S M L

बाप्पा निघाले..

11 सप्टेंबरमहाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती गणरायाला आज मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. गेली 10 दिवस बाप्पांची भक्तीत बुडालेला भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या असा साद ही घालत आहे. ढोल ताशाच्या गजरात, डिजेच्या निंनादात कुठे गुलालची उधळणं, तर कुठे इकोफ्रेंडली बाप्पांना निरोप दिला जात आहे. मुंबईतील लालबागचा राजाची मिरवणूकही त्याला साजेशा दिमाखात निघाली. राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली आहे. विसर्जनाआधीच्या आरतीच्या वेळेस भक्तांच्या जयजयकारानं लालबाग परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर विसर्जनाची लगबग सुरू झाली. विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिला मान इथल्या कोळी महिलांचा असतो. मिरवणुकीत सुरूवातीलाच या महिला त्यांचं पारंपरिक नृत्य सादर करतात. भक्तांच्या लाडक्या राजाची भव्य अशी ही मिरवणूक 24 तास चालणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर राजाचं विसर्जन होईल.गेल्या 10 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी राजाचं दर्शन घेतलंय. कालपर्यंत राजाच्या दानपेटीत 6 कोटींची रोख रक्कम जमा झाली होती. गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना उद्या निरोप देण्यात येत आहे. त्यासाठी सरकारने सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच गणेश मंडळांनाही योग्य काळजी घेण्याच्या सूचना केल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. दिल्लीत हालकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा बळी गेला तर 90 लोक जखमी झाले. या स्फोटांचा तपास अजून सुरू आहे. जुलै महिन्यात मुंबईत झालेल्या साखळी स्फोटाचा तपासही अद्याप सुरू आहे मात्र कोणतेही धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले नाही. दिल्लीच्या स्फोटानंतर हुजी आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेनं जबाबदारी घेतली त्याच सोबत देशात आणखी स्फोट घडवून आणू अशी धमकीही दिली. योग्य खबरदारी घेत गृहमंत्रालयाने तातडीने सर्व गणेशमंडळांची सुरक्षा वाढवली. बाप्पाला निरोप देताना कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत गॅलरी कोसळून 1 ठार दरम्यान, मुंबईतल्या मानाच्या लालबागचा राजाची मिरवणूक सुरू असतानाचा एक दुर्देवी घटना घडली. भारतमाता परिसराजवळ राजाचं दर्शन घ्यायला बिल्डिंगच्या गॅलरीत गर्दी झाली होती. त्याचवेळी अचानक 25 ते 30 जण उभे असलेलं दुकानाचं छप्पर अचानक कोसळलं. यात एकाचा मृत्यू झाला आहे. यात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना के ई एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.लालाबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक भारतमाता परिसरात पोहचली. दरवर्षीप्रमाणे राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली. बिल्डिंगच्या गॅलरीतून राजाला पाहण्यासाठी रहिवाश्यांनी गर्दी केली. याचवेळी एका पत्राच्या दुकानाच्या वरच्या बिल्डिंगच्या गॅलरीत 20 ते 30 भक्त दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार झाल्यामुळे गॅलरी कोसळली आणि सर्वजण रस्त्यावर येऊन पडले. यातील जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाचा दुदैर्वी मृत्यू झाला. राजाची मिरवणूक सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 08:10 AM IST

बाप्पा निघाले..

11 सप्टेंबर

महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती गणरायाला आज मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. गेली 10 दिवस बाप्पांची भक्तीत बुडालेला भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या असा साद ही घालत आहे. ढोल ताशाच्या गजरात, डिजेच्या निंनादात कुठे गुलालची उधळणं, तर कुठे इकोफ्रेंडली बाप्पांना निरोप दिला जात आहे. मुंबईतील लालबागचा राजाची मिरवणूकही त्याला साजेशा दिमाखात निघाली.

राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली आहे. विसर्जनाआधीच्या आरतीच्या वेळेस भक्तांच्या जयजयकारानं लालबाग परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर विसर्जनाची लगबग सुरू झाली. विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिला मान इथल्या कोळी महिलांचा असतो. मिरवणुकीत सुरूवातीलाच या महिला त्यांचं पारंपरिक नृत्य सादर करतात.

भक्तांच्या लाडक्या राजाची भव्य अशी ही मिरवणूक 24 तास चालणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर राजाचं विसर्जन होईल.गेल्या 10 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी राजाचं दर्शन घेतलंय. कालपर्यंत राजाच्या दानपेटीत 6 कोटींची रोख रक्कम जमा झाली होती.

गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना उद्या निरोप देण्यात येत आहे. त्यासाठी सरकारने सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच गणेश मंडळांनाही योग्य काळजी घेण्याच्या सूचना केल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

दिल्लीत हालकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा बळी गेला तर 90 लोक जखमी झाले. या स्फोटांचा तपास अजून सुरू आहे. जुलै महिन्यात मुंबईत झालेल्या साखळी स्फोटाचा तपासही अद्याप सुरू आहे मात्र कोणतेही धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले नाही. दिल्लीच्या स्फोटानंतर हुजी आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेनं जबाबदारी घेतली त्याच सोबत देशात आणखी स्फोट घडवून आणू अशी धमकीही दिली. योग्य खबरदारी घेत गृहमंत्रालयाने तातडीने सर्व गणेशमंडळांची सुरक्षा वाढवली. बाप्पाला निरोप देताना कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणुकीत गॅलरी कोसळून 1 ठार

दरम्यान, मुंबईतल्या मानाच्या लालबागचा राजाची मिरवणूक सुरू असतानाचा एक दुर्देवी घटना घडली. भारतमाता परिसराजवळ राजाचं दर्शन घ्यायला बिल्डिंगच्या गॅलरीत गर्दी झाली होती. त्याचवेळी अचानक 25 ते 30 जण उभे असलेलं दुकानाचं छप्पर अचानक कोसळलं. यात एकाचा मृत्यू झाला आहे. यात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना के ई एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

लालाबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक भारतमाता परिसरात पोहचली. दरवर्षीप्रमाणे राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली. बिल्डिंगच्या गॅलरीतून राजाला पाहण्यासाठी रहिवाश्यांनी गर्दी केली. याचवेळी एका पत्राच्या दुकानाच्या वरच्या बिल्डिंगच्या गॅलरीत 20 ते 30 भक्त दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार झाल्यामुळे गॅलरी कोसळली आणि सर्वजण रस्त्यावर येऊन पडले. यातील जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाचा दुदैर्वी मृत्यू झाला. राजाची मिरवणूक सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 08:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close