S M L

पुढच्या वर्षी लवकर या !

11 सप्टेंबरमहाराष्ट्राचं आराध्य दैवत गणरायाला आज मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. गेली 11 दिवस बाप्पांची भक्तीत बुडालेला भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या असा साद ही घालत आहे. अकरा दिवस भरपेट पाहुणचार घेत बाप्पा निरोप घेत आहे. ढोल ताशाच्या गजरात, डिजेच्या निंनादात तर कुठे गुलालची उधळणं, आणि कुठे इकोफ्रेंडली विसर्जन करून बाप्पांना निरोप दिला जात आहे. मुंबईत संध्याकाळपर्यंत जवळपास 98 सार्वजनिक तर तीन हजार 612 घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय. कृत्रिम तलावात 4 सार्वजनिक आणि 238 घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय.लालबागच्या राजाची शानमुंबईतील लालबागचा राजाची मिरवणूकही त्याला साजेशा दिमाखात निघाली. राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली आहे. विसर्जनाआधीच्या आरतीच्या वेळेस भक्तांच्या जयजयकारानं लालबाग परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर विसर्जनाची लगबग सुरू झाली. विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिला मान इथल्या कोळी महिलांचा असतो. मिरवणुकीत सुरूवातीलाच या महिला त्यांचं पारंपरिक नृत्य सादर करतात. भक्तांच्या लाडक्या राजाची भव्य अशी ही मिरवणूक 24 तास चालणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर राजाचं विसर्जन होईल. गेल्या 10 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी राजाचं दर्शन घेतलंय. कालपर्यंत राजाच्या दानपेटीत 6 कोटींची रोख रक्कम जमा झाली होती. पुण्यात पाचही मानाचा गणपतीचे विसर्जनपुण्याचं ग्रामदैवत असलेल्या मानाच्या कसबा गणपती असलेल्या कसबापेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. मानाचा पहिला गणपती असणार्‍या या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो पुणेकर या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून कसबाच्या विसर्जन मिरवणुकीचं ख्याती आहे. बँडपथकासह मखमलीच्या चवर्‍या, फुले आणि रेशमी गोंड्यांनी सजवलेली पालखी आणि झुंबरदार पालखीच्या आत बसलेले बाप्पा असा कसबा गणपतीच्या मिरवणुकीचा थाट असतो. आज दुपारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. आणि संध्याकाळी 5 च्या सुमारास कसबा गणपतीचे विसर्जन झाले. त्यापाठोपाठ पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आलं.'मुली वाचवा'चा संदेश देत बाप्पांची विसर्जन मिरवणूककोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मानाचा तुकाराम माळी मंडळाचा गणपती मिरवणुकीत सगळ्यांत पुढं असते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कोल्हापूरच्या महापौर वंदना बुचडे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव,आयुक्त लक्ष्मी बिदरी -प्रसन्ना या मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीला सुरूवात झाली. पारंपरिक वेशभुषा, शिस्तबद्धता आणि पारंपरीक वाद्यांच्या गजरात मिरवणुक सुरु आहे.या मिरवणुकीच्या माध्यमातून कन्या वाचवा असा सामाजिक संदेशही दिला जातोय. कोल्हापूरच्या यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शहरातील बर्‍याचं गणेश मंडळांनी प्रदुषणाला घातक ठरणार्‍या डॉल्बीला फाटा द्यायचं ठरवलंय. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्याची रेलचेल दिसणार आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावर पोलिसांची करडी नजर आहे. मिरवणूक बंदोबस्तासाठी 2 पोलीस अधिक्षक,7 पोलीस उपाधिक्षक,12 पोलीस निरीक्षक, 54 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, 675 कॉन्स्टेबल, 251 होमगार्ड जवान त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या दोन प्लॉटुन आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आलेत. बाप्पांसाठी 3.5 किलोमीटर रांगोळीची पायघडी पुण्यात आपल्या लाडक्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत पुणेकर उत्साहाने सामील होतात. आणि या मिरवणुकांमध्ये आपापल्या परिनं खुलवतातही. पुण्यातल्या विद्यार्थिनींनी विसर्जन मार्गावर चक्क साडेतीन किलोमीटर लांबीची रांगोळीची पायघडी घातली. नाशकात मूर्ती आणि निर्माल्य दानाला उत्स्फूर्त प्रतिसादआपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुकी सुरू आहे. नाशिकात इकोफ्रेंडली गणेश विसर्जन होत आहे. नाशिककरांनी मूर्ती दान आणि निर्माल्य दानाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी शहरामधल्या स्वयंसेवी संस्थांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद देत मूर्तीदान आणि निर्माल्य दान केलं आहे. तसेच या संस्थेने शहरात मोफत कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. जेणे करून नदी प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचर्‍याला आळा घालता येईल. असा उपक्रम या संस्थेने राबवला आहे. पुढच्या वर्षी नाशिककर आणखी मोठ्या संख्येनं सहभागी होतील असा विश्वास संस्थेच्या कार्यकरणीला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 05:28 PM IST

पुढच्या वर्षी लवकर या !

