S M L

जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावरून एकता परिषदेत मतभेद

10 सप्टेंबरप्रस्तावीत जातीय हिसांचार विरोधी विधेयकाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय एकता परिषेदत प्रचंड मतभेद झाले. भाजप, डाव्यांसह अनेक पक्षांनी या विधेयकाच्या सध्याच्या स्वरुपाला विरोध केला. हे विधेयक धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचा आरोप भाजपने केला. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, तसेच धार्मिक आणि भाषिक मुद्द्यावर टार्गेट करून होणार्‍या हिंचासारावर नियंत्रण आणण्यासाठी हे विधेयक आहे. पण, बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक असा भेद करून कायदा करणं चुकीचं असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. यूपीएचे घटक पक्ष असलेल्या तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांच्यासह सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. केरळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनीही परिषदेत भाग घेतला नाही. या विधेयकाबाबत राज्यांशी चर्चा केली नसल्याचे कारण देत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही या परिषदेवर बहिष्कार टाकला. ममता बॅनर्जी वगळता काँग्रेस आणि यूपीएमधल्या इतर पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2011 04:47 PM IST

जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावरून एकता परिषदेत मतभेद

10 सप्टेंबर

प्रस्तावीत जातीय हिसांचार विरोधी विधेयकाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय एकता परिषेदत प्रचंड मतभेद झाले. भाजप, डाव्यांसह अनेक पक्षांनी या विधेयकाच्या सध्याच्या स्वरुपाला विरोध केला. हे विधेयक धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचा आरोप भाजपने केला. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, तसेच धार्मिक आणि भाषिक मुद्द्यावर टार्गेट करून होणार्‍या हिंचासारावर नियंत्रण आणण्यासाठी हे विधेयक आहे. पण, बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक असा भेद करून कायदा करणं चुकीचं असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. यूपीएचे घटक पक्ष असलेल्या तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांच्यासह सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. केरळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनीही परिषदेत भाग घेतला नाही. या विधेयकाबाबत राज्यांशी चर्चा केली नसल्याचे कारण देत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही या परिषदेवर बहिष्कार टाकला. ममता बॅनर्जी वगळता काँग्रेस आणि यूपीएमधल्या इतर पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close