S M L

पुण्यात डमरु फेस्टिव्हलचं आयोजन

13 सप्टेंबरवेगवेगळ्या प्रकारची संमेलनं आपण कायम पाहत असतो. पण पुण्यात मात्र एक आगळंवेगळं संमेलन भरणार आहे. हे संमेलन आहे तालवाद्यांचं. 'डमरु' या नावाचं तीन दिवसांचं फेस्टिव्हल पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. यात अनेक दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. 16, 17 आणि 18 सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. पंडित विजय घाटे, तौफिक कुरेशी, सेल्वा गणेश शिवामणी असे अनेक दिग्गज कलाकार, पखवाज, तबला आणि ड्रम्स अशी जुगलबंदी पुणेकरांना इथं अनुभवायला मिळणार आहे. पुण्यात पहिल्यांदाच तालवाद्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील सगळे दिग्गज एकत्र येत असल्यानं संगीतप्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 01:11 PM IST

पुण्यात डमरु फेस्टिव्हलचं आयोजन

13 सप्टेंबर

वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं आपण कायम पाहत असतो. पण पुण्यात मात्र एक आगळंवेगळं संमेलन भरणार आहे. हे संमेलन आहे तालवाद्यांचं. 'डमरु' या नावाचं तीन दिवसांचं फेस्टिव्हल पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. यात अनेक दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. 16, 17 आणि 18 सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. पंडित विजय घाटे, तौफिक कुरेशी, सेल्वा गणेश शिवामणी असे अनेक दिग्गज कलाकार, पखवाज, तबला आणि ड्रम्स अशी जुगलबंदी पुणेकरांना इथं अनुभवायला मिळणार आहे. पुण्यात पहिल्यांदाच तालवाद्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील सगळे दिग्गज एकत्र येत असल्यानं संगीतप्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close