S M L

कांद्याचा वांदा ; शेतकर्‍यांसह राजकीय नेते रस्त्यावर

12 सप्टेंबरकांद्याच्या निर्यातबंदीच्या विरोधात नाशिकमध्ये शेतकरी तीव्र आंदोलनावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या आदेशाची प्रत कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी जाळली. तर आता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार समीर भुजबळही या आंदोलनात उतरले आहे. केंद्राने निर्यातबंदी करताना राज्याला विश्वासात घेतलं नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर या उत्पादकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला व्यापारी, निर्यातदार, बाजार समित्या आणि सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. शुक्रवारपासून जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहे. केंद्र सरकार जोपर्यंत निर्यातबंदी उठवत नाही तोपर्यंत सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. नाशिकजवळ सटाण्यामध्येसुध्दा कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन झालं. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, चांदवड, मनमाड, सटाणा, दिंडोरी, कळवण या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला आहे. गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या विरोधात केंद्र सरकारने भूमिका घेतली आहे. कधी मिनीमम एक्सपोर्ट प्राईज वाढवून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली. तर कधी मुदत उलटून गेल्यानंतर सुध्दा दोन - दोन महिने निर्यातबंदी कायम राहिलेली आहे. कांद्याच्या मुद्यावरुन शेतकर्‍यांच्या भावनांशी सरकार खेळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी केला आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. जोपर्यंत निर्यातबंदी मागे घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील. असं राष्ट्रवादीचे नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे. तर अधिवेशन संपल्यानंतर केंद्र सरकारनं राज्याला अंधारात ठेऊन निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 10:44 AM IST

कांद्याचा वांदा ; शेतकर्‍यांसह राजकीय नेते रस्त्यावर

12 सप्टेंबर

कांद्याच्या निर्यातबंदीच्या विरोधात नाशिकमध्ये शेतकरी तीव्र आंदोलनावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या आदेशाची प्रत कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी जाळली. तर आता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार समीर भुजबळही या आंदोलनात उतरले आहे. केंद्राने निर्यातबंदी करताना राज्याला विश्वासात घेतलं नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर या उत्पादकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला व्यापारी, निर्यातदार, बाजार समित्या आणि सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. शुक्रवारपासून जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहे.

केंद्र सरकार जोपर्यंत निर्यातबंदी उठवत नाही तोपर्यंत सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. नाशिकजवळ सटाण्यामध्येसुध्दा कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन झालं. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, चांदवड, मनमाड, सटाणा, दिंडोरी, कळवण या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला आहे.

गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या विरोधात केंद्र सरकारने भूमिका घेतली आहे. कधी मिनीमम एक्सपोर्ट प्राईज वाढवून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली. तर कधी मुदत उलटून गेल्यानंतर सुध्दा दोन - दोन महिने निर्यातबंदी कायम राहिलेली आहे. कांद्याच्या मुद्यावरुन शेतकर्‍यांच्या भावनांशी सरकार खेळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. जोपर्यंत निर्यातबंदी मागे घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील. असं राष्ट्रवादीचे नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे. तर अधिवेशन संपल्यानंतर केंद्र सरकारनं राज्याला अंधारात ठेऊन निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close