S M L

पुण्यातील घोड्यांना फ्ल्यूची साथ

16 नोव्हेंबर पुणेनितीन चौधरी पुणे परिसरात घोड्यांमध्ये फ्ल्यूची साथ आली आहे. त्याचा परिणाम मुंबईतील घोड्यांच्या शर्यतींवर झालाय. पशुसंवर्धन खात्यानं आजारी घोड्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी हिस्सार इथं पाठवल आहेत. माणसांना या रोगाचा संसर्ग होऊ नये, म्हणून काळजी घेण्यात येत आहे. या साथीमुळे मुंबईत सुरू होणा-या घोड्यांच्या शर्यतींसाठी पुण्यातले घोडे उपलब्ध होणार नाहीत. पुण्याजवळील टर्फ कल्ब इथं शर्यतीचे घोडे पाळले जातात. पण या घोड्यांना फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाल्यानं पुढील दोन महिन्यांसाठी शर्यती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या आजारात घोड्यांना सडकून ताप येतो, तसचं नाकातून स्त्रावही येतो. केंद्र सरकारच्या पशुरोग निदान विभागाच्या अधिका-यांनी याबाबत या घोड्यांची तपासणी केली आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये असे घोडे आढळल्यास त्यासंबंधी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.1987 मध्येही जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरयाना अशा प्रकारचा आजार घोड्यांमध्ये दिसून आला होता. त्यामुळे पशूतज्ञ काळजी घेतं आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2008 12:05 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2008 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close