S M L

पोलिसांवर गुन्हे दाखल करा !

16 सप्टेंबरमावळ गोळीबार प्रकरणी शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या 8 पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मावळ कोर्टाने दिले आहेत. गुन्हे दाखल झाल्यावर चौकशी करून दोषी आढळल्यास अटक करा असं कोर्टाने सांगितलं आहे. याप्रकरणी 2 अधिकारी आणि आठ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. मावळमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना आटोक्यात आणण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारानंतर पोलिसांवर आरोप झाले होते.9 ऑगस्ट रोजी पहाटेपासून पवणा बंदीस्त जलवाहिनीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शेतकर्‍यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांनी हवेत फायरींग केल्यानंतर थेट शेतकर्‍यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला. पोलीस कर्मचार्‍यांनीच वाहनांची तोडफोड आणि नासधूस सुधा केली होती. यांचे दृष्य सर्वप्रथम आयबीएन लोकमतने दाखवले होते. याची दखल पावसाळी अधिवेशनात घेण्यात आली. तर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलिसांवर पहिली गोळी आंदोलनातून एका खासगी गाडीतून झाडण्यात आली होती. असा गौप्यस्फोट केला होता. याप्रकरणी आर.आर.पाटील यांनी यावेळी दोन निवृत्त न्यायधीशांची चौकशी समितीही स्थापन केली होती. या समितीकडून तीन महिन्यात अहवाल येणार आहे. आज कोर्टाने पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील तर कारवाई करा असा आदेश दिला आहे. या पोलिसांवर गुन्हे दाखल होणार-सीनीअर पीआय अशोक पाटील- सब इन्स्पेक्टर गणेश माने - कॉन्स्टेबल एस एम जनडांगे- कॉन्स्टेबल एम. ए. वागडे- कॉन्स्टेबल जे. एच. कोरडे- कॉन्स्टेबल आर. डी. भगत- कॉन्स्टेबल बी. बी. नागरे- कॉन्स्टेबल एम. एम. जानकर

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 12:49 PM IST

पोलिसांवर गुन्हे दाखल करा !

16 सप्टेंबर

मावळ गोळीबार प्रकरणी शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या 8 पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मावळ कोर्टाने दिले आहेत. गुन्हे दाखल झाल्यावर चौकशी करून दोषी आढळल्यास अटक करा असं कोर्टाने सांगितलं आहे. याप्रकरणी 2 अधिकारी आणि आठ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. मावळमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना आटोक्यात आणण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारानंतर पोलिसांवर आरोप झाले होते.

9 ऑगस्ट रोजी पहाटेपासून पवणा बंदीस्त जलवाहिनीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शेतकर्‍यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांनी हवेत फायरींग केल्यानंतर थेट शेतकर्‍यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला. पोलीस कर्मचार्‍यांनीच वाहनांची तोडफोड आणि नासधूस सुधा केली होती. यांचे दृष्य सर्वप्रथम आयबीएन लोकमतने दाखवले होते. याची दखल पावसाळी अधिवेशनात घेण्यात आली. तर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलिसांवर पहिली गोळी आंदोलनातून एका खासगी गाडीतून झाडण्यात आली होती. असा गौप्यस्फोट केला होता. याप्रकरणी आर.आर.पाटील यांनी यावेळी दोन निवृत्त न्यायधीशांची चौकशी समितीही स्थापन केली होती. या समितीकडून तीन महिन्यात अहवाल येणार आहे. आज कोर्टाने पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील तर कारवाई करा असा आदेश दिला आहे.

या पोलिसांवर गुन्हे दाखल होणार-सीनीअर पीआय अशोक पाटील- सब इन्स्पेक्टर गणेश माने - कॉन्स्टेबल एस एम जनडांगे- कॉन्स्टेबल एम. ए. वागडे- कॉन्स्टेबल जे. एच. कोरडे- कॉन्स्टेबल आर. डी. भगत- कॉन्स्टेबल बी. बी. नागरे- कॉन्स्टेबल एम. एम. जानकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close