंतर बॉम्बचं नेमकं स्वरूप समजू शकतं. आणि त्यातून हल्लेखोरांचा छडा लावण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास नेमका कुठपर्यंत आला ?दिल्ली हायकोर्टाबाहेर झालेल्या स्फोटाच्या तिसर्‍या दिवशी तपास यंत्रणांसमोरचं आव्हान आणखी वाढलंय. 3 सेंट्रल फॉरेन्सिक लॅब्ज आणि एनएसजी (NSG) च्या एका लॅबचा रिपोर्ट मिळाला. पण या चारही रिपोर्टमध्ये विसंगती असल्याचं आढळून आलंय.तपासाचा गुंता वाढला असतानाच आणखी एक ई-मेल मिळाल्याने चिंता वाढली. या ई-मेलमध्ये गुजरातचा उल्लेख आहे. आणि येत्या काही दिवसात अहमदाबादला टार्गेट करण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने गुजरातसह इतर राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. अहमदाबादमध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. जम्मूतून पहिला ई-मेल पाठवणार्‍या मुलाचा पोलिसांना सुगावा लागला आहे. इंडियन मुजाहिद्दीननं पाठवलेला मेल पश्चिम बंगालमधून आल्याचे उघड झालंय. तर तिसर्‍या ई-मेलचा माग मॉस्कोपर्यंत गेला. त्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण असल्याने त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, असं चिदंबरम यांनी म्हटलंय. स्फोटाच्या तपासात आणखी काही वेळ लागेल, असं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 13 झाला आहे. तर, आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, दहशतवाद रोखण्यात सरकार कमी पडत आहे अशी तोफ भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी डागली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2011 09:45 AM IST

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर अहमदाबाद !

09 सप्टेंबर

दिल्ली बॉम्बस्फोटनंतर आजच्या तिसर्‍या दिवसापर्यंत चार ई-मेल मिळाले आहे. आज सकाळी दिल्लीतल्या मीडिया हाऊसला एक ई-मेला मिळाला. त्याचा न्युमेरिक कोड उलगडण्यात पोलिसांना यश आलंय. त्यात अतिरेक्यांचं पुढचं टार्गेट अहमदाबाद असेल अशी धमकी देण्यात आली.

संध्याकाळी आणखी एक ई-मेल मीडियाला मिळाला. त्यात तिसरा ई-मेल इंडियन मुजाहिद्दीनने पाठवल्याचे स्पष्ट करण्यात आलं. दुसरीकडे 4 फॉरेन्सक लॅब्जचे रिपोर्ट ही आज मिळालेत. पण या रिपोर्ट्समध्ये विसंगती आहे. बॉम्बस्फोटासाठी नायट्रेटयुक्त पदार्थाचा वापर करण्यात आला. या एकाच मुद्द्यावर या चार रिपोर्ट्समध्ये एकमत झालंय. दरम्यान, स्फोटाबद्दल माहिती देणार्‍यांच्या बक्षिसाच्या रकमेत आता वाढ करण्यात आली. बॉम्बस्फोटांची माहिती देणार्‍या व्यक्तीला 10 लाख रुपये मिळणार आहेत. स्फोट झाला त्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत 2 जखमींचा हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दिल्लीतल्या बॉम्बस्फोटानंतर दुसर्‍या दिवशी तपास यंत्रणांची घाई उडाली ती पुरावे गोळा करण्यासाठी. एनआयए (NIA) चं पथक सकाळी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोचलं आणि धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला.

हायकोर्टाच्या सर्व परिसराची त्यांनी कसून पाहणी केली. पण दुसर्‍या दिवसाच्या अखेरही अतिरेक्यांपर्यंत पोचण्यासाठी तपास यंत्रणांच्या हाती फारसे धागेदोरे मिळाले नाहीत. दिल्ली पोलिसांना फरिदाबादमध्ये एक ह्युंडाई कार मिळाली. दहशतवाद्यांनी पळून जाण्यासाठी याचा वापर केला असावा, असा संशय घेण्यात आला. पण त्यातूनही फारसं काही हाती लागलं नाही.

तपासात दुसरा एक सुगावा लागला. तो म्हणजे हुजीचा ई-मेल जम्मूतल्या किश्तवार भागातल्या सायबर कॅफेतून पाठवण्यात आल्याचं समजलं. कॅफेचा मालक आणि इतर तिघांना ताब्यात घेण्यात आलं. पण, तपास यंत्रणांच्या मते हा ई-मेल अफवा पसरवण्यासाठी पाठवण्यात आला.

गुरुवारी दुसरा एक ई-मेल मीडियाला मिळाला. इंडियन मुजाहिद्दीननं हा ई-मेल पाठवल्याचा संशय आहे. इंडियन मुजाहिद्दीनने बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आणि अशाच प्रकारचे आणखी हल्ले करण्याची धमकीही दिली. हा ई-मेल कुठून आला, याचा तपास एनआयए करत आहे.

पंजाब, राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकं शुक्रवारी एनआयएचे प्रमुख आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत. सर्वांचं लक्ष लागलंय ते सविस्तर फॉरेन्सिक अहवालाकडे. हा अहवाल मिळाल्यानंतर बॉम्बचं नेमकं स्वरूप समजू शकतं. आणि त्यातून हल्लेखोरांचा छडा लावण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.

दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास नेमका कुठपर्यंत आला ?

दिल्ली हायकोर्टाबाहेर झालेल्या स्फोटाच्या तिसर्‍या दिवशी तपास यंत्रणांसमोरचं आव्हान आणखी वाढलंय. 3 सेंट्रल फॉरेन्सिक लॅब्ज आणि एनएसजी (NSG) च्या एका लॅबचा रिपोर्ट मिळाला. पण या चारही रिपोर्टमध्ये विसंगती असल्याचं आढळून आलंय.

तपासाचा गुंता वाढला असतानाच आणखी एक ई-मेल मिळाल्याने चिंता वाढली. या ई-मेलमध्ये गुजरातचा उल्लेख आहे. आणि येत्या काही दिवसात अहमदाबादला टार्गेट करण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने गुजरातसह इतर राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. अहमदाबादमध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.

जम्मूतून पहिला ई-मेल पाठवणार्‍या मुलाचा पोलिसांना सुगावा लागला आहे. इंडियन मुजाहिद्दीननं पाठवलेला मेल पश्चिम बंगालमधून आल्याचे उघड झालंय. तर तिसर्‍या ई-मेलचा माग मॉस्कोपर्यंत गेला. त्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.

सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण असल्याने त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, असं चिदंबरम यांनी म्हटलंय. स्फोटाच्या तपासात आणखी काही वेळ लागेल, असं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 13 झाला आहे. तर, आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, दहशतवाद रोखण्यात सरकार कमी पडत आहे अशी तोफ भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी डागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2011 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close