S M L

राष्ट्रपतींच्या घराची जमीन वादात ; लष्करी अधिकार्‍यांचा आक्षेप

गोविंद वाकडे, मुंबई16 सप्टेंबरपुण्यातल्या खडकी कॅन्टोंमेन्ट परिसरात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वास्तव्यासाठी तब्बल आठ एकर जागेवर बंगला बांधला जात आहे. पण त्यांना देण्यात आलेल्या या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. जागेच्या मालकाने कोर्टात याचिकाही दाखल केली होती. आता मात्र ही जागा सैनिकांच्या हक्काची आहे, ती त्यांच्यासाठी उपयोगात आणावी अशी मागणी माजी लष्करी अधिकार्‍यांनी केली. देशाच्या राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर त्यांच्या पसंतीनुसार देशात कुठंही वास्तव्य करण्याची मुभा आहे. त्यानुसार राष्ट्रपतींनी पुुण्यातल्या खडकी कॅन्टोमेंट परिसरातली जागा पसंत केली. त्यामुळे लष्कराने ही जागा ताब्यात घेतली. तब्बल आठ एकरावर त्यांच्यासाठी बंगला बांधला जातोय. पण राष्ट्रपतींनी ही जागा निवृत्त किंवा शहीद जवानांच्या विधवांच्या वास्तव्यासाठी दान करावी अशी मागणी माजी लष्कर अधिकार्‍यांनी केली.निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल सुरेश पाटील म्हणतात, सैनिकांना निवृत्तीनंतर कोणतीही सुविधा नाही. त्यांना कोणतही हक्काचं व्यासपीठ नाही. आम्ही दाद कुणाकडं मागायची. राष्ट्रपतींनी एकच विनंती आहे.2012 मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील निवृत्त होताहेत. त्यामुळे या जागेवर बांधकाम करण्यासाठी ती रिकामी केली जातेय. इथं राहणार्‍या लष्करी अधिकार्‍यांकडून ही जागा काढून घेण्यात आली. त्याचा संताप अधिकारी व्यक्त करत आहेत.सरकारपुढे मांडलेल्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा माजी लष्करी अधिकार्‍यांनी दिला. एकीकडे राष्ट्रपतींची मर्जी, तर दुसरीकडे देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे जवान.! शासन आता कुणाकडं लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 12:28 PM IST

राष्ट्रपतींच्या घराची जमीन वादात ; लष्करी अधिकार्‍यांचा आक्षेप

गोविंद वाकडे, मुंबई

16 सप्टेंबर

पुण्यातल्या खडकी कॅन्टोंमेन्ट परिसरात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वास्तव्यासाठी तब्बल आठ एकर जागेवर बंगला बांधला जात आहे. पण त्यांना देण्यात आलेल्या या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. जागेच्या मालकाने कोर्टात याचिकाही दाखल केली होती. आता मात्र ही जागा सैनिकांच्या हक्काची आहे, ती त्यांच्यासाठी उपयोगात आणावी अशी मागणी माजी लष्करी अधिकार्‍यांनी केली. देशाच्या राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर त्यांच्या पसंतीनुसार देशात कुठंही वास्तव्य करण्याची मुभा आहे. त्यानुसार राष्ट्रपतींनी पुुण्यातल्या खडकी कॅन्टोमेंट परिसरातली जागा पसंत केली. त्यामुळे लष्कराने ही जागा ताब्यात घेतली. तब्बल आठ एकरावर त्यांच्यासाठी बंगला बांधला जातोय. पण राष्ट्रपतींनी ही जागा निवृत्त किंवा शहीद जवानांच्या विधवांच्या वास्तव्यासाठी दान करावी अशी मागणी माजी लष्कर अधिकार्‍यांनी केली.

निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल सुरेश पाटील म्हणतात, सैनिकांना निवृत्तीनंतर कोणतीही सुविधा नाही. त्यांना कोणतही हक्काचं व्यासपीठ नाही. आम्ही दाद कुणाकडं मागायची. राष्ट्रपतींनी एकच विनंती आहे.

2012 मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील निवृत्त होताहेत. त्यामुळे या जागेवर बांधकाम करण्यासाठी ती रिकामी केली जातेय. इथं राहणार्‍या लष्करी अधिकार्‍यांकडून ही जागा काढून घेण्यात आली. त्याचा संताप अधिकारी व्यक्त करत आहेत.

सरकारपुढे मांडलेल्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा माजी लष्करी अधिकार्‍यांनी दिला. एकीकडे राष्ट्रपतींची मर्जी, तर दुसरीकडे देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे जवान.! शासन आता कुणाकडं लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close