11 सप्टेंबर

महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणरायाला आज मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. गेली 11 दिवस बाप्पांची भक्तीत बुडालेला भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या असा साद ही घालत आहे. अकरा दिवस भरपेट पाहुणचार घेत बाप्पा निरोप घेत आहे. ढोल ताशाच्या गजरात, डिजेच्या निंनादात तर कुठे गुलालची उधळणं, आणि कुठे इकोफ्रेंडली विसर्जन करून बाप्पांना निरोप दिला जात आहे. मुंबईत संध्याकाळपर्यंत जवळपास 98 सार्वजनिक तर तीन हजार 612 घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय. कृत्रिम तलावात 4 सार्वजनिक आणि 238 घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय.

लालबागच्या राजाची शान

मुंबईतील लालबागचा राजाची मिरवणूकही त्याला साजेशा दिमाखात निघाली. राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली आहे. विसर्जनाआधीच्या आरतीच्या वेळेस भक्तांच्या जयजयकारानं लालबाग परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर विसर्जनाची लगबग सुरू झाली.

विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिला मान इथल्या कोळी महिलांचा असतो. मिरवणुकीत सुरूवातीलाच या महिला त्यांचं पारंपरिक नृत्य सादर करतात. भक्तांच्या लाडक्या राजाची भव्य अशी ही मिरवणूक 24 तास चालणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर राजाचं विसर्जन होईल. गेल्या 10 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी राजाचं दर्शन घेतलंय. कालपर्यंत राजाच्या दानपेटीत 6 कोटींची रोख रक्कम जमा झाली होती. पुण्यात पाचही मानाचा गणपतीचे विसर्जन

पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या मानाच्या कसबा गणपती असलेल्या कसबापेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. मानाचा पहिला गणपती असणार्‍या या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो पुणेकर या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून कसबाच्या विसर्जन मिरवणुकीचं ख्याती आहे.

बँडपथकासह मखमलीच्या चवर्‍या, फुले आणि रेशमी गोंड्यांनी सजवलेली पालखी आणि झुंबरदार पालखीच्या आत बसलेले बाप्पा असा कसबा गणपतीच्या मिरवणुकीचा थाट असतो. आज दुपारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. आणि संध्याकाळी 5 च्या सुमारास कसबा गणपतीचे विसर्जन झाले. त्यापाठोपाठ पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आलं.

'मुली वाचवा'चा संदेश देत बाप्पांची विसर्जन मिरवणूक

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मानाचा तुकाराम माळी मंडळाचा गणपती मिरवणुकीत सगळ्यांत पुढं असते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कोल्हापूरच्या महापौर वंदना बुचडे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव,आयुक्त लक्ष्मी बिदरी -प्रसन्ना या मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीला सुरूवात झाली.

पारंपरिक वेशभुषा, शिस्तबद्धता आणि पारंपरीक वाद्यांच्या गजरात मिरवणुक सुरु आहे.या मिरवणुकीच्या माध्यमातून कन्या वाचवा असा सामाजिक संदेशही दिला जातोय. कोल्हापूरच्या यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शहरातील बर्‍याचं गणेश मंडळांनी प्रदुषणाला घातक ठरणार्‍या डॉल्बीला फाटा द्यायचं ठरवलंय.

त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्याची रेलचेल दिसणार आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावर पोलिसांची करडी नजर आहे. मिरवणूक बंदोबस्तासाठी 2 पोलीस अधिक्षक,7 पोलीस उपाधिक्षक,12 पोलीस निरीक्षक, 54 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, 675 कॉन्स्टेबल, 251 होमगार्ड जवान त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या दोन प्लॉटुन आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आलेत.

बाप्पांसाठी 3.5 किलोमीटर रांगोळीची पायघडी

पुण्यात आपल्या लाडक्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत पुणेकर उत्साहाने सामील होतात. आणि या मिरवणुकांमध्ये आपापल्या परिनं खुलवतातही. पुण्यातल्या विद्यार्थिनींनी विसर्जन मार्गावर चक्क साडेतीन किलोमीटर लांबीची रांगोळीची पायघडी घातली.

नाशकात मूर्ती आणि निर्माल्य दानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुकी सुरू आहे. नाशिकात इकोफ्रेंडली गणेश विसर्जन होत आहे. नाशिककरांनी मूर्ती दान आणि निर्माल्य दानाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी शहरामधल्या स्वयंसेवी संस्थांनी विशेष प्रयत्न केले होते.

त्याला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद देत मूर्तीदान आणि निर्माल्य दान केलं आहे. तसेच या संस्थेने शहरात मोफत कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. जेणे करून नदी प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचर्‍याला आळा घालता येईल. असा उपक्रम या संस्थेने राबवला आहे. पुढच्या वर्षी नाशिककर आणखी मोठ्या संख्येनं सहभागी होतील असा विश्वास संस्थेच्या कार्यकरणीला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close