S M L

गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

10 सप्टेंबरआपल्या लाडक्या बाप्पांना उद्या निरोप देण्याचा दिवस. दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना उद्या निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच गणेश मंडळांनाही योग्य काळजी घेण्याच्या सूचना केल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. दिल्लीत हालकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा बळी गेला तर 90 लोक जखमी झाले. या स्फोटांचा तपास अजून सुरू आहे. जुलै महिन्यात मुंबईत झालेल्या साखळी स्फोटाचा तपासही अद्याप सुरू आहे मात्र कोणतेही धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले नाही. दिल्लीच्या स्फोटानंतर हुजी आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेनं जबाबदारी घेतली त्याच सोबत देशात आणखी स्फोट घडवून आणू अशी धमकीही दिली. योग्य खबरदारी घेत गृहमंत्रालयाने तातडीने सर्व गणेशमंडळांची सुरक्षा वाढवली. उद्या बाप्पाला निरोप देताना कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2011 05:02 PM IST

गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

10 सप्टेंबर

आपल्या लाडक्या बाप्पांना उद्या निरोप देण्याचा दिवस. दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना उद्या निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच गणेश मंडळांनाही योग्य काळजी घेण्याच्या सूचना केल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

दिल्लीत हालकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा बळी गेला तर 90 लोक जखमी झाले. या स्फोटांचा तपास अजून सुरू आहे. जुलै महिन्यात मुंबईत झालेल्या साखळी स्फोटाचा तपासही अद्याप सुरू आहे मात्र कोणतेही धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले नाही. दिल्लीच्या स्फोटानंतर हुजी आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेनं जबाबदारी घेतली त्याच सोबत देशात आणखी स्फोट घडवून आणू अशी धमकीही दिली. योग्य खबरदारी घेत गृहमंत्रालयाने तातडीने सर्व गणेशमंडळांची सुरक्षा वाढवली. उद्या बाप्पाला निरोप देताना कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2011 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close