S M L

'मुली वाचवा'चा संदेश देत बाप्पांची विसर्जन मिरवणूक

11 सप्टेंबरकोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मानाचा तुकाराम माळी मंडळाचा गणपती मिरवणुकीत सगळ्यांत पुढं असते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कोल्हापूरच्या महापौर वंदना बुचडे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव,आयुक्त लक्ष्मी बिदरी -प्रसन्ना या मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीला सुरूवात झाली. पारंपरिक वेशभुषा, शिस्तबद्धता आणि पारंपरीक वाद्यांच्या गजरात मिरवणुक सुरु आहे.या मिरवणुकीच्या माध्यमातून कन्या वाचवा असा सामाजिक संदेशही दिला जातोय. कोल्हापूरच्या यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शहरातील बर्‍याचं गणेश मंडळांनी प्रदुषणाला घातक ठरणार्‍या डॉल्बीला फाटा द्यायचं ठरवलंय. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्याची रेलचेल दिसणार आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावर पोलिसांची करडी नजर आहे. मिरवणूक बंदोबस्तासाठी 2 पोलीस अधिक्षक,7 पोलीस उपाधिक्षक,12 पोलीस निरीक्षक, 54 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, 675 कॉन्स्टेबल, 251 होमगार्ड जवान त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या दोन प्लॉटुन आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 08:29 AM IST

'मुली वाचवा'चा संदेश देत बाप्पांची विसर्जन मिरवणूक

11 सप्टेंबर

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मानाचा तुकाराम माळी मंडळाचा गणपती मिरवणुकीत सगळ्यांत पुढं असते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कोल्हापूरच्या महापौर वंदना बुचडे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव,आयुक्त लक्ष्मी बिदरी -प्रसन्ना या मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीला सुरूवात झाली.

पारंपरिक वेशभुषा, शिस्तबद्धता आणि पारंपरीक वाद्यांच्या गजरात मिरवणुक सुरु आहे.या मिरवणुकीच्या माध्यमातून कन्या वाचवा असा सामाजिक संदेशही दिला जातोय. कोल्हापूरच्या यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शहरातील बर्‍याचं गणेश मंडळांनी प्रदुषणाला घातक ठरणार्‍या डॉल्बीला फाटा द्यायचं ठरवलंय.

त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्याची रेलचेल दिसणार आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावर पोलिसांची करडी नजर आहे. मिरवणूक बंदोबस्तासाठी 2 पोलीस अधिक्षक,7 पोलीस उपाधिक्षक,12 पोलीस निरीक्षक, 54 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, 675 कॉन्स्टेबल, 251 होमगार्ड जवान त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या दोन प्लॉटुन आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 08:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close