S M L

उपोषणाच्या मार्गाने दबाव टाकणे हा घटनेवर हल्ला - मुख्यमंत्री

16 सप्टेंबरआंदोलन किंवा उपोषण करून आपण म्हणतो तेच संसदेनं करावं असा दुराग्रह कोणी करत असेल तर तो घटनेवरचा हल्ला आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच अण्णा हजारे यांच्यावर त्यांचं नाव न घेता हल्ला केला. तसेच हा काँग्रेसच्या मूळ धोरणावरचा सुद्धा हल्ला आहे. त्यामुळे हा मुद्दा जनतेपर्यंत पोचवायला हवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. घटनेत काही बदल करायचे असतील तर ते घटनेच्या मार्गानेच करता येतात आणि तेसुद्धा संसदेच्या माध्यमातूनच असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपूरमध्ये अप्रत्यक्षरीत्या अण्णा हजारेवर टीका केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विदर्भ विभागीय स्थानिक स्वराज्य संस्था सदस्याचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष प्रसिद्धी माध्यमांना तसेच काही लोकांना हाताशी धरून देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचं संविधान उधळून लावण्याचा डाव विरोधी पक्षाचा आहे. अण्णा हजारे यांच नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले की, उपोषण आंदोलनाच्या माध्यमाने आपल्या मागण्या रेटून धरणं, संविधानात बदल करणं म्हणजे संविधानावर झालेला हा हल्ला आहे. असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. तर मोहन प्रकाश यांनी आपल्या शैलीत नितीन गडकरीसह भाजपची चांगलीच कान उघडणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 01:33 PM IST

उपोषणाच्या मार्गाने दबाव टाकणे हा घटनेवर हल्ला - मुख्यमंत्री

16 सप्टेंबर

आंदोलन किंवा उपोषण करून आपण म्हणतो तेच संसदेनं करावं असा दुराग्रह कोणी करत असेल तर तो घटनेवरचा हल्ला आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच अण्णा हजारे यांच्यावर त्यांचं नाव न घेता हल्ला केला. तसेच हा काँग्रेसच्या मूळ धोरणावरचा सुद्धा हल्ला आहे. त्यामुळे हा मुद्दा जनतेपर्यंत पोचवायला हवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. घटनेत काही बदल करायचे असतील तर ते घटनेच्या मार्गानेच करता येतात आणि तेसुद्धा संसदेच्या माध्यमातूनच असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपूरमध्ये अप्रत्यक्षरीत्या अण्णा हजारेवर टीका केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विदर्भ विभागीय स्थानिक स्वराज्य संस्था सदस्याचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष प्रसिद्धी माध्यमांना तसेच काही लोकांना हाताशी धरून देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचं संविधान उधळून लावण्याचा डाव विरोधी पक्षाचा आहे. अण्णा हजारे यांच नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले की, उपोषण आंदोलनाच्या माध्यमाने आपल्या मागण्या रेटून धरणं, संविधानात बदल करणं म्हणजे संविधानावर झालेला हा हल्ला आहे. असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. तर मोहन प्रकाश यांनी आपल्या शैलीत नितीन गडकरीसह भाजपची चांगलीच कान उघडणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